तुमची बायको/गर्लफ्रेंड “अशी” असेल तर मात्र तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जर तुम्ही सिंगल असाल आणि कुणाला प्रपोज करायच्या विचारात असाल किंवा कोणासोबत डेट वर जायच्या विचारात असाल तर या १० प्रकारच्या स्वभावाच्या व्यक्तीसोबत जायचं टाळा!

लग्न ही प्रत्येकाच्या जीवनात एकदाच घडणारी गोष्ट आहे.

दुसऱ्यांदा करण्याचे धाडस खूप कमी लोक करतात. कारण दुसरं लग्न म्हणजे खर्च आलाच आणि आधीचा अनुभव गाठीशी असताना परत… जाऊ दे असे काही सन्माननीय अपवाद असतात.

तर आपला लेख कोणत्या प्रकारच्या स्त्रियांशी लग्न करू नये या संदर्भात आहे!

 

१. अत्यंत भांडखोर स्त्रिया 

 

angry kareenainmarathi
npnews24

 

काही स्त्रिया अत्यंत भांडखोर असतात. ‘काट्याचा नायटा करणे’, ‘राईचा पर्वत करणे’ या म्हणी भांडखोर महिलांना लक्षात घेऊनच प्रचलित किंवा निर्माण झाल्या असतील. असं म्हणायला हरकत नाही.

असे अनेक “कॅरेक्टर्स” आपण आपल्या सभोवताली बघत असतो.

आपण तर फक्त बघत असतो. पण विचार करा प्रत्यक्ष जो त्या महिलेबरोबर आयुष्य घालवत असेल त्याची काय दशा असेल, ही कल्पनाच केलेली बरी.

 

२. लोभी स्त्रिया

 

greedy girl inmarathi
IMDb

 

लोभी महिला या त्यांना हव्या असलेल्या वस्तू तर घेतातच. पण नको असलेल्या वस्तूही घेतात. त्यामुळे नको ती खोगिरभरती तर होतेच. पण आपला पैसाही वाया जातो.

कुटुंबातील वाटाघाटी परंपरागत दागिने या प्रकरणी लोभी महिलांमुळे आपसात दुही माजण्याची शक्यता असते.

तसंच त्या अनेक गोष्टी फक्त इतरांकडे आहेत म्हणून स्वतः स्टेटस सिंबॉल म्हणून घेतात. त्यामुळे अशा स्त्रियांशी लग्न केल्यास आपलं दुहेरी नुकसान होतं.

 

३. स्टेटस बघून प्रेमात पडणाऱ्या स्त्रिया

 

prajakta inmarathi
times of india

 

काही स्त्रिया या फक्त स्टेटस बघून तुमच्याशी लग्न करतात. त्यांना तुमच्या पेक्षा तुमच्या किंवा तुमच्या वडिलोपार्जित नाव, संपत्ती अधिकार इत्यादी मध्ये इंट्रेस्ट असतो.

त्यामुळे तुम्ही जर अशा स्त्री सोबत विवाह बंधनात अडकलात तर ती तुमच्या नावाचा संपत्तीचा उपभोग तर घेईलच पण तुम्ही वैवाहिक जिवनात किती खुश असाल ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे.

 

४. चंचल स्त्रिया

 

 

fickle minded girls InMarathi 3

 

स्वभावाने अतिशय चंचल म्हणजेच आज अमुक एका व्यक्ती सोबत सुत जमलंय, तर कालांतरानेच त्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत ती स्त्री दिसत आहे.

त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपण जाणता. या मुली दिसायला सुंदर आणि बोलायला अतिशय लाघवी असल्यातरी त्यांच्याशी लग्न करता येणार नाही.

तुम्ही लग्न केल्यावर त्यांना दुसरं कुणी आवडलं तर तुमची पंचायत होईल हे निश्चितच.

 

५. पार्टीफ्रिक स्त्रिया

 

deepika in party inmarathi
bollywoodhungama

 

पार्टी फ्रिक स्त्रिया दिवसा झोपा काढतात आणि रात्री पार्टी करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतोच.

पण, तुमचे कौटुंबिक आरोग्यही धोक्यात येऊ शकते. तेव्हा पार्टीसाठी असलेल्या मैत्रिणी पार्टीकरताच बऱ्या असतात. त्यांच्याशी संसार मांडल्यास तो करणे कठीण जाईल.

 

६. अति-लाडावलेल्या मुली

 

pampered girl inmarathi
aajkaakhbar.com

 

मोठ्या घरचा पोकळ वासा आणि वारा जातो भसा भसा ही म्हण तुम्ही ऐकली असेलच.

मोठ्या घरातल्या अति लाडावलेल्या मुलींशी लग्न केल्यास त्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना त्यांची कामं करायला सांगण्याची शक्यता नकारता येत नाही.

कारण त्यांच्याकडे कामं करण्यास नोकर चाकर असल्याने त्यांना कामाची सवय नसते.

जर त्या हौसेने एखादे काम करायला गेल्या आणि कुणाला न आवडल्याने त्यांनी तसं बोलून दाखवल्यास त्यांना लगेच राग येऊ शकतो. त्यामुळे अशा मुलींशी लग्न न केलेलेच बरे.

