भक्त ,ट्रोल ,प्रेस्टीट्युट आणि आपले बौद्धिक वेश्यागमन

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

===
===

ट्रोल नावाचा एक नवा शब्द २०१७ मध्ये आपल्याला दिला गेलेला आहे .होय ! मिळालेला ,गवसलेला किंवा निर्माण केलेला नव्हे तर दिला गेलेला आहे . गेल्या काही वर्षात असे अनेक शब्द आपल्याला दिले गेलेले आहे . भक्त ,आपटार्द ,pressittute म्हणजेच मराठीतील प्रेश्या आणि बौद्धिक अभिजन ब्राह्मण्य मराठी लोकांचा अतिशय प्रिय असा “narretive” . नरेटीव्ह म्हणजे कथारचणे असे आपण भाव अर्थाने म्हणू शकतो . हे सगळे शब्द आपल्याला का आणि कसे दिले गेलेले आहेत ते आपण बघूच .पण त्याआधी हे शब्द media/मध्यम आणि राजकारण ह्या दोन्ही दोन्ही वर वाद/चर्चा करताना येतात हे विशेष लक्षात घ्यायला पाहिजे . आणि ते लक्षात घेताना लोकमानस -माध्यमे-सत्ताकारण ह्यांचे बदलेले स्वरूप सुद्धा समजून घ्यायला पाहिजे म्हणजे हा विषय इतका आणि किती गंभीर आहे ते सहजपणे समजून घेता येईल .

InMarathi Android App

प्रत्येक पिढीला आपले म्हणून तंत्रधन्यानाचे देणे मिळालेले असते . समाजातील मूळ विधी-निषेध मानव व्यवहार ह्यांवर त्याचा नकळत पण गंभीर परिणाम होत असतो .अगदी सध्या उदाहरणाने आपल्याला हे समजून घेता येते . पारंपारिक बलुतेदार किंवा गावाचा पंच डोळ्या समोर आण ,म्हणजे समजा १७वे शतक . तुमचे मूळ उत्पादन किंवा तुमचा अंगभूत गुण हेच तुमच्या आणि इतरांच्या सत्ता-संबधा साठी पुरसे होते .तुम्ही गावात मडकी बनवता किंवा तुम्हाला चार लोक सोबत ठेवून कामे करवून घेता येते हेच त्या वेळील समाजात तुमची पवार म्हणून पुरेसे होते .ह्याला तडा गेला तो औद्योगिक क्रांती मुळे .म्हणजे झाले असे कि एखाद्या गोष्टीवरची ,ती निर्माण किंवा उपलब्ध करून द्यायची तुमची मोनोपोली/एकाधिकार ह्यावेळी संपलेला होता.तो अधिकार आता ठराविक लोकांकडे गेलेला होता पण तिथे निव्वळ एकाधिकार निर्माण झाला असे नव्हते . उदाहरणार्थ लकडाएवजी रॉकेल किंवा मडक्याएवजी कप-बशी वापरायचे ठरले त्यावेळी ह्यांचे उत्पादन काहीच कंपनी करायच्या .अंनि त्यात जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचून ,त्यांना आपलेच उत्पादन कसे चांगले आहे हे पटवणे क्रमप्राप्त झाले . निर्मित एवजी वितरण म्हत्वाचे ठरले .पण हा बदल फक्त व्यापार-उद्योग जगातच झाला असे नही . सत्ताकारणात सुद्धा हे बदल त्याच प्रमाणे घडलेत ! आपल्या उदाहरणातील गावाचा पंच आता फक्त एक पर्याय म्हणून राहिलेला होता .राज्कारांतील नव्या रिती प्रमाणे आता अनेक लोक निवडणूक लढवत होती आणि त्यातून आपल्याला कोण तो निवडून दद्यायचा होता. लोकमानस -माध्यमे-सत्ताकारण असे त्रिकुट आपण आधी मांडले ते ह्यासाठी .कारण मालविक्री असो कि उमेदवारी दोघानाही आता मागणी-पुरवठ्याची गरज भासू लागलेले होती.तशी ती गरज ,अनेक पर्याय असल्याने आता आपल्यालाही होतीच. सत्तेच्या गणितात माध्यमांचा शिरकाव  होतो तो  इथे …

खूप काही घडत असताना तसेच खूप काही उपलब्ध असताना कुणीतरी येऊन ह्या सर्वांचा सोपा पडणार आढावा घेतला तर ?वर्तमान पत्र हे नाव किती सार्थक आहे हे आता लक्षात येईल .निर्माण ते वितरण ह्या सत्ताबदलात वर्तमान पत्र हे वाटाडे आणि द्वारपाल म्हणून कमी यायचे/येतात .बातमी आणि जाहिरात हे त्या कमी येण्याचे दोन मार्ग .त्यात बातमी त्याच्या उपयोगी मुल्यामुळे छापली/दाखवली गेली असे मानले तरी जाहिरात हि त्याबद्दल मिळालेल्या मोबदला(पैसा) मुळेच यायची .एखादे मध्यम किती निष्पक्ष किंवा “बिका हुआ है” हा ज्याचं त्याच्या समज आणि अनुभवाचा विषय आहे .इथे आपला भर हे सगळे तंत्र समजून घेण्यावर असल्याने राजकारण आणि उद्योग असे दोन्ही उदाहरण मुद्दाम सोबत नमूद केल्या गेलेले आहे ,असो.पुढे वर्तमानपत्र एवजी tv येऊन कागद ते व्हिदिओ असा बदल झालेला असला तरी सत्ताकारण आणि मध्यम ह्यांचा संबंध बदललेला नव्हता . सोशल मेडिया/समाज मध्यम आणि इंटरनेट मुळे मात्र ह्यात मुलभूत बदल घडवून आणले .

उत्पादनात जशी कंपनी तशी राजकारणात पार्टी/पक्ष . विचारधारा आणि ध्येय मुळे एकत्र आलले समविचारी लोक हे पार्टीचे आधीचे आणि बाळबोध स्वरूप झाले .ते तसे खूप लवकर गैरलागू झाले .आणि त्याला “निर्माण ते वितरण ” असा झालेला बदल कारणीभूत होता .

===
===

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *