'घरोघरी तसेच उद्योगक्षेत्रात अत्यंत उपयोगी असलेल्या 'रबर' चा शोध कसा लागला? वाचा

घरोघरी तसेच उद्योगक्षेत्रात अत्यंत उपयोगी असलेल्या ‘रबर’ चा शोध कसा लागला? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वस्तूंना आपण इतके used to झालेलो आहोत की त्या कश्या तयार होतात ह्याचा आपण विचारच करत नाही. आजकाल च्या मुलांना तर शेत सुद्धा बघायला मिळत नाही.

याच कारणामुळे काही मुलांना शेतीबद्दल ज्ञान देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना आपल्याला शेतकरी मित्रांच्या मेहनतीची जाणीव होईल.

शहराच्या व्यस्त लाईफस्टाईल मुळे आपण काही गोष्टींपर्यंत पोहोचतच नाहीत हेच खरं. पु. ल. देशपांडे हे एका कार्यक्रमात हे त्यांच्या विनोदी शैलीत हे वाक्य बोलले होते की, “मुंबईच्या लोकांना कापूस हा गादीतच तयार होतो, असंच वाटतं.”

‘रबर’ ही एक अशीच गोष्ट आहे. रबरी बॉल, टायर या गोष्टी ज्या पिढीने लहानपणी खेळल्या आहेत ते लोक रबराने तयार होणाऱ्या या वस्तूंना कधीच विसरू शकत नाही.

 

rubber inmarathi

 

फक्त याच नाही तर मुली वापरतात ते हेयर बँड, वयस्कर लोक चष्म्याला लावणारे रबर जे चष्म्याला अनावधानाने खाली पडण्यापासून वाचकत असतात.

या स्ट्रेच होणाऱ्या, बाऊन्स होणाऱ्या आणि कितीही दिवस आपल्या सोबत राहणाऱ्या रबराची सुरुवात ही जवळपास हजारो वर्षांपूर्वी आजच्या मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिका इथून झाली आहे.

रबराची उत्पत्ती ही लॅटेक्स या वस्तू पासून होते. रबराच्या झाडापासून लॅटेक्स हे कट करून घेतले जाते. त्याला ठिसूळ करण्यासाठी लॅटेक्स ला द्राक्षाच्या रसासोबत मिक्स केलं जातं.

लॅटेक्स पासून रबर बनू शकते हा शोध पहिल्यांदा मयान या देशातील जंगलात राहणाऱ्या लोकांनी लावला. द्राक्ष आणि रबर हे दोन्ही झाडं त्यांनी आजूबाजूला लावले आणि दोन्ही गोष्टींना मिक्स करून रबर तयार करू लागले.

हे मिश्रण आकार देण्यासाठी सोपं असतं. हे मिश्रण मजबूत असतं आणि त्याला पाण्याने त्रास सुद्धा होत नाही. याच रबराचा वापर काही काळाने शुज तयार करण्यासाठी होऊ लागला.

युरोपियन लोक या रबरच्या शोधाने खूप आंनदीत झाले होते. रबर या गोष्टीचा पहिला वापर Maya, Aztec आणि Olmec या लोकांनी वापरल्याची नोंद आहे. या आधी त्यांनी रबर ही गोष्ट कधीच बघितली नव्हती.

किती तरी युरोपियन लोक हे अमेरिकेत तयार होणारे रबर इतर देशांत नेऊ लागले. स्वतःच्या देशात रबर बनवायला सुरुवात करेपर्यंत त्यांना रबर बनवण्यासाठी अमेरिकेवर अवलंबून रहावं लागायचं.

 

rubber 2 inmarathi

 

थॉमस हंकॉक या इंग्लंड च्या व्यक्तीने १८४३ मध्ये सर्वात पहिला ‘रबर बँड’ तयार केला होता. हे तयार करण्यासाठी थॉमस यांनी रबर बॉटल ला वेगवेगळ्या स्लाइसेस मध्ये कट करून घेतलं होतं.

