खरा इतिहास उलथवून टाकणारे हे १० चित्रपट कोणते आहेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

पुस्तके हा सगळ्यात मोठा माहितीचा स्रोत आहे. ज्यांना वाचनाचा कंटाळा आहे त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने माहिती पुरवण्याच्या क्लृप्त्या शोधाव्या लागतात.

शाळेतल्या शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याला एखादा अभ्यासक्रम शिकवताना अशाच क्लृप्त्यांचा वापर करतात. आपल्याही आयुष्यात कित्येक गोष्टीबद्दल माहिती मिळवताना आपण सोप्या पद्धतीचा अवलंब करतो.

हॅरी पॉटर हा सगळ्यांचा आवडता विषय…! त्याच्या चाहत्यांनी जे के रोलिंगची सगळी पुस्तके वाचून काढली असतील. पण काहींनी त्या पुस्तकांवर निघालेले सिनेमे पाहण्यास पसंती दिली.

पुस्तक वाचताना एखादा प्रसंग डोळ्यासमोर कधी उभा राहत नसेल पण तोच जर सिनेमाद्वारे पाहता आला तर खूप मजा येते. हॅरी पॉटरच्या पुस्तकातील सगळी फँटसी चित्रपटाद्वारे आपल्या नजरे समोर जिवंत झाली.

ती जादू आपल्याला अनुभवता आली.

 

harry potter inmarathi

 

अशीच गोष्ट इतिहासाची आहे. आपल्याकडे इतिहासाला खूप महत्व दिले जाते. अभ्यासक्रमात इतिहासाला महत्वाचे स्थान आहे. कित्येक मोठमोठी व्यक्तिमत्वे आपल्याला इतिहासाच्या विषयात अभ्यासावी लागतात.

पण ज्यांना इतिहास हा विषयच आवडत नाही त्यांना इतिहासावरील सिनेमा हा चांगला पर्याय आहे. हॉलिवूड, बॉलिवूड आणि इतर सिने इंडस्ट्री मध्ये अशा ऐतिहासिक पात्रांवर भरपूर सिनेमे बनत असतात.

महान स्त्री पुरुषांवर सिनेमे जेव्हा बनतात तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाचे किस्से सिनेमात असणे ही लोकांची अपेक्षा असते. पण हल्ली सिनेमॅटिक लिबर्टी ह्या गोंडस नावाखाली सिनेमांमध्ये काहीही दाखवण्याची हिम्मत डायरेक्टर, प्रोड्युसर करतात.

कित्येक वेळा खलनायकाचेच उदात्तीकरण झालेले आपण बघतो. तर काही वेळेला महान व्यक्तीच्या कमी महत्वाच्या प्रसंगांना मोठे करून त्यांचे मोठेपण झाकोळले जाते.

 

300 inmarathi
bsnl hungama

 

आपण बायोपिकच्या नावाखाली बऱ्याचदा चुकीची माहिती पडद्यावर पाहिलेली आहे. कोणकोणते सिनेमे आपली अशी फसगत करतात? चला पाहूया.

 

१. बाजीराव मस्तानी

संजय लीला भन्साळीचा कित्येक वर्षे रखडलेला सिनेमा म्हणजे बाजीराव मस्तानी. श्रीमंत पेशवा बाजीराव हा अत्यंत कर्तृत्वान असा शिवरायांच्या स्वराज्याचा सेवक होऊन गेला.

वयाच्या अवघ्या ४० वर्षात ४४ लढाया लढल्या आणि त्यातील एकही लढाईमध्ये बाजीरावास कोणी मात देऊ शकला नव्हता. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला फक्त मस्तानीच्या प्रेमात आकंठ बुडालेला दाखवून त्याचे चारित्र्यच बदनाम करण्यात चित्रपटाने कसून मेहनत घेतली.

