' या १० वैशिष्ट्यांमुळे सुषमा स्वराज इतर राजकारण्यांसमोर उठून दिसतात! – InMarathi

या १० वैशिष्ट्यांमुळे सुषमा स्वराज इतर राजकारण्यांसमोर उठून दिसतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल निधन झाले. निश्चितच भारतीय राजकारणाला हादरा देणारी ही बातमी होती.

 

sushma swaraj 1 inmarathi
NDTV

सुषमा स्वराज ह्या एक कर्तृत्ववान व रणझुंजार नेत्या होत्या, त्यांची राजकीय कारकीर्द ही संघर्षाचा किनारा असलेली आहे. त्यांनी आपल्या कामातून अनेकांना आदर्श घालून दिला आहे.

त्यांच्या सारख्या कर्तबगार महिलेच्या ह्या अकाली एक्सिटमुळे भारतीय राजकारणाची हानी झाली आहे. सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकीर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यावर त्यांच्या महानतेची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या १० ठळक बाबीं ज्या त्यांना खऱ्या अर्थाने “आयर्न लेडी” बनवतात.

१) सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री

सुषमा स्वराज ह्यांना वयाच्या २५ व्या वर्षी कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळाला होता. त्या तरुण वयातच राजकारणात आल्या, काही काळातच त्यांनी राजकारणात यश मिळवलं. १९७७ ते १९७८२ सालपर्यंत हरियाणा विधीमंडळाच्या अंबाला विधानसभा क्षेत्रातून सदस्या होत्या.

 

sushma swaraj 2 inmarathi
Unnatti Skills

पुढे हरियाणातील मुख्यमंत्री देवी लाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी असलेल्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात आलं होतं.

२) वाजपेयींच्या शासनात मिळालं केंद्रीय मंत्रिपद

१९९६ साली निवडून आलेल्या ११ व्या लोकसभेत त्या दक्षिण दिल्ली मतदारसंघातुन निवडून आल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारात त्यांना माहिती व प्रसारण मंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती.

 

sushma swaraj 3 inmarathi
Indian Express

३) सोनिया गांधींविरोधात लढवली होती निवडणूक

१९९९ च्या १३ व्या लोकसभेसाठी सप्टेंबरमध्ये निवडणुका झाल्या, ह्या निवडणुकित कर्नाटकातील बेल्लारी मतदारसंघात सोनिया गांधींच्या विरोधात सुषमा स्वराज यांना उमेदवारी देण्यात आली होती.

 

sushma swaraj 4 inmarathi
India TV

ह्या निवडणुकीत आपल्या १२ दिवसांच्या प्रचार सभेत सुषमा स्वराज यांनी आपली सर्व भाषणं कन्नड मधून केली होती. जनतेचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. परंतु केवळ ७% मार्जिन ने त्यांचा पराभव झाला होता.

४) झुंझार विरोधी पक्षनेत्या आणि स्वार्थहीन प्रवृत्तीची मुर्ती

१५ व्या लोकसभेच्या सुषमा स्वराज ह्या विरोधी पक्षात होत्या. विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांची कारकीर्द खूप गाजली होती. त्यांनी लोकसभेत केलेल्या त्वेषपूर्ण भाषणांनी विरोधकांना घाम फोडला होता.

 

sushma swaraj 5 inmarathi
CNBC

२०१४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माघार घेऊन नरेंद्र मोदींना मार्ग मोकळा करून दिला होता. नरेंद्र मोदी हे संसदीय राजकारणात नवखे होते तर सुषमा स्वराज ह्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून पक्षनिष्ठा बाळगून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं.

५) कर्मयोगी परराष्ट्रमंत्री

२०१४ साली नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना परराष्ट्रमंत्री पदाची धुरा त्यांना सोपविण्यात आली होती. त्यांनी ती जबाबदारी नुसती यशस्वीरित्या पेललीच नाही तर त्यांनी एक आदर्श घालून दिला होता.

 

sushma swaraj 6 inmarathi
New Track English

त्यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठं महत्व प्राप्त झालं. त्यांनी आपल्या राजकीय मुत्सद्दिची प्रचिती वेळीवेळी करून दिली आहे.

