मुलींनो – ह्या १० प्रकारच्या पुरुषांशी चुकूनही लग्न करू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

प्रेमात पडल्यावर मुलिंची स्थिती म्हणजे ‘दिल दिवाना बीन सजनाके मानने ना’.. अशी असते – पण लग्नानंतर चित्रं अगदी त्याच्या विपरीत असतं – अशा अनेक घटना आपण आपल्या अवती भवती बघतो. अशा घटनांचे शिकार आपल्याला व्हायचे नसेल तर आपण कोणत्या प्रकारच्या मुलांना नकार दिला पाहिजे हे नीट समजून घेतले पहिजे.

या लेखात अश्या १० मुलांचे प्रकार आम्ही सांगणार आहोत.

(आणि हो – आमच्या मित्रांसाठी – कोणत्या १० प्रकारच्या मुलींशी लग्न करू नये – हेसुद्धा आम्ही सांगितलं आहे. इथे क्लिक करून वाचा!)

१. जबाबदारीची जाणीव नसलेला

 

wake up sid inmarathi
assets.rbl.ms

‘जियेंगे साथ मरेंगे साथ सारे काम करेंगे साथ’, प्रेमात सर्व सुख दुःख एकत्र भोगण्याच्या आणाभाका लोक घेतात. पण, प्रत्यक्ष लग्न किंवा प्रेम जुळल्यावर चित्र वेगळंच असतं. असं अढळल्यास त्वरीत आपल्या बॉयफ्रेडला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणिव करून द्या. संसाराचा रथ दोन चाकांवरच व्यवस्थित धावू शकतो…हे त्याला समजावून सांगा. आणि जर ते समजत नसेल…तर…!

२. पराकोटीचे बंडखोर

 

ta ra rum pum inmarathi

बंडखोर किंवा प्रवाहा विरुद्ध बोलणारी वागणारी मुलं बऱ्याच मुलींना आवडतात. असं का – हा संशोधनाचा विषय आहे. पण लग्नापूर्वी प्रत्येक बाबतीत असणारी ही बंडखोरी, लग्नानंतर तशीच कायम राहिली तर नंतर नंतर व्यवहारात तापदायक ठरू शकते. ही बंडखोर मुलं किंवा पुरूष प्रत्येक गोष्टीला विरोध करत असतात. समाजाच्या चौकटीत राहून काही गोष्टी कराव्याच लागतात ह्याचं व्यावहारिक भान नसेल तर संसार सुखी होणं अवघड आहे.

३. गर्विष्ठ व आत्मकेंद्री

 

abhiman inmarathi

 

सतत “मी मी” म्हणणारा आणि आपलीच बाजू कशी बरोबर व खरी आहे असं ठासून सांगण्याची काही मुलांची वृत्ती असते. अशा युवकांशी लग्न केल्यास त्यांचेच जन्मभर ऐकावे लागेल. तेव्हा अशा युवकांना आत्ताच नकार ऐकवा.

४. संतापी…शिघ्रकोपी…

 

salman khan inmarathi

 

तशी हि समस्या जुन्या पिढीतील स्त्रियांनी फारच अनुभवली आहे. आपल्याला आठवत असेल…आपले आजोबा आणि त्यांच्या पिढीतील लोक नेहेमी करारी मुद्रेत असायचे. शिघ्रकोपी पुरूष तुमच्या लहान सहान चुकीवरून तुम्हाला चारचौघात अपमानीत करू शकतो. त्यामुळे मानसिक तणावात सतत जगत रहाण्याची वेळ येते… त्यामुळे लहानसहान कारणावरून संतापणाऱ्या मुलांपासून वेळीच दूर होणं श्रेयस्कर.

५ . ओव्हर स्मार्ट

 

स्मार्ट व्यक्ती कुणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडते. पण ओव्हरस्मार्ट व्यक्ती कुणालाच आवडत नाहीत. कारण त्या दरवेळी आपलेच शहाणपण पाजळत असतात. जगातील सर्व ज्ञान त्यांनाच आहे असं भासवणाऱ्या व्यक्तीशी लग्न केल्यास तुमच्यासाठी ती डोकेदुखी ठरू शकते.

सतत एक्सपर्ट कमेंट्स देण्याची सवय ह्या कूल डूड मुलांना असते…जिच्यामुळे ऐकणाऱ्यांना अनेकदा वैताग येतो. हे जन्मभर भोगायचं नसेल तर मुलाला वेळीच जाणीव करून द्या आणि सुधारणा होतीये का बघा – अन्यथा वेळीच मेंदू वापरा आणि शहाणे व्हा.

. मम्माज बॉय

 

kabhi khushi kabhi gham mammas boy in marathi

ग्लोबल प्रॉब्लम!