त्यातच एका पायाने अधू असणाऱ्या काशीबाईसाहेब ह्या कुलीन पेशवीण बाई मस्तानी सारख्या कथित नाचणारी सोबत पिंगाच घालताना ह्या चित्रपटाच्या कथेत दिसते. ज्याला कसलाच सत्यतेचा आधार नाही.

मुळात मस्तानी आणि बाजीरावांचे संबंध पण कल्पनातीतच आहेत. त्याला ठामपणाने सत्याचे रूप या चित्रपटात दिले आहे.

 

bahirao mastani inmarathi
bollybrit

 

२. पद्मावती/पद्मावत

संजय लीला भन्साळीला पडलेले दुसरे स्वप्न म्हणजे पद्मावत सिनेमा. शूटिंगच्या सुरुवाती पासूनच विवादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट सगळ्यानाच माहीत आहे.

राणी पद्मवतीची कथा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण ती खरी का खोटी हे अजूनही कोणी सांगू शकले नाहीये. पण राजस्थानी कुलीन स्त्रिया कोणासमोर घुमर नृत्य करत नसत.

 ते गाणे सिनेमातून काढून टाकावे अशी मागणीही कित्येक लोकांनी केली होती.

पण चित्रपटात ते गाणे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात दाखवलेला खिलजी मात्र जसा होता तसाच क्रूर दाखवण्यात आला हे नशीब.

 

padmavat inmarathi
india today

 

३. अशोका

हा सम्राट अशोकाच्या जीवन कहाणीवर बेतलेला चित्रपट..! हिंदू धर्मियांचा सम्राट असलेला अशोक प्रचंड नरसंहार झालेल्या लढाई नंतर खूप पस्तावतो आणि शांतिमार्ग दाखवणारा बौद्ध धर्म स्वीकारतो.

नंतर राजत्याग करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो.

पण हा सिनेमा मात्र करीना कपूरच्या काल्पनिक पात्राभोवती फिरतो. अशोकाचे प्रेमसंबंध मजेने रंगवून रंगवून ह्या चित्रपटात दाखवले आहेत. त्याच्या सत्यतेची पडताळणी सुद्धा केली नाही.

थोडक्यात काय तर हिरो-हिरोईन आणि खलनायक अशा पद्धतीच्या मसाला पटाचीच बांधणी होती.

 

ashoka inmarathi
sacnilk

 

४. जोधा अकबर

अकबर हा मुघलांचा भारतावर राज्य करणारा प्रसिद्ध शहेनशाह. अकबर जरी भारतात जन्माला आला असला तरी शेवटी मुघलच होता. क्रूरपणा रक्तात भिनलेल्या मुघलांचा वंशज फार वेगळा कसा असेल..?

पण जोधा अकबर सिनेमात ग्रीक गॉड सारखा दिसणारा अत्यंत हँडसम हंक हृतिक रोशन अकबराच्या भूमिकेत घेतला. इथेच खरे तर सिनेमाचा खोटेपणा उघडा पडतो. इतका सुंदर आणि सशक्त अकबर?

खरे तर बिरबालाला कायम युक्त्या आणि क्लृप्त्या लढवून साध्या साध्या गोष्टी अकबराला पटवून देण्यासाठी मुशक्कत करावी लागायची हे आपण जाणतोच.

पण ह्या सिनेमातला अकबर फारच हुशार आणि प्रेमळ असा मुघल राजा दाखवण्यात आला होता.

एक प्रकारे हे भारतावर सत्ता गाजवणाऱ्या खलनायकाचे उदात्तिकरणच म्हणता येईल.

बरे, जोधा बरोबरचा विवाह ही अकबराची नेहमीची राजकीय खेळी होती. त्याच्या भरपूर बेगम होत्या आणि कोणा राजकन्येबरोबर विवाह करणे म्हणजे प्रेमप्रकरण नसून आपली सत्ता वाढवण्यापालिकडे कोणताही हेतू नसायचा.