हंकॉक यांनी शोध लावलेल्या रबर बँड मध्ये स्ट्रेच आणि बाऊन्स होण्याची क्षमता नव्हती. १८४५ मध्ये थॉमस पेरी vulcanization या प्रोसेस चा शोध लावून रबर ची quality अजून सुधरवली.

या प्रोसेस ने रबराला सल्फर सोबत मिक्स करून त्यांना काही वेळासाठी गरम करण्यात येतं आणि त्याद्वारे रबराची स्ट्रेंथ वाढवण्यात येते.

१७३६ मध्ये सुद्धा मयान या देशातून कित्येक रबर rolled sheets या फ्रांस ला पाठवण्याची नोंद आहे.

१७९१ मध्ये सॅम्युएल पॉल या व्यक्तीने पहिल्यांदा कपड्यात रबर मिक्स करून त्यांना वॉटरप्रूफ करता येऊ शकतं हा शोध लावला.

जोसेफ प्रेसले या इंग्लंड च्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा रबर चा वापर पेन्सिल ने लिहिलेलं पुसण्यासाठी eraser म्हणून करता येईल हे जगाला शिकवलं.

 

eraser inmarathi

 

Charles Goodyear या अमेरिकेतील व्यक्तीने पहिल्यांदा vulcanization या प्रोसेस चा वापर पहिल्यांदा अमेरिकेत केला होता.

Goodyear हे त्यांच्या टायर्स vulcanization पद्धतीने बनवण्याच्या प्रॅक्टिस मुळे जगभरातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री ला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सगळे जण कायम ऋणी आहेत.

Goodyear यांच्या या पद्धतीचा शोध लावण्या आधी रबर हे नेहमी वतावरणा नुसार आपला गुणधर्म बदलायचं.

रबर तयार होताना वापर सुरू करण्यात आलेल्या लीड आणि सल्फर मुळे रबर हे कोणत्याही केमिकल गोष्टींना रोधक झालं आणि त्याची लाईफ वाढली.

या सर्व शोधांमुळे रबर बँड ही वस्तू आपल्यापर्यंत नियमितपणे येऊ लागली. रबर बँड बनवण्याची पद्धत आजही तीच आहे.

लांब रबर ट्युब बनवल्या जातात आणि त्यांना गरम केलं जातं आणि त्यांच्यावर मशीनच्या सहाय्याने प्रेशर दिलं जातं आणि मग त्या ट्युब च्या स्लाईसेस कट केल्या जातात आणि रबर बँड तयार होतात.

रबर बँड ला दुकानात पाठवण्या आधी धुतले जाते आणि वळवले जाते आणि मग वेगवेगळ्या सेट्स मध्ये पॅकिंग करून दुकानदाराला पाठवलं जातं.

दुसऱ्या महायुद्धा नंतर अमेरिका ला रबर जगभरात सप्लाय करण्याची संधी देणं बंद करण्यात आलं. नॅचरल रबर हे फक्त उष्ण ठिकाणी तयार केलं जाऊ शकतं.

मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया या ठिकाणी रबरचं उतपादन नियमितपणे होऊ लागलं आहे. त्यापैकी इंडोनेशिया मध्ये काही वर्षांपासून रबराच्या झाडांना जास्त जगवता येत नाहीये.

 

rubber farming inmarathi

 

कमी पडणाऱ्या रबर चं उत्पादन हे आफ्रिका मध्ये काही वर्षांपासून घेण्यात येत आहे.

रबर सारखी नियमित वापरात येणारी वस्तू इतका प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे फार कमी जणांना माहीत असेल. ‘गरज ही शोधाची जननी असते’ ते अगदी बरोबर आहे.

पण, हा शोध नॅचरली लागला आणि तो आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे मान्य करावं लागेल. रबर वापरताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी की, ‘कोणतंही रबर तुटेपर्यंत ताणू नये.’

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?