६) जनसेवक लोकनेत्या

सुषमाजींनी परराष्ट्र मंत्री पदाची धुरा नुसती व्यवस्थित सांभाळली नाहीच, तर त्यांनी वेळोवेळी संकटसमयी देश विदेशात अडकलेल्या भारतीयांना मदत करून आपल्या कर्तव्यनिष्ठेची प्रचिती करून दिली आहे.

 

sushma swaraj 7 inmarathi
Twitter

कोणाचा व्हिसा इश्यु असेल, कोणाचा पासपोर्ट इश्यू असेल, कुठल्याही अडचणीच्या वेळी सुषमा स्वराज धावून येत असत.

७) ९०००० संकटग्रस्त भारतीयांची केली होती सुटका

जगभरात विविध कारणांसाठी संकटात सापडलेल्या तब्बल ९०००० भारतीयांची सुखरूप सुटका सुषमा स्वराज यांनी केली होती. आपल्या राजकीय मुत्सुदेगिरीच्या बळावर त्यांनी हे यशस्वी करून दाखवलं होतं.

 

sushma swaraj 8 inmarathi
Youth Ki Awaz

भारतीय नव्हे पाकिस्तानी नागरिकांची देखील सुटका सुषमा स्वराज यांनी केली होती. आपल्या अद्वितीय कार्याने त्यांनी भारतीय राजकीय पटलावर एक वेगळीच छाप सोडली होती.

८) डोकलाम प्रकरणात धाडसी प्रवृत्तीचं दर्शन दाखवलं होतं.

भारतीय हद्दीत येणाऱ्या डोकलाम प्रदेशात चीन ने खोडसाळपणे घुसखोरी केली होती. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवलं होतं.

 

Sushma Swaraj 9 Inmarathi
Rediff.com

त्यांच्या प्रयत्नांनी चीनला माघार घेण्यास भाग पाडलं होतं. त्यांनी अंतराराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाणं जोरात वाजवलं होतं. त्यांनी संयुक्त राष्ट्रात भारताची भूमिका खंबीरपणे मांडली होती.

९) पाकिस्तानमध्ये असलेल्या रूग्णांना भारतीय व्हिसा उपलब्ध करून दिला.

पाकिस्तानात वैद्यकीय सुविधांचा अभावामुळे तेथील अनेक रुग्णांना भारतात वैद्यकीय चिकित्सेची गरज भासत होती. पण भारताचा व्हिसा मिळवणे त्यांच्यासाठी अवघड होऊन बसले होते.

 

sushma swaraj 10 inmarathi
Hindustan Times

तेव्हा त्यांनी सुषमा स्वराज यांचे दार ठोठावले, सुषमाजींनी त्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून देत, मानवतेच्या भावनेचे दर्शन घडवलं होतं.

१०) जागतिक इस्लामिक राष्ट्र समन्वय परिषदेत भारताचा डंका वाजवला होता.

२०१८ साली झालेल्या जागतिक इस्लामिक राष्ट्रांच्या समन्वय परिषदेत ( OIC) त्यांनी पहिल्यांदाच भारताची भूमिका मांडली होती.

 

sushma swaraj 11 inmarathi
Hindustan Times

एरव्ही पाकिस्तान ह्या परिषदेत भारताच्या नावाने कुचेष्टा करायचा पण भारतातर्फे सुषमा स्वराजींनी भूमिका मांडली होती. त्यांनी तिथे गीतेचे काही स्तवन म्हणत, हिंदू धर्माचे तत्वज्ञान तिथे उपस्थित राष्ट्रांच्या समोर मांडलं होतं.

अश्याप्रकारे सुषमा स्वराज यांनी आपल्या कारकिर्दीत एक वेगळा आदर्श तर निर्माण तर केलाच पण त्यांनी मेहनती व प्रेमळ स्वभावाने पक्ष व सीमा पल्याड देखील नाते बनवले होते. त्या सदैव स्मरणात राहतील यात शंका नाही.

 ===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?