अमेरिकेच्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणारी १० बंदूकरुपी शस्त्रे !
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
जगातील प्रत्येक देशाला स्वतंत्र असा इतिहास आहे, तसाच गौरवशाली इतिहास आहे अमेरिका देशाला! तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी देखील या इतिहासाची उजळणी केली असेल आणि त्या पासून प्रेरणा देखील घेतली असेल. इतर सर्वच देशांप्रमाणे या देशाला देखील संघर्ष करावा लागला होता, रक्ताचे पाट वाहावे लागले होते, तेव्हा कुठे अमेरिकन इतिहास लिहिला गेला. या रक्तरंजित इतिहास रचण्यात हातभार लावला अमेरिकन शस्त्रांनी. त्यात बंदुकींचे योगदान तर दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही.

शत्रूशी लढा देताना या बंदुकींनी अमेरिकेतील लोकांसाठी ढालीचे काम केले. रिव्हॉल्व्हर, रायफल, पिस्तुल अश्या नानाविविध प्रकारच्या बंदुकी आजही अमेरिकन इतिहासाची साक्ष देतात. म्हणूनच की काय आजही अमेरिकन्सचे बंदुकींवरील प्रेम काही कमी झालेलं नाही. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही खरी गोष्ट आहे की, अमेरिका जगातील एकमेव असे राष्ट्र आहे जेथील दर शंभरपैकी ९० लोकांकडे बंदूक असते आणि मुख्य म्हणजे त्या शस्त्राचा परवाना देखील त्यांच्याजवळ असतो.
अमेरिकन बनावटीच्या बंदुकींच्या रंजक गोष्टी सांगणारं ‘अमेरिकन गन’ नावाचं एक पुस्तक देखील आहे… हे पुस्तक अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट स्नायपर क्रिस काइल याने लिहिलं होतं. क्रिस काईलबद्द्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा:
१५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा डेडलीएस्ट स्नायपर!
चला तर मंडळी आज आपण जाणून घेऊया अमेरिकन इतिहासातील सर्वोत्कृष्ट बंदुकींविषयी!
१) विंचेस्टर रायफल

अगदी सुरुवातीला ही रायफल वापरण्यात आली होती. कोल्ट रिवॉल्व्हर प्रमाणेच या बंदुकीत गोळ्या भरता येतात. या बंदुकीची विशेष गोष्ट म्हणजे हिची मारक क्षमता अन्य बंदुकांच्या तुलनेत जास्त आहे. अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष टेडी रूजवेल्ट यांची ही आवडीची रायफल होती.
M1 गरांड

ही पहिली स्टॅण्डर्ड सेमी-ऑटोमॅटिक रायफल होती. या रायफलचा दुसऱ्या महायुद्धात आणि कोरियन वॉरमध्ये मोठ्या प्रमाणात वापर झाला होता.
M1911 पिस्तुल

ही 0.४५ कॅलिबरची पिस्तुल आहे. ही पॉवरफुल तर आहेच तसेच ती टिकाऊही आहे. १९११ ते १९८५ पर्यंत ही पिस्तुल अमेरिकन लष्करात होती. लष्काराचे विशेष पथक, नौदलाचे ‘इलाईट यूनिट्स’ आणि मरीन कोर्प्समध्ये देखील ही वापरली जात होती.
अमेरिकन लॉन्ग रायफल

ही रायफल वजनाने खुप हलकी आहे. विशेष म्हणजे ही किंमतीने स्वस्त असून शत्रूचा अचूक वेध घेते. ‘रिव्होल्यूशनरी वॉर’मध्ये याच बंदुकच्या जोरावर अमेरिकेने ब्रिटनवर मात केली होती.
०.३८ स्पेशल पोलिस रिवॉल्व्हर

ही डबल अॅक्शन रिवॉल्व्हर होती. हिला वापरताना हॅमर मागे ओढण्याची गरज भासत नाही. यापूर्वी आलेल्या सर्व रिवॉल्व्हर चालवण्यासाठी ट्रिगर दाबण्यापूर्वी हॅमर मागे ओढल्यानंतर गोळी चालत होती.
थॉम्पसन सब-मशीनगन

पहिल्या महायुद्धात सैनिकांद्वारे तसेच गॅंगस्टरद्वारा मोठ्या संख्येने वापरली जाणारी ही बंदूक होती. वापरणारे या बंदुकीला प्रेमाने ‘टॉमी गन’ म्हणूनही संबोधत असत. एका मिनिटात ०.४५ कॅलिबरच्या १५०० राउंड गोळ्या यातून फायर केल्या जात होत्या.
M16 रायफल

सगळ्यात आधी व्हियतनाम वॉरमध्ये ही वापरण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर तिचा फारसा प्रभाव पडू शकला नाही. शीतयुद्ध असो अथवा इराक-अफगानिस्तान वॉर, ही रायफल अमेरिकन सैनिकांचे आवडते शस्त्र होती.
स्पेंसर रिपिटिंग रायफल

अमेरिकन ‘सिव्हिल वार’मध्येही ही बंदूक वापरण्यात आली होती. अमेरिकन यूनियनचे सैनिक या बंदुकीच्या माध्यमातून एका मिनिटात २० राउंड फायर करू शकत होते.
कोल्ट सिंगल अॅक्शन आर्मी रिवॉल्व्हर

अमेरिकन लष्कराने या रिवॉल्व्हरचे डिझाईन तयार केले होते. या ऐतिहासिक बंदुकीची निर्मिती ‘कोल्ट’ या कंपनीने केली होती.
M1903 स्प्रिंगफील्ड

ही एक बोल्ट अॅक्शन रायफल आहे. यात पाच राउंड असलेली मॅगझीन लावली जात होती. पहिल्या जागतिक युद्धात या रायफलचा वापर झाला होता. या रायफलच्या जोरावर अमेरिकेने परकीय देशांवर विजय मिळवला होता.
आज कित्येक नवनवीन बनावटीच्या बंदुकी बाजारात उपलब्ध आहेत, पण मंडळी या १० बंदूकींना हातात घेतल्यावर अंगावर जो शहार येतो, जी शान वाटते, तो रोमांचकारी अनुभव आजच्या बंदुकींमध्ये नाही हे देखील तेव्हढेच खरे!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page