जगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लष्कर हे कोणत्याही देशाचा महत्त्वाचाच भाग आहे. याच्या वेगवेगळ्या शाखा देशाची सुरक्षा करत असतात.

समुद्री सीमा असलेल्या देशांमध्ये नौसेनेचे विशेष महत्त्व असते. जगातील अनेक देश आपल्या नौसनेच्या सन्मानार्थ वेगवेगळे दिवस साजरे करतात.

भारतात ४ डिसेंबरला ‘नेव्ही डे’ साजरा केला जातो.

आज आपण जगातील विविध देशाच्या सर्वोत्तम नौदलांबद्दल जाणून घेऊया.

अमेरिकेचे नौदल

 

navy-maarathipizza01
warontherocks.com

अमेरिकेचे नौदल जगातील सर्वात बलाढ्य नौदल आहे. १० विमानवाहक, २२ क्रूजर यांसोबत लांब आणि रुंद पाणबुडी असणार्‍या अमेरिकेच्या नौदलाजवळ यावेळी ३४१ युद्धनौका आणि ३,२३,७०० सैन्यांची  ताकद आहे.

 

रशिया नौदल

 

navy-maarathipizza02
themoscowtimes.com

रशियाचे नौदल जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात शक्तीशाली नौदल आहे. रशियाचे सरकार आपल्या अर्थव्यवस्थेतील एक मोठा भाग लष्करावर खर्च करते.

सध्या रशियाकडे जवळपास २०३ युध्द नौका आहेत.

 

पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही, चीन

 

navy--InMarathi03
jeffhead.com

जगातील सर्वात शक्तीसाली नौदलामध्ये चीनचे नौदल तिसर्‍या क्रमांकावर आहे.

आगामी महाशक्ती मानल्या जाणार्‍या चीनमध्ये सर्वच लष्कर खुपच शक्तीशाली आहे. या वेळी चीनमध्ये एकूण २३६ युद्धनौका आणि २,५०,००० सैन्याची ताकद आहे.

 

जपानी नौदल

 

navy-maarathipizza04
cdn.newsapi.com.au

जपानचे नौदल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तीशाली नौदल आहे.

जपानने चीन, अमेरिका, रशिया आणि इराणवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. जपान नौदलात सध्या एकूण १०९ युद्धनौका आणि ४५,८०० सैन्य आहे.

 

रॉयल नेव्ही, ब्रिटेन

 

navy-maarathipizza05
express.co.uk

ब्रिटनची रॉयल नेव्ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात शक्तीशाली नौदल आहे. ब्रिटन यावेळी दोन नवीन विमान वाहक एचएमएस क्वीन एलिझाबेथ आणि एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स यांची निर्मिती करत आहे.

सध्या ब्रिटनजवळ एकूण १०० युध्द नौका आणि ३६,६०० सैन्यदल आहे.

 

फ्रेंच नेव्ही, फ्रांस

 

navy-maarathipizza06
navaltoday.com

फ्रान्सचे नौदल जगातील सहावे शक्तीशाली नौदल आहे. फ्रान्सला मोठा युध्द इतिहास आहे.

यासोबतच जगातील अनेक भागातील युध्दातही फ्रान्सने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या वेळी फ्रान्सजवळ एकूण ७२ युध्दनौका आणि ४४,००० सैन्याची ताकद आहे.

 

भारतीय नौदल, भारत

 

navy-maarathipizza07
indiannavy.nic.in

दोन विमानवाहक आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्य सोबतच भारतीय नौदल सातव्या क्रमांकावर आहे. यावेळी भारतीय नौदलाजवळ ५५ युद्धनौका आणि ५८,३५० सैन्य आहे.

 

रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्ही, दक्षिण कोरिया

 

navy-maarathipizza08
i.ytimg.com

दक्षिण कोरिया आकाराने छोटा देश असेल, मात्र या यादीत या देशाचे नौदल आठव्या क्रमांकावर आहे.

या देशाचे नौदल खुपच मोठे असण्यासोबतच अत्यंत आधुनिक आहे. याचे मुख्य कारण याच्या शेजारील देशांशी याचे असलेले संबंध. दक्षिण कोरीयाच्या नौदलात ७० युध्दनौका आणि ६८,००० सैन्य आहे.

 

मरीना मिलिटेयर, इटली

 

navy-maarathipizza09
ilgiornale.it

इटलीचे नौदल ९ व्या क्रमांकावर आहे आणि तसेच हे जगातील सर्वात लांब आणि रुंद नौसेनांपैकी एक आहे. इटलीजवळ सध्या ६६ युध्दनौका आहेत तर ३५,२०० सैन्य आहे.

 

रिपब्लिक ऑफ चायना नेव्ही, तैवान

 

navy-maarathipizza10
navyrecognition.com

जगातील सर्वात शक्तीशाली नौदलाच्या १० व्या क्रमांकावर तैवानचे नौदल आहे. तसेच याला आता ग्रीन वॉटर नेव्हीसुध्दा मानले जाते.

म्हणजेच नौदलाजवळ किनारी आणि प्रादेशिक भागात मुबलक ताकद आहे, मात्र स्वतःला जगावर छाप उमटवण्यासाठी आवश्यक तेवढी ताकद नाही. तैवानच्या नौदलात सध्या ४८ युद्धनौका आणि ३८,००० सैन्यांची ताकद आहे.

ह्या नौदलांसमोर टिकणे कोणत्याही शत्रूसाठी कठीणच !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं, वाचा!

  • January 1, 2019 at 5:24 pm
    Permalink

    खुप छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?