बँकेतील लॉकरवरच दरोडा पडला तर? तुमचा मौल्यवान ऐवज सुरक्षित करण्याच्या १० टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

सध्याच्या युगामध्ये लोक कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. कारण आजच्या युगामध्ये कोणावरही जास्त विश्वास ठेवणे खूप महागात पडू शकते.

त्यामुळे आजकाल लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू घरी न ठेवता, बँकेमध्ये ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम समजतात.

बँकांमध्ये सध्या दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी ग्राहकांना विशिष्ट अशा लॉकरची सुविधा प्रदान केली जाते.

या लॉकर्समध्ये तुमच्या महत्त्वाच्या वस्तू अगदी सुरक्षितपणे ठेवल्या जातात. तुम्ही त्या तुम्हाला गरज असताना सोप्या पद्धतीने काढू देखील शकता.

 

Safety Locker Tips.Inmarathi
financialexpress.com

पण एवढे करून देखील कधी – कधी आपले पैसे आणि महत्त्वाच्या वस्तू या बँकेच्या लॉकरमध्ये देखील सुरक्षित राहत नाहीत.

काही दिवसांपूर्वी नवी – मुंबईमध्ये बँक ऑफ बडोदावर पडलेल्या दरोड्यामध्ये चोर २२५ पैकी ३० लॉकर तोडून त्यातील सामान घेऊन फरार झाले. अशा घटना खूप वेळा घडल्या आहेत.

त्यामुळे आता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या तुमच्या वस्तू किती सुरक्षित आहेत, याची शाश्वती देता येत नाही.

याबाबतीत आरबीआयने विधान केले होते की, ‘लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या मौल्यवान वस्तूंसाठी बँक जबाबदार नाही.’ त्यामुळे तुमचे नुकसान झाल्यास बँक नुकसान भरपाई देत नाही. नवी – मुंबईमध्ये घडलेल्या घटनेतून आपण सर्वांनी काहीतरी शिकवण घेतली पाहिजे.

या प्रकारची घटना परत होऊ नये आणि तुमच्या महत्त्वाच्या वस्तू चोरी होऊ नयेत, यासाठी फक्त थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

आज आम्ही बँकेतील लॉकर खाते बनवण्याच्या आधी तुम्ही कोणती खबरदारी घ्यायला हवी, याबाबत सांगणार आहोत.

फायनान्शियल एक्स्प्रेस ने ह्या बाबतीत १० महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत” त्या आपण जाणून घेऊया,

 

Safety Locker Tips.Inmarathi1
sify.com

१. काही महिन्यांपूर्वी १९ पीएसयू आणि आरबीआयने आरटीआयचे उत्तर देताना सांगितले होते की, लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूच्या नुकसानाची जबाबदारी बँकेची नसेल.

मग या नुकसानाचे कारण आग, पूर, दंगल आणि भूकंप यांपैकी काहीही असो.

बँक फक्त सामान्य पद्धतीने तुमच्या सामानची देखरेख करत आहे. अशावेळी तुमच्याकडे सामानाच्या सुरक्षेसाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे बँकेच्या लॉकरमध्ये समान ठेवण्याआधी तुम्ही त्याची विमा पॉलिसी काढून ठेवा.

 

best girlfriend-inmarathi08
insuranceup.it

२. भाड्याने लॉकर घेणारी माणसे आणि बँक यांच्यामध्ये ठीक असेच नाते असते, जसे एक घरमालक आणि त्याच्याकडे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या माणसाचे असते.

 

Safety Locker Tips.Inmarathi2
intoday.in

यावरून हे समजते की, जर तुम्हाला बँकेच्या लॉकरमध्ये आपले समान ठेवायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी किंमत मोजावी लागणार.

ही किंमत लॉकरच्या आकारावरून ठरवण्यात येते. वर्षभरासाठी १ हजारपासून १० हजारपर्यंत याची किंमत असू शकते. त्यामुळे छोट्या लॉकरमध्ये तुमचे समान राहील, असे पहा.

