केळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत – तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही नकीच बुचकळ्यात पडला असाल. तुम्हाला वाटत असेल की त्या सध्या केळीच्या सालीने एवढे काय मोठे तरी आपण मारू शकतो. तुमच्या दृष्टीने जरीही ती निरुपयोगी असली तरी आता आम्ही जे फायदे सांगणार आहोत ते वाचल्यावर तुम्ही देखील थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया केळाच्या सालीचे हे १० उपयोग जे आजवर तुम्हाला कोणीही कधीही सांगितले नसतील!

 

शूज आणि चांदीचे दागिने पोलिश करण्यात उपयोगी

banana-peel-advantages-marathipizza01
gigazine.net

ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटते पण हे १०० टक्के खरं आहे की केळीच्या सालीचा उपयोग शूज आणि चांदीचे दागिने पोलिश करण्यात केला जाऊ शकतो. केळी या फळाचे मुळातच असंख्य फायदे आहेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा फायदा होय. तर जेव्हा कधी अर्जंट मध्ये बूट पोलिश करायची गरज भासेल किंवा चांदीचे दागिने पोलिश करायला काही साधन उपलब्ध नसेल तेव्हा बिनधास्त केळीची साल वापरा आणि चकाचक पोलिश करा.

 

दात पांढरेशुभ्र करण्यास मदत

banana-peel-advantages-marathipizza02
elitereaders.com

केळीच्या सालीचा दैनंदिन आयुष्यात होणारा हा अजून एक महत्त्वाचा फायदा. जर तुमची टूथपेस्ट संपली असेल किंवा दात खूपच पिवळे पडले असतील तर केळीची साल दातांवर घासा, तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.

 

चेहऱ्यावरील मुरुमांवर प्रभावी

banana-peel-advantages-marathipizza03
fotogaleri.haberler.com

चेहऱ्यावर मुरूम आली असतील किंवा फोड्या आल्या असतील तर इतर क्रीम्स वगैरे लावण्यापेक्षा काही दिवस चेहऱ्यावर केल्याची साल चोळा. तुमचा चेहरा पुन्हा पूर्वी सारखा स्वच्छ आणि तजेलदार होईल.

 

शरीरावरील जखमा आणि व्रण नाहीसे करते

banana-peel-advantages-marathipizza04
wikihow.com

केळ्याच्या सालीचा हा उपयोग सर्वांच्याच दृष्टीने अतिमहत्त्वाचा आहे. कधी हातापायावर वगैरे छोटीशी जखम झाली तर त्यावर टेपने केळ्याची साल लावून ठेवा. सालीमधील गुण जखम बर करण्यात आणि व्रण नाहीसा करण्यात मदत करेल.

 

शरीरावरील पुरळ देखील बरी करते

banana-peel-advantages-marathipizza05
homeremediesforlife.com

पुरळच काय तर एखाद्या मच्छराने चावा घेतल्यामुळे जर दाह होत असेल तर त्यावर देखील केळ्याची साल म्हणजे रामबाण उपाय आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा.

 

चामखीळीपासून सुटका

banana-peel-advantages-marathipizza06
mb.ntd.tv

अनेकांना चामखीळीपासून सुटका हवी असते, अश्यानी ज्या ठिकाणी चामखीळ आहे त्या ठिकाणी केळ्याची साल टेपने चीटकवल्यास आठवड्याभरात तुम्हाला परिणाम दिसून येईल.

 

Antidepressants म्हणून वापर 

banana-peel-advantages-marathipizza08
vagabomb.com

एका संशोधनातून सिद्ध झालंय की केळ्याच्या सालीचा antidepressant म्हणून वापर करता येऊ शकतो. Antidepressant असे मेडिसिन असते जे ताण-तणाव कमी करण्यासाठी मदत करते आणि मन शांत ठेवते. जर तुम्ही केळीची साल पाण्यात उकळून ते पाणी प्यालात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant असतो.

 

खत म्हणून वापर

banana-peel-advantages-marathipizza07
theweekendagriculturist.wordpress.com

केळीच्या साली मधील पोषक गुण हे खताच्या रुपात अतिशय उपयोगी सिद्ध झाले आहेत. त्यामुळे जरी वरील कोणत्याही कारणासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर केला नाही तर त्याचा खत म्हणून वापर नक्की करा.

 

तुमच्या झाडांची पाने साफ ठेवण्याकरता

banana-peel-advantages-marathipizza09
faithtap.com

ज्या प्रमाणे विविध वस्तू पोलिश करण्यासाठी केळीच्या सालीचा उपयोग होतो, त्याचप्रमाणे तुमच्या बागेतील झाडांच्या पानावर जर डाग वगैरे पडले असतील किंवा ती पाने खराब झाली असतील, तर केळीच्या सालीच्या सहाय्याने ती साफ करता येतात. याचा फायदा असा की तुमच्या झाडांची पाने पुन्हा एकदा टवटवीत दिसतील.

 

शरीराला पोषक

banana-peel-advantages-marathipizza10
johnnyetc.com

केळ्याची साल खाण्याची कल्पना जरा विचित्र वाटते नाही का? पण विश्वास ठेवा ही विचित्र कल्पना तुमच्या शरीरासाठी मात्र फार उपयुक्त ठरू शकते तुम्ही ही साल कच्ची खा किंवा शिजवून खा, त्यातून तुम्हाला पोषक तत्व मिळणार हे नक्की! तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आजकाल तर बऱ्याच नवनवीन रेसिपीज अध्ये केळ्याच्या सालीचा उपयोग केला जातो.

अशी आहे ही केळीची अतिउपयुक्त साल, त्यामुळे पुढच्या वेळेपासून केळी खाऊन झाल्यावर लगेच सालीची रवानगी कचऱ्याच्या डब्यात करू नका. तिचा आवश्यक तो योग्य वापर करा, जो नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरेल.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?