' लॉकडाऊन मध्ये विरंगुळा म्हणून या १० गोष्टी सोशल मीडिया वर कशा झाल्या व्हायरल – एकदा बघाच! – InMarathi

लॉकडाऊन मध्ये विरंगुळा म्हणून या १० गोष्टी सोशल मीडिया वर कशा झाल्या व्हायरल – एकदा बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जागतिक महामारीच्या या काळामध्ये संपूर्ण जग लाॅक डाऊनच्या अवस्थेत आहे यासोबतच भारत देखील या करोनाच्या कारणामुळे लॉक डाऊन आहे.

home inmarathi
the economic times

 

अगदी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे लाॅक डाउन 3 मे पर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले आहे.

या लाॅकडाऊन च्या काळात घरामध्ये राहण्याची सवय नसलेल्या व्यक्तींना प्रचंड अस्वस्थता जाणवत असणार हे मात्र नक्की, कारण बऱ्याच व्यक्तींना कामानिमित्त नेहमीच प्रवास करावा लागतो आणि काहीजणांचं घरात बसणे हा स्वभावच नसतो.

पण अशा परिस्थितीत स्वतःला या व्हायरस पासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला काळजी तर नक्कीच घेतली पाहिजे म्हणूनच आवश्यक काम नसताना घराबाहेर न पडणे हा एकमेव मार्ग आहे.

मग अशा परिस्थितीत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्याय समोर आलेले आहेत.

काहीजण सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक तास इंटरनेट वरती वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतात,

 

social media inmarathi

 

त्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम आणि टिकटॉक यासारख्या प्रसिद्ध सोशल मीडियाच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून वेळ घालवण्याचा प्रयत्न केला जातो.

परंतु मित्रांनो, लक्षात घ्या या गोष्टींना आपण कुठेतरी मर्यादा आहेच मग अशावेळी आपल्याला वेळ घालवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत मदतीला आल्या कुठल्या आहेत, त्या गोष्टी जाणून घेऊयात आणि या गोष्टी सोशल मीडिया वरती कशा व्हायरल झाल्या हे देखील जाणून घेऊयात.

डॅलगोना कॉफी

मागील काही दिवसांमध्ये तुम्ही या कॉफी बद्दल अनेक वेळा नक्कीच ऐकलं असेल,

साऊथ कोरिया मधून हा ट्रेंड इंटरनेट वरती प्रचंड व्हायरल झाला. तिकडे अशाप्रकारचे एक चॉकलेट मिळते असे सांगण्यात येते.

 

dalgona coffee inmarathi

 

ही कॉफी तयार करणे अत्यंत सोप्प असल्याच सांगण्यात येतं, त्यामुळे प्रत्येक जण कॉफी तयार करण्याचा प्रयत्न करत असावा.

तुम्ही देखील करून पाहिलीच असेल ना, जर करून पाहिली नसेल तर नक्कीच करून पहा. आम्ही तुम्हाला त्याची रेसिपी इथे देत आहोत.

डलगोना कॉफी करणे अत्यंत सोप्प आहे,

 

dalgona making
rojak daily

 

यामध्ये दोन चमचे इन्स्टंट कॉफी पावडर आणि दोन चमचे साखर त्यासोबतच एका बाऊलमध्ये गरम पाणी टाकून तुम्ही त्याला बिट करायला हव आणि त्यानंतर एका ग्लासमध्ये थंड दूध घेऊन त्याच्यावरती तुम्ही तयार केलेलं कॉफीचं मिश्रण टाका तुमची ही स्पेशल कॉफी तयार आहे.

हॅन्ड इमोजी चॅलेंज

हा ट्रेंड टिक टॉक ने चालू केला आणि इंस्टाग्राम वरती हा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला.

 

hand wmoji challange inmarathi

 

या प्रकारात नऊ विविध आकृत्या तुमच्या मोबाइल स्क्रीन वरती येत असतात, म्हणजेच तुमच्या हातांचे हातवारे आणि त्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवायचे असतेात विशिष्ट वेळेत आणि त्यांच्या संगीता सोबत या ट्रेंडला जगभरातील विविध अभिनेत्यांनी देखील आपले व्हिडिओ टाकले आहेत.

 

hand challenge inmarathi

 

त्यामुळे सामान्य नागरिकांना या बद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालेला आहे.