३. काही बँक अशा देखील असतात, ज्या ग्राहकांकडून अॅग्रीमेंट साईन करून घेतात, ज्यावर वॉर्निंग लिहिलेली असते की, लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूंची जबाबदारी बँकेची नसणार…!

त्यामुळे कोणत्याही बँकेमध्ये लॉकर उघडण्या अगोदर त्यांचे नियम आणि कायदे चांगल्याप्रकारे वाचून घ्या.

४. बँक आपल्या सामानाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आपल्याकडून पैसे घेते आणि त्याचबरोबर हे आश्वासन देखील देते की, लॉकरमध्ये तुमचे सामान पूर्णपणे सुरक्षित आहे.

त्यामुळे जर ग्राहकांच्या सामानाचे काही नुकसान झाले, तर ग्राहक भरपाईसाठी बँकेला जबाबदार ठरवू शकतो.

५. जर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या तुमच्या कोणत्याही सामानाचे नुकसान झाले आणि बँक त्याची भरपाई देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. तसेच राष्ट्रीय ग्राहक पुनर्वसन आयोग (एनसीडीआरसी) ला देखील संपर्क करू शकता.

 

Safety Locker Tips.Inmarathi3
manoramaonline.com

६. बँकेमध्ये लॉकर चालू करण्याअगोदर हे पडताळून पहा की, सगळीकडे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत की नाही. त्यामुळे सामान चोरी किंवा हरवल्यावर त्याची सहज तपासणी करता येईल.

७. आपल्या सामानाची सुरक्षा करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे त्याचा विमा काढणे.

पण बाजारात लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानासाठी कोणतीही विमा पॉलिसी उपलब्ध नाही. पण तुम्ही Homeowner’s Policy घेऊन आपल्या किंमती सामानाची सुरक्षा करू शकता.

८. बँकेला तुम्ही लॉकरमध्ये काय ठेवता आणि त्यातून काय काढता, याबद्दल काहीच माहित नसते. अशावेळी जर तुमचे सामान चोरी झाले किंवा हरवले, तर तुमच्या झालेल्या नुकसानीचा योग्य अंदाज लावणे कठीण होते.

त्यामुळे तुम्ही तुमच्या सामानाची रिसिप्ट किंवा त्याबद्दलचे कागद सांभळून ठेवणे गरजेचे आहे.

 

Safety Locker Tips.Inmarathi4
businesstoday

९. या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, Homeowner’s Policy च्या अंतर्गत कोणती मर्यादा तर नाही ना.

कारण ICICI Lombard आणि Tata AIA General या आणि यांच्यासारख्या इतर काही विमा कंपन्या दागिन्यांच्या विम्यामध्ये २५ टक्के रक्कम परत करतात.

जर तुम्ही ३ लाखाची पॉलिसी घेतली, तर तुम्हाला दागिन्यांच्या २५ टक्के म्हणजे फक्त ७५ हजारच मिळणार.

१०. काही Householder’s इन्शुरन्स पॉलिसी अशा देखील असतात, ज्या फक्त घरात ठेवलेल्या वस्तूंचीच नाही, तर प्रवासामध्ये किंवा वस्तूचे अचानक झालेल्या नुकसानाची देखील भरपाई करतात. त्यामुळे पॉलिसी घेताना व्हॅल्युएशन सर्टिफिकेट नक्की जमा करा.

या मार्गांनी तुम्ही या चोरीच्या घटनांपासून आपले नुकसान होण्यापासून वाचवू शकता. त्यामुळे बँकेमध्ये लॉकर सुरू करण्याआधी या गोष्टी लक्षात असू द्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “बँकेतील लॉकरवरच दरोडा पडला तर? तुमचा मौल्यवान ऐवज सुरक्षित करण्याच्या १० टिप्स

 • December 3, 2018 at 5:55 pm
  Permalink

  छान माहीती

  Reply
 • December 3, 2018 at 9:29 pm
  Permalink

  अति उत्तम

  Reply
 • March 5, 2019 at 12:23 pm
  Permalink

  माहिती अतिशय उत्तम आहे. तुमच्या साईटवरचे लेख छान असतात. पण त्यांचे मराठी भाषांतर फार वाईट असते.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?