पण जोधा अकबर हा अगदी सुंदर असा रोमँटिक सिनेमा होता. ज्यात अकबर जोधाच्या प्रेमात वेडा दाखवला होता.

 

jodha akbar inmarathi
netflix

 

५. मोहेंजोदरो

जुन्या काळाला पडद्यावर दाखवण्यात काही डायरेक्टरना खूप मजा वाटते. त्यासाठी ते खूप मेहनतही घेतात.

मोहेंजोदरो सारख्या चित्रपटात त्यावेळचे इन्ड्स वॅली सिविलायझेशन दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केला होता.

पण हे सगळे करण्याच्या नादात हा सिनेमा नकळत एक मजेशीर सिनेमा बनला होता. हा सिनेमा देखील प्राचीन संस्कृती दाखवण्यापेक्षा एक रोमँटिक प्रेमकथाच बनून राहिला.

 

mohenjo daro inmarathi
DNA india

 

६. ग्लॅडीएटर

इतिहासाशी छेडखानी करणे हा परदेशातही खेळला जाणारा खेळ आहे. ग्लॅडीएटर नामक सिनेमात कॉमोडस नावाच्या राजाबद्दल चुकीची माहिती दाखवली आहे.

ह्या राजाने १३ वर्षे राज्य केले होते पण सिनेमात मात्र २ वर्षात त्याचा कार्यकाल उरकला आहे. त्याला दाढी होती पण ह्या सिनेमातील हिरोने दाढी न ठेवता गुळगुळीत चेहरा ठेवला होता.

रोमन राज्य कारभाराबद्दलही काही चुकीचे सीन घातले होते.

 

gladiator inmarathi
TV overmind

 

७. किंग आर्थर

ह्या सिनेमाची कथाच बदलून टाकली आहे असे म्हटले जाते. आर्थर राजाच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी टाळून सिनेमाच्या डायरेक्टर ने आपल्या मनाची कहाणी बनवून दाखवली आहे.

 

king arthur inmarathi
change,org

 

८. ब्रेव्हहार्ट

ह्या चित्रपटात मेल गिब्सन हा सर वॉलस ह्यांच्या चरित्रापेक्षा वेगळाच वाटतो. सर वॉलस हे एक कुलीन स्कॉटिश कुटुंबातील सदस्य होते तर चित्रपटात मेल गिब्सनला एखाद्या आदिवासी माणसाप्रमाणे दाखवण्यात आले होते.

 

brave 2 inmarathi
into film

 

९. ३००

ह्या सिनेमाचे विडंबन आपण पहिलेच आहे. पण हा सिनेमा देखील राजा लिओनायडसची सत्यता दाखवताना कमी पडतो. खरे तर जास्तच कमी पडतो म्हणायला हरकत नाही.

कारण सिनेमातील राजा खऱ्या राजापेक्षा खुपच जास्त कर्तृत्ववान आणि शूरवीर दाखवला गेला आहे.

 

300-inmarathi

 

१०. क्लिओपात्रा

क्लिओपात्राच्या प्रेमकहाण्यांबद्दल आपण सगळेच जाणून आहोत. तिच्या प्रेमात इतके जण पडले म्हणजे ती नक्कीच कोणी रूपवती असावी असा आपला समज होतो आणि चित्रपट त्याची पूर्तता करतो.

पण सत्यात क्लिओपात्रा ही फार काही सुंदर ललना वगैरे नव्हती असे  इतिहास सांगतो.

 

cleopatra inmrathi
yahoomovies.ok

 

हे सगळे चित्रपट इतिहासावर आणि ऐतिहासिक पत्रांवर बनवण्यात आलेले आहेत. पण खरा इतिहास दाखवण्यापेक्षा रंजक पद्धतीनेच हे सिनेमे आपल्यासमोर आले होते. आपण ते मजेने पाहिलेही.

पण हाच तो खरा इतिहास असा मात्र गैरसमज नसावा म्हणून हा लेखप्रपंच..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?