‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

इलेक्ट्रोनिक उपकरणे सध्या खूप वापरली जातात. या उपकरणांमुळे आजकाल सगळीच कामे सोप्या पद्धतीने आणि लवकर होतात.

मोबाईल, लॅपटॉप यांसारखी उपकरणे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्रास वापरताना आपल्याला आढळून येतात. पण ही उपकरणे जेवढी सोयीस्कर असतात, तेवढीच धोकादायक देखील असतात.

आता तुम्ही विचाराल, या उपकरणांमुळे आपल्याला का धोका निर्माण होईल, कारण त्यांना तर आपण स्वत: च्या मर्जीनुसार वापरू शकतो.

तुमचे देखील बरोबर आहे, पण सध्या ही उपकरणे हॅक होण्याच्या गोष्टी खूप वाढत चालल्या आहेत.

त्यामुळे जर आपला मोबाईल किंवा लॅपटॉप हॅक झाला, तर आपल्या सर्व खाजगी गोष्टी एखाद्या अनोळखी माणसाला समजण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि कधी – कधी यामुळे आपल्याला खूप मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

 

ethical-hackers-inmarathi
Simplilearn.com

त्यामुळे आपले जीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अश्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की, तुमचा लॅपटॉप हॅक झाला आहे, की नाही.

१. अँटीव्हायरस डिसेबल असणे.

जर तुमच्या लॅपटॉपमधील अँटीव्हायरस आपोआप काम करण्याचा बंद झाला असेल, तर तुमच्या लॅपटॉपबरोबर काहीतरी वेगळे चालू असल्याचे लक्षात येते, त्यामुळे त्याला प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

हा तुमचा लॅपटॉप संपूर्णपणे हॅक झाल्याचे संकेत नाहीत, पण एखादे असुरक्षित अॅप आपल्या लॅपटॉपला इतक्या सकारात्मक पद्धतीने प्रभावित करणार नाही.

 

laptop virus.marathipizza
123rf.com

२. राँग पासवर्ड

जर तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही योग्य पासवर्ड टाकत आहात आणि तरीदेखील तुमचा पीसी किंवा लॅपटॉप तुम्हाला लॉगइन करण्यापासून रोखत आहे आणि राँग पासवर्ड दाखवत आहे, तर तुमच्या लॅपटॉपबरोबर काही वेगळे घडत आहे आणि तुमचा लॅपटॉप हॅक होण्याची संभावना आहे.

 

demo-inmarathi
indo-innmarathi

याचा अर्थ असाही असू शकतो की तुमचा पीसी कुणीतरी हॅक करून त्याचा पासवर्ड बदलला आहे.

३. फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये अचानक वाढ

जर तुमचे फेसबुक फ्रेंड अचानक आणि पटापट वाढत असतील आणि तुम्हाला हे माहित नसेल की, हे का झाले आहे, तर तुमचा लॅपटॉप हॅक झाल्याची संभावना आहे.

 

Laptop Virus.marathipizza1
wittyfeed.com

४. ब्राऊजरमध्ये संशयास्पद गतिविधी

 

browser-inmarathi
em360tech.com

जर तुम्हाला तुमच्या ब्राऊजरमध्ये संशयास्पद काहीतरी घडताना दिसल्यास, म्हणजे धोकादायक बुकमार्क, स्पॅमी होम स्क्रीन यासारख्या संशयास्पद गतीविधी घडताना लक्षात आले, तर हॅकर्सद्वारे तुमचा लॅपटॉप हॅक झाल्याची संभावना आहे.

५. कर्सर स्वतःहून पुढे सरकतो.

 

Mouse_Cursor-inmarathi
mejorimagen.eu

जर तुमच्या लक्षात आले की, तुमच्या स्क्रीनवरील कर्सर तुम्ही कमांड न देताना देखील आपोआप एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे, तर तुमचा लॅपटॉप हॅक झाल्याची संभावना आहे आणि तुमचा लॅपटॉप बाहेरून कोणीतरी रिमोटली ऑपरेट करत आहे.

६. प्रिंटरचे गैरवर्तन

 

Laptop Virus.marathipizza2
flickr.com

तुमचे प्रिंटरचे ड्रायव्हर्स योग्यरित्या इंस्टॉल झालेले असतील आणि सर्वकाही बरोबर असेल, तरीदेखील जर तुमचा प्रिंटर निश्चित कमांड घेत नसेल, तर तुमचा लॅपटॉप हॅक होण्याची भीती निर्माण होते.

७. अज्ञात वेबसाइटवर पुनर्निर्देशन

 

redirect-inmarathi
j26.com

तुमचा ब्राऊजर तुम्हाला काही अज्ञात वेबसाइटवर रिडायरेक्ट करत असल्यास समजून जा की, तुमचा पीसी हार्ड अँटी-व्हायरसने स्कॅन करायची किंवा फॉरमॅट करण्याची वेळ आलेली आहे.

८. इएक्सइ (EXE) फाइल्स

 

exe-inmarathi
bittrue.com

जर तुमच्या पीसीच्या सिस्टममध्ये सारख्या इएक्सइ (EXE) फाइल्स तयार होत असतील, काही फाइल्स वगळता, तर तो व्हायरस किंवा हॅक अलर्ट असू शकतो, यामुळे तुमचा काही मौल्यवान डेटा आणि फाइल्समध्ये फेरफार होऊ शकते किंवा त्या डिलीट होऊ शकतात.

९. वेबकॅम

जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपमधील वेबकॅमच्या बाजूची लाईट कोणतेही कारण नसताना ब्लिंकिंग होत असेल, तर याचा अर्थ की, कदाचित कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. असे असल्यास त्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर धोका निर्माण होऊ शकतो.

 

Laptop Virus.marathipizza3
digitizor.com

१०. पीसी वारंवार हँग होणे.

जर तुमच्या पीसीमध्ये स्टोरेज स्पेस चांगला आहे आणि रॅम देखील बराच खाली आहे आणि तरीदेखील तुमचा पीसी वारंवार हँग होत आहे किंवा संशयास्पद काहीतरी बॅकग्राउंडला चालू आहे.

 

hang-inmarathi
club.com

तसेच, आपले इंटरनेट आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही आहे किंवा खूप धीम्या गतीने चालत आहे. तर तुमच्या पीसीवर कोणीतरी कंट्रोल ठेवून आहे, हे यावरून दिसून येते.

अश्या या १० गोष्टी घडल्यावर तुम्हाला तुमचा पीसी हॅक झालेला आहे, असे समजून येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?