९ ते ५ च्या नोकरीचा कंटाळा आलाय? भारतातल्या या १० सर्वात ‘निवांत’ नोकऱ्या तुमच्यासाठी आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 


तोच तोच रुटीन जॉब करून कंटाळा आलाय ?  निवांत काम करण्याची इच्छा आहे ?  ९ ते ५ याव्यतिरिक्त तुमच्या सवडीने काम करू इच्छिता? लोक काय म्हणतील? तो शाम काकांचा सोनू बघ किती मोठा झाला? अशी इतरांशी तुलना नकोय…

स्वतःच्या मर्जीने करिअर निवडू इच्छिता… स्वतःच्या अटीवर नोकरी करू इच्छिता? फिरण्याची हौस आहे? वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आहे? मग तुमच्यासाठी आहेत हे काही खास जॉब्ज…….

होय एक दोन नव्हे तब्बल दहा  प्रकारच्या या नोकऱ्या अश्या आहेत जिथे तुम्हीच असाल तुमचे बॉस आणि तुम्हीच ठरवणार पगार किती घ्यायचा… म्हणजे काय ही तर अलिबाबाची जादुई गुहाच झाली! हो ना! चला तर मग बघूया …

अलीबाबाच्या या जादुई गुहे मागे दडलंय तरी काय ?

खरं तर पहिला प्रकार वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, हसू येईल पण, भारतासारख्या देशात हे शक्य आहे… हे तुम्हालाही पटेल.

१. टी टेस्टर

जर तुम्हाला कुणी मस्तपैकी एक कप चहा दिला आणि वरून तो पिल्याबाद्द्ल पैसे दिले तर?


 

tea tester inmarathi
BQ Live

आश्चर्य वाटलं ना….हो पण हा देखील जॉब उपलब्ध आहे. फक्त तुम्हाला चहा, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्यांचा स्वाद आणि अर्थातच चव ओळखण्याची कला हवी.

2. फूड फ्लेवरीस्ट

तुम्हाला वेगवेगळे पदार्थ एकमेकांत मिक्स करून नवनवे प्रयोग करण्याची आवड आहे? तर मग अनेक, प्रकारचे उद्योग जसे की, सौंदर्य प्रसाधने, खाण्यायोग्य पदार्थ बनवणारे उद्योग, परफ्युम्सचा फ्रॅग्रन्स ठरवणारे उद्योग अशा अनेक ठिकाणी तुम्हाला मागणी आहे.

 

food flavourist inmarathi
HookedUpon

कुणाल विजयकर, रॉकी सिंघ आणि मयूर शर्मा यांनी याच क्षेत्रात आपले करिअर उभे केले आहे. खाण्याचा शौक प्रत्येकाला असतोच पण, काही जण त्याचादेखील व्यवसाय करत आहेत.

खाण्याचा पदार्थ फक्त चविष्ट असून चालत नाही तर, तो सुंदर ही असला पाहिजे…तयार केलेल्या डीश सजवणे ही देखील एक कला आहे. रशींना मुन्शॉव ही अशीच फूड स्टायलीस्ट आहे.

पदार्थांची निराळी चव, त्यांना सजवण्याची पद्धत याविषयी ती ब्लॉग लेखन करते आणि त्यातून भरपूर पैसे देखील कमावते.

३. कॉमेडीयन

कॉमेडी शो करणे हा एक खरोखर चांगला व्यवसाय आहे. यासाठी तुमच्याकडे भरपूर अभ्यास आणि अपडेट नॉलेज असणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घेऊ शकाल. भरपूर मजा आणि पैसा दोन्हींचा फायदा घेऊ शकता.

४. ब्लॉगर

भारतात ३०० दशलक्ष पेक्षा जास्त स्मार्टफोन आहेत आणि ५०० दशलक्षहून अधिक इंटरनेटशी जोडलेली साधनं आहेत. ज्यामुळे अधिकाधिक कंटेंट विकला जाण्याची शक्यता आहे. अमित अगरवाल नावाचा तरुण टेक-ब्लॉग लॅबनॉल.

 

blogger inmarathi
Entrepreneur

ऑर्ग नावाची वेबसाईट चालवतो. तो महिन्याला ६०,००० डॉलर इतके पैसे कमावतो. हे पैसे आयआयटीमध्ये शिकून जॉब करणाऱ्या तुमच्या कोणत्याही नातेवाईकांपेक्षा निश्चितच जास्त आहेत.

मुंबईमधील मानिनी अगरवाल, अशा पद्धतीचं आयुष्य जगतेय जे आपल्यापैकी हजारो जण जगण्याची इच्छा बाळगतात.