 

७. मला पहा आणि फुले वहा

 

disha patani inmarathi
sentinelassam

 

या प्रकारच्या मुलींमुळे आपल्याला मनस्ताप होतो. कारण यांना सतत यांच्याकडे लक्ष देणारे आणि त्यांचेच गाऱ्हाणे ऐकणारे लोक हवे असतात.

जर तुम्ही या मुलींकडे त्यांच्या इच्छेप्रमाणे लक्षं नाही दिले तर त्या कुणा दुसऱ्या व्यक्तीकडे लक्षं देतील.

 

८. गॉसिप करणाऱ्या स्त्रिया

 

gossiping InMarathi

 

नको त्या गोष्टींची नको तितकी चर्चा करणाऱ्या काही महिलांना सवय असते.

असल्या स्त्रिया तुमच्या घरातील प्रत्येक बित्तंबातमी शेजारी व इतरांना सांगतीलच पण शेजारच्या घरातील लहान सहान प्रकरणं कळाल्यास त्या तिखट मीठ लावून सांगतील त्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवू शकतो.

बरं या गॉसिप करणाऱ्या महिलांची सवय एकाएकी जाते असे नाही.

 

९. जबाबदाऱ्या झटकणाऱ्या स्त्रिया

 

shraddha kpoor inmarathi
hindustan times

 

लग्नानंतर काही स्त्रियांना फक्त बसून ऑर्डर सोडायची असते. त्यांना स्वतः कोणतीही जबाबदारी घ्यायची नसते. अगदी स्वतःच्या मुलांना संभाळण्याची सुद्धा.

त्यामुळे अशा स्त्री शी लग्न केल्याने आपलीच जबाबदारी वाढेल तिला संभाळण्याची. त्यामुळे आपली अनावश्यक जबाबदारी कोण वाढवून घेईल?

 

१०. उद्धट स्त्रिया

 

alia bhatt angry inmarathi
firstpost

 

उर्मटपणे वागणाऱ्या स्त्रिया या कोणाचाही मुलाहिजा राखत नाहीत. त्या सर्वांसमोर तुमचा पाणउतारा करतील. किंवा घरातील कोणत्याही वडिलधाऱ्या व्यक्तीला उलट बोलतील.

त्यामुळे वडिलधारी मंडळी तुम्हाला देत असलेला मान तुमच्या बद्दल असलेले त्यांचे समज याबाबत त्यांचे मन कलुषित होऊ शकते.

हे आहेत मुलींतील काही दुर्गूण जे कमी जास्त प्रमाणात सर्वांमध्येच असतात. पण एखादी व्यक्तीत (स्त्री किंवा पुरूष) असे गुण अधिक प्रमाणात वाटत असल्यास विचार करून संबंध वाढवावेत हा या लेखामागचा हेतू.

आणि हो – ही आहे १० प्रकारच्या मुलांची लिस्ट, ज्यांच्याशी चुकूनही लग्न करू नये! मुलींनो – डोन्ट वरी…! वूइ गॉट यू कव्हर्ड! 🙂

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

7 thoughts on “तुमची बायको/गर्लफ्रेंड “अशी” असेल तर मात्र तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही!

 • January 14, 2018 at 10:22 pm
  Permalink

  tya peksha lagnach karu naka na…saral aahe…aani mulanvar suddha lihit jaa kadhi tari…evdhe darude,drugs aani cigarettes pinare,loose character aani looser mula je aaplya bayakola marhan kartat tyanchyabaddal lihinyachi himmat naselch….loosers!

  Reply
  • January 15, 2018 at 11:31 am
   Permalink

   “मुलांवर लिहा कधी” lolz…अहो काकू लेख वाचलात काय? मुलांवर लिहिलेल्या लेखाची लिंक दिलीये की!

   Reply
 • September 8, 2018 at 2:52 pm
  Permalink

  मुर्ख बनवू शकता

  Reply
 • October 18, 2019 at 7:43 am
  Permalink

  Jase kay purush mothe dhutlya tandlachech astat

  Reply
 • October 28, 2019 at 8:12 pm
  Permalink

  मुळात वरील पैकी एक तरी गुण प्रत्येक मुली कडे असतो परंतु जर वरील पैकी एकही गुण नसलेली मुलगी कुणाला मिळाली तर तो नशीबवान, भाग्यवान आसतो. उदा. मी

  Reply
 • October 30, 2019 at 2:43 pm
  Permalink

  Khali vachla nahi ka tai..
  Don’t worry girls we got you covered….asa lihila ahe

  Reply
 • January 14, 2020 at 8:35 pm
  Permalink

  स्त्री हा रक्तपिपासू, निचवृत्तीचा, पुरुषद्रोही, कुटुंबद्रोही, समाजद्रोही, देशद्रोही प्राणी आहे. स्त्रियांपासून जगाला अणुबॉम्ब पेक्षाही जास्त धोका आहे. जितके पुरुष आजवरच्या इतिहासात युद्धात मारले गेले नसतील इतके पुरुष स्त्रियांद्वारे मानसिक अत्याचाराने बळी पडले असतील.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?