चॅलेंज एक्सेप्टेड

असं म्हटलं जातं, की दोन स्त्रिया बद्दल खूप कमी वेळेस चांगलं बोलतात. अशाप्रकारे रूढ असलेला प्रघात मोडण्यात या सोशल मीडियावरील अॅक्टिविटीची फार प्रचंड मदत झाली असेल,

 

challenge accepted inmarathi

 

एवढं नक्की. या प्रकारात सोशल मीडियावरती जगभरात ऍक्टिव्ह असलेल्या स्त्रियांनी एकमेकांना टॅग करत चांगले फोटो टाकण्याची विनंती एकमेकींना केले होती.

हा ट्रेन्ड भारतात मात्र खूपच चांगल्या प्रमाणात चालला असं सोशल मीडियाचे सर्वेक्षण करणाऱ्या एका संस्थेमार्फत सांगण्यात आले आहे.

सेफ हॅन्ड चॅलेंज

भारतातील अनेक सेलिब्रिटींनी ही चॅलेंज एकमेकांना दिली आहे.

safe hand challenge inmarathi
times of india

 

या चॅलेंज मुळे भारतामध्ये हात स्वच्छ करण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी प्रचंड मदत झालेली आहे.

या द्वारे प्रत्येक सेलिब्रिटी आपले हात 20 सेकंद साफ करत त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडिया वरती टाकला आहे.

 

safe hand sachin inmarathi
the tribune india

 

या चॅलेंज मुळे भारतात मोठ्या प्रमाणावर ती प्रबोधन होण्यास मदत झाली आहे.

इंस्टाग्राम लाईव्ह

लाॅकडाऊनच्या काळामध्ये अनेक बदल सोशल मीडियाच्या माध्यमातून घडत असल्याचे आपल्याला लक्षात आले आहे.

यातच लक्षात आलेला बदल म्हणजे जगभरातील अनेक प्रसिद्ध संगीतकार गायक आणि कलाकार लोक या काळामध्ये त्यांच्या चाहत्यांसाठी लाईव्ह घेऊन परफॉर्म करताना दिसले आहेत.

 

shreya goshal inmarathi
youtube

 

अनेक वृत्तवाहिन्यांनी देखील प्रेक्षकांचा कल जाणून घेण्यासाठी या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केलेला आपल्याला जाणवतो.

अनेक तज्ञांनी लाईव्ह येत सामान्य नागरिकांना दिलासा देखिल दिलेला आहे. या महामारीच्या काळामध्ये सोशल मीडियाने सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली आहे.

ऑनलाइन अंताक्षरी

” बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम, सुरू करे अंताक्षरी……” असं म्हणत काहीजणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खरंच एक ऑनलाईन अंताक्षरी सुरू केली आहे.

 

online antakshari inmarathi

 

यामध्ये एक व्यक्ती गाणं गातो आणि इतर व्यक्तींना त्या गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून गाणे गाण्यासाठी टॅग करतो असा हा प्रवास आहे. भारतामध्ये तर या ट्रेंडने प्रचंड पसंती प्राप्त केली आहे.

 

antakshari inmarathi

 

तुम्हाला सोशल मीडिया वरती आज देखील अनेक व्हिडिओ दिसतील आणि अर्थातच दुसऱ्या कुणाला गाताना ऐकण्यासारखं सुख भारतीय सोडतील असं होणार नाही.

फिटनेस चॅलेंज

क्वारंटाईनच्या या काळात आपल्याकडे उपयोगात आणण्यासाठी प्रचंड वेळ आहे, त्यामुळे दैनंदिन काम उरकल्यानंतर आपला सर्व वेळ शरीर घडवण्यासाठी देणे म्हणजेच फिटनेस चॅलेंज होय.

 

alia bhat inmarathi

 

अनेक तरुणांनी एकमेकांना ही चॅलेंज दिलेली आहे आज देखील सोशल मीडिया वरती चॅलेंज मोठ्या प्रमाणावर ती ट्रेंड होत असल्याचे आढळून आले आहे.

Until tomorrow

तुम्ही अनेक ठिकाणी हा कॅप्शन नक्कीच वाचला असेल.

सोशल माध्यमातून आपण स्वतःचा जुना आणी विनोदी फोटो टाकणे अपेक्षित असते परंतु भारतात या चॅलेंजने नवीन रूप घेतलेले आहे.

 

childhood friend inmarathi

 

याच्या माध्यमातून तरुण मंडळी स्वतःचे फोटो टाकून दुसऱ्याला टॅग देखील करत असल्याचं आढळलेलं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?