एक लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा एवढ्याच साधनावर, अगरवाल बॉलीवूड, नाईटलाइफ, फॅशन, प्रवास, आणि यादरम्यान येणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल लिहिते. मिस मालिनी हे या क्षेत्रातील एक बडं प्रस्थ आहे म्हणल्यास योग्य ठरेल.

५. इव्हेंट प्लॅनर

काही ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंटचे कोर्सेस घेतले जातात. यासाठी तुमच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पनांचा खजिना असला पाहिजे. भारतात अवाढव्य पद्धतीने होणारे लग्न सोहळे हे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.

६. कादंबरीकार

या क्षेत्रात देखील अनेक लोकांनी पैसा आणि नाव दोन्ही कमावले आहे.

 

novelist inmarathi
NY Book Editors

दर्जोय दत्ता, आमिष त्रिपाठी आणि अशी अनेक नवे घेता येतील. यासाठी तुमच्याकडे सृजनशील लेखन कौशल्य असणे गरजेचे आहे.

परन्तु, जर तुम्ही आयआयटी किंवा आयआयएम मधून शिक्षण घेतले असेल तर, तुमची कांदबरी विकण्यास त्या कौशल्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. चेतन भगत हे एक नाव घेतले तरी या क्षेत्रात प्रसिद्धी आणि पैसा यांचा केवढा मोठा स्त्रोत आहे हे लक्षात येईल.

७. ट्रॅव्हल प्रेजेंटर

ट्रॅव्हल प्रेजेंटर होणे तसे फार अवघड काम आहे. वर्षातील ४२ आठवडे तुम्हाला घरापासून दूर राहावे लागेल. परंतु, यातून तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकी, कमाई होऊ शकते.

 

travel presentar inmarathi
An Adventurous World

यासाठी तुम्हाला नवनव्या ठिकाणी प्रवास करावा लागेल आणि नवनव्या लोकांना भेटावे लागेल.

अर्थात अशा पद्धतीने घरापासून दूर राहिल्याने घराच्या आठवणी छळत राहतात. परंतु, आपल्यापैकी अनेकजण याप्रकारची भावना कशी हाताळावी हे जाणतोच.

८. खरेदी करा आणि पैसे कमवा

मिस्टरी शॉपींग हे काहीं लोकांसाठी पैसा कमवण्याचे साधन आहे. अशा प्रकारे खरेदी करण्यासाठी या कंपन्या कामगार शोधतात.

 

mystery shopper inmarathi
BARE International

हे कामगार या कंपन्यांचे प्रोडक्ट्स शॉप असतील तिथे खरेदीला जातात आणि खरेदी करून झाल्यानंतर बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे लिहितात.

यासाठी जे काही पैसे खर्च होतात ते त्यांना परत दिले जातात आणि तुम्ही त्या कंपनीसाठी किती योग्य आहात यावरून तुम्हाला पुन्हा जॉब द्यायचा की नाही हे ठरवले जाते. मुंबई मध्ये असे अनेक मिस्टरी शॉपर्स आहेत.

९. गेम टेस्टर


वेगवेगळे व्हिडिओ गेम, मोबाईल गेम बनवणार्या अनेक कंपन्या आहेत. अशा कंपन्या नवे गेम बाजारात लॉंच करण्यापूर्वी त्यांची टेस्ट घेते. जॉब टायटल मध्ये सुचवल्या प्रमाणे तुम्ही ज्या गेमची डिझाईन बनवणे सुरु असते असे गेम खेळायचे आणि त्यातील त्रुटी कंपनीला सांगायच्या.

१०. केअर टेकर

या प्रकारचा जॉब भारतात अव्हेलेबल नाही. परन्तु, दोन भारतीयांनी यामध्ये जॉब मिळवला आहे. सगळ्यात भारी आणि माजेशीर असा हा जॉब, टुरीजम क्वीन्सलँड यांनी ग्रेट बॅरीअर रीफ हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध करून देण्यासाठी दिला आहे.

 

care taker inmarathi
www.smithsonianmag.com

ऑस्ट्रेलियन आइसलँड किनार्याची देखभाल करण्याच्या या नोकरीसाठी जगभरातून ३४,००० अर्ज आलेले आणि या व्यवसायातून २०० दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे.

गलेलठ्ठ पगार, सोबत अलिशान बंगल्यात राहण्याची सोय आणि आजूबाजूच्या प्रदेशात फिरण्याचा खर्च आणि याबदल्यात या पर्यटन स्थळाचे प्रमोशन करणे, फोटो, व्हिडीओ अपलोड करणे,ब्लॉग लिहित राहणे हेच काम करत राहायचं.

आहे की नाही, सगळ्यात भारी आणि मजेशीर जॉब!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?