जन्मदात्या आई-वडिलांवर प्रेम, त्यांची काळजी – हे ठीकच. ते कर्तव्यच आहे. पण लग्नाचे वय झाले तरी प्रत्येक गोष्ट आईला विचारून करणारा मुलगा इंडिपेंडन्ट होऊ शकेल की नाही सांगता येत नाही. बऱ्याच मुलींना असा मुलगा कुटुंबवत्सल वगैरे असतो असं वाटतं. पण हा समज साफ चुकीचा आहे. हा मुलगा कोणताच निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. मोठ्यांचा सल्ला घेणं वेगळं…आणि सर्व निर्णयांसाठी त्यांच्यावरच अवलंबून असणं वेगळं…!

७. अति छंदिष्ट

 

10 guys you shouldnt marry InMarathi 7
shutterstock.com

जर समजा तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड सह मॉलमध्ये गेला आहात. तुम्ही शॉपींग करत आहात आणि तो तुमच्याकडे (किंवा मुलांकडे! 😀 ) लक्षं द्यायचं सोडून कोणत्या गेम मध्ये जास्त इंट्रेस्टेड असेल तर काही खरं नाही. शॉपींगमध्ये तुम्हाला त्याच्या इनपुट्स घेता येणार नाहीतच पण – तुम्ही कपल आहात हे सुद्धा तुम्हाला कधीकधी लोकांना सांगावे लागेल…

८. महत्वाच्या क्षणी दुर्लक्ष करणारा

 

 

सर्वांना आपल्या मनाप्रमाणे वागणारी व्यक्ती आवडते. आपल्यालाही ती आपल्या मनाप्रमाणे वागू देते हे ही नसे थोडके. पण काही पुरूष आपल्याला कोणत्याच निर्णयात मदत करत नाहीत आणि प्रत्येक निर्णय आपल्यावर सोडतात. काही क्षण असे असतात जेव्हा मुलींना फक्त आपल्याकडे लक्ष देणारा, आवर्जून विचारपूस करणारा साथीदार हवा असतो. तो आधार त्याक्षणी लाभला नाही तर जगणं मुश्किल होतं. अशा बेभरवशाच्या व्यक्तींबाबत आत्ताच निर्णय घेतलेला बरा.

९. अती पुरुषार्थ दाखवणारे

 

10 guys you shouldnt marry InMarathi 9
trulymadly.com

काही पुरुष असे असतात जे सतत एक विचित्र पुरुषार्थ दाखवण्याच्या भानगडीत असतात. भावनेचा ओलावा त्यांच्यासाठी पोरकट असतो. रोमँटिक चित्रपट, कादंबऱ्या ह्या त्यांच्या विनोदाचा विषय असतो. त्यामुळे ते कधी हळवेपणाने तुम्हाला आय लव्ह यु म्हणतील व्हॅलंटाईन्स डे ला गिफ्ट घेतील हे विसरा.

१०. शरीर सौष्ठवाच्या आहारी गेलेली मुलं…!

 

10 guys you shouldnt marry InMarathi 10
bollywoodlife.com

फिटनेस, हेल्थ कॉन्शिअस – इथपर्यंत ठीक. नव्हे ते आवश्यकच. पण बॉडीबिल्डिंगची अति क्रेझ असलेली मुलं कधीकधी त्यात वहावत जातात. आपला जास्तीत जास्त वेळ जीम मध्ये घालवतात, खाण्यापिण्याच्या सवयी टोकाच्या होऊ पहातात. तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला गेल्यास ते दुसरं काही खाऊ शकत नाहीत. कारण त्यांची डाएट ठरलेली असते. कधीकधी – ते तुमच्यापेक्षा जास्त महत्व बॉडी आणि त्यांच्या कोचला देतात. अर्थात, तो प्रोफेशनल बॉडी बिल्डर असेल… त्यातच करिअर करायचं असेल तर हे स्वाभाविक आहे. पण तसं काही नसूनही ह्यात अडकलेले तरुण घरात बरेच कमी पडतात.

तर मुलींनो…एखादा मुलगा “निवडताना” ह्या १० दुर्गुणांची लक्षणं दिसताहेत हे तपासून घ्याल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “मुलींनो – ह्या १० प्रकारच्या पुरुषांशी चुकूनही लग्न करू नका!

 • November 16, 2017 at 12:58 pm
  Permalink

  If girls considers your above criterias…Then girl will be unmarried forever…

  Reply
 • January 16, 2018 at 12:34 pm
  Permalink

  its better to be forever alone than being with a wrong person.

  Reply
 • March 29, 2019 at 11:56 pm
  Permalink

  जगात असा कोणता च माणूस नाहि…त्या मानसात यामधला एक हि गुण नसेल म्हणून…..
  मुली सगळ्या अविवाहित राहील

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?