हा चित्रपट तुम्ही कधीही पाहू शकणार नाही!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

काहीतरी हटके करावं म्हणून जगभरात सतत काहीना काही गोष्टी लोक करत असतात. त्यात आपण भारतीय देखील मागे नाही, परंतु या बाबतीत आपल्यापेक्षा हे विदेशी जास्त वरचढ आहेत हे मान्य करायला हवं. त्यांचीच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. त्यांची हीच वरचढगिरी पुन्हा एकदा सिद्ध झालीये.

एक आगळावेगळा हटके चित्रपट येतोय आणि चित्रपटाचं नाव आहे- ‘100 Years – The Movie You Will Never See’.

100-years-movie-marathipizza

 स्रोत

१८ नोव्हेंबर २०१५ रोजी या चित्रपटाचा पहिला टीजर लॉन्च करण्यात आला. विशेष म्हणजे टीजर मध्ये मूळ चित्रपटाची काहीही झलक दाखवण्यात आलेली नाही. आता गंमतीची गोष्ट ऐका- हा चित्रपट थेट १०० वर्षांनी म्हणजे १८ नोव्हेंबर २११५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

म्हणजे चित्रपटाचं टायटल अगदी साजेस आहे की नाही? आणि चित्रपटाखाली दिलेली टॅगलीन देखील अगदी योग्य आहे. कारण या घडीला पृथ्वीवर जिवंत असणारा कोणी माणूस हा चित्रपट कधीही पाहू शकणार नाही. म्हणजे हा चित्रपट बघायचा असेल तर १०० वर्षे पार करण्याची अट आहे, पण तसे होणे महाकठीणच!

John Malkovich यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला आहे. या आगळ्यावेगळ्या चित्रपटाला Robert Rodriguez यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

100-years-movie-marathipizza02

 स्रोत

ही हटके कल्पना निर्माण झाली cognac brandy च्या बॉटलमधून!  जगातील सर्वोत्तम ब्रँडी म्हणून cognac चा नावलौकिक आहे. या ब्रँडीची विशेषता म्हणजे या ब्रँडीचा आस्वाद घेण्यासाठी १०० वर्षे वाट पहावी लागते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ही ब्रँडी अगदी परिपूर्ण होण्यास १०० वर्षे लागतात. cognac brandy च्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेमधून John Malkovich यांना 100 Years या चित्रपटाची कथा सुचली आणि सोबतच चित्रपट १०० वर्षांनी रिलीज करण्याची हटके आयडिया देखील मिळाली.

cognac-marathipizza

स्रोत

आजवर या चित्रपटाचे तीन ट्रेलर्स रिलीज करण्यात आले आहेत, परंतु एकाही ट्रेलरमध्ये मूळ चित्रपटामधील एकही दृश्य दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे चित्रपटाची कथा अजूनही गुलदस्त्यात असून संपूर्ण जगभरातील रसिकांची उत्सुकता वाढीस लागली आहे.

हा चित्रपट पूर्णपणे तयार झाला असून त्याची मूळ डिजिटल प्रिंट १०० वर्षे सुरक्षितपणे राखून ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी निर्मात्यांवर आहे. यासाठी हाय टेक बुलेटप्रुफ केसमध्ये हा चित्रपट ठेवण्यात आला आहे. ज्याचे १८ नोव्हेंबर २११५ पर्यंत संरक्षण करण्यात येईल. अजुन एक विशेष गोष्ट म्हणजे ही केस देखील ऑटोमॅटीक असून बरोबर १८ नोव्हेंबर २११५ तारखेला स्वत:हून ओपन होईल, अश्याप्रकारे तीचे डिजाईन करण्यात आले आहे.

100-years-movie-marathipizza03

 स्रोत

चित्रपटाशी संबंधित काही महत्त्वाच्या व्यक्तींनी चित्रपटासंदर्भात अगदी लहान पण महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे तो म्हणजे- चित्रपटामध्ये आजपासून १०० वर्षामध्ये जगात जे काही बद्दल होणे अपेक्षित आहे ते दाखवण्यात आलेले आहेत.

या चित्रपट निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींना १०० वर्षानंतर होणाऱ्या स्पेशल प्रीमियरचे तिकीट देण्यात आले आहे. ज्याचा अर्थातच त्या व्यक्तींना काहीही फायदा होणार नाही परंतु त्यांची पुढची पिढी नक्कीच आपल्या पूर्वजांनी बनवलेल्या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकते.

100-years-movie-marathipizza01

स्रोत

येणाऱ्या १०० वर्षांत जग बरेच बदलेले असेल. तंत्रज्ञानाने नवी शिखरे गाठलेली असतील. त्या युगात आजचे तंत्रज्ञान जुने लेखले जाईल. अश्यावेळी आजच्या जुन्या चित्रपट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेला हा चित्रपट १०० वर्षांनंतरच्या आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या चित्रपटांसोबत कशी स्पर्धा करेल हा यक्ष प्रश्न आहे. भविष्यातील पिढी या चित्रपटाला स्वीकार करेल का? एक ऐतिहासिक चित्रपट म्हणून त्या युगात या चित्रपटाला मानाचे स्थान मिळेल का? असे प्रश्न देखील निर्माण होतात. पण आताच काही तर्क काढणे चुकीचे ठरेल. कारण प्रत्येक प्रश्नाची उत्तरे वेळेनुसार मिळत असतात आणि या चित्रपटाचे भविष्य देखील १०० वर्षांनी येणारी वेळेचं ठरवेल.

या चित्रपटाचे तीन ट्रेलर खालीलप्रमाणे:

ट्रेलर १

ट्रेलर २

ट्रेलर ३

By The Way Countdown सुरु झालंय!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?