चिरंतन चित्रपट : ३) Arrival

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

परग्रहा वरील जीवन व आपल्या पेक्षा प्रगत परग्रहवासी हा  विषय आता विज्ञान कथा मधील एक वेगळी श्रेणी किंवा शैली म्हणून च पाहावा इतक्या वेळा हाताळला गेला असावा. याच विषया वर नुकताच आलेला Arrival हा चित्रपट मात्र सध्या चर्चेत आहे. उत्कृष्ट visual इफेक्ट्स किंवा थरारक action दृश्ये ह्यामुळे  नव्हे  तर कथेच्या गाभ्या मुळे तो आपले वेगळे पण सिद्ध करतो आहे. हा गाभा आहे communication, संवाद ! 
माहिती, सूचना, इत्यादी  एका व्यक्ती अथवा समूहाने दुसर्‍या व्यक्ती अथवा समूहा पर्यंत पोहोचवणे, व ते ही   दोन्ही बाजूंना मान्य असलेल्या सामान्य संकेतानुसार ! ह्या संवादाच, माहिती च्या देवाणघेवाणीचं माध्यम म्हणजे भाषा. बोली भाषा माणसाच्या प्रागैतिहासिक काळा च्या ही आधी अस्तित्वात अली असावी. तेव्हा पासून आज पर्यंत भाषे वर झालेले संस्कार व त्यात पडलेली शब्दांची भर हे एखाद्या संस्कृती च्या प्रगत असण्याचे लक्षण म्हणायला हरकत नाही. भारत सारख्या देशात तुम्ही अगदी राज्याची सीमा ओलांडली तरी भाषे मध्ये खूप फरक दिसतो.  भारतात २२ ‘अधिकृत’ तर १६५२ वेगवेगळ्या बोली भाषा आहेत, हीच संख्या जगात साडेसहा हजारावर जाईल. पण हे झालआपल्याच पृथ्वी या ग्रह वरच्या होमो सेपिअन या एकाच प्रजातीतील प्राण्या मधील भाषांच ! हाच संवाद जर अति प्रगत एलिअनस शी होणार असेल तर त्याचे माध्यम, स्वरूप, काय असेल, आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांनी तुम्हाला का अन् काय बोलावं हा असेल.
 
मुळात आपण जसे उत्क्रांत झालो तसेच अगदी वेगळ्या परिस्थितीतिले सजीव असतील हि अपेक्षाच  मानवाची अहंकारी भूमिका असू शकते. आपल्या दृष्टीच्या, ऐकण्या च्या क्षमता ह्या  मर्यादित फ्रेक्वेन्सी मध्येच आहेत. ज्याला आपण audible frequency range म्हणतो, आणि पाहण्या ची क्षमता visible स्पेक्ट्रम हे एखाद्या पर ग्रहा वरील प्राण्या साठी आपल्या सारखेच असेल असे नाही.
तरी हि एक बुद्धिमान प्राणी म्हणून आपले अस्तित्व आपण दुसऱ्या बुद्धिमान प्राण्या पर्यंत पोहोचवू शकतो. असा प्रयत्न आपण Voyager याना वरील गोल्डन रेकॉर्ड मध्ये केलेला आहे. ज्यात काही ध्वनी व चित्रे आपले अस्तित्व दाखवू शकतील. असाच प्रयत्न कॉन्टॅक्ट या चित्रपटात prime नंबर्स वापरून केलेला दिसतो. प्रगत जीव म्हणून आपले अस्तित्व दाखवणे शक्य असले तरी पुढे संवादाचा व माहिती च्या देवाणघेवाणी चा प्रश्न उरतोच. विज्ञान कथेच्या केन्द्र स्थानी सामान्यपणे वैज्ञानिक असलेले मुख्य पात्र असतात पण या पार्श्वभूमी वर Arrival मध्ये मात्र भाषा तज्ञ असलेली नायिका असणे योग्यच वाटते.
जगभरात १२ एलियन स्पेस शिप वेगवेगळ्या ठिकाणी येतात त्यावरून सर्व देश, मानवी समूह, आंतरराष्ट्रीय समुदाय यान मध्ये अचानक आलेली असुरक्षतते ची भावना ही वातावरणनिर्मिती चित्रपटात सुरुवातीला च होते. याच कारणां मुळे सहकार्या पेक्षा स्पर्धा सुरु होते. ही स्पर्धा आहे एलिअन्स च्या पृथ्वी वर येण्या मागची कारणे, त्यांचे उद्देश्य, किंवा आपल्याला संभावित असलेला धोका ओळखण्या ची. आजवर अशा चित्रपटां मधून असे डिप्लोमॅटिक प्रयत्न केलेलं कधी दाखवले गेले नसावेत. झालंच तर युद्ध किंवा एकतर्फी विध्वंस एवढंच.
अगदी वेगळ्या प्रकारच्या भाषा-लिपी, माध्यमातून संवाद साधणे, खरं तर, आपल्या भाषेत त्याचे संभाव्य अर्थ  लावणे त्यानंतर त्यांना प्रश्न  विचारणे ही कामगिरी या कथेत वेगळ्याच उंची वर गेलेली बघायला मिळते. हे आपल्या तेव्हा लक्षात येतं जेव्हा भौतिक शात्रज्ञ असलेल्या कथे च्या दुसऱ्या मुख्य पात्रा ने भाषा तज्ज्ञ असलेल्या नायिके ला दिलेली कॉम्प्लिमेंट आपण लक्षात घेतो. त्याच्या मते तिचा भाषे कडे पाहण्या चा दृष्टिकोन एखाद्या गणिततज्ञा सारखा आहे. प्रश्न विचारण्या पर्यंत येण्या आधी तिला करावी लागलेली मेहनत, त्यातून चुकी चे अर्थ निघण्यातून झालेला गोंधळ, अशा चुकां मधून वाढत जाणारी तणावग्रस्त परिस्थिती, ह्या सर्व गोष्टी मधून नंतर कथेतील पात्रांनाच नव्हे तर प्रेक्षकांना पण आपल्याच भाषे च्या मर्यादा जाणवू लागतात. अशा परिस्थितीत  कुठल्या देशाने चुकीच्या अर्थाच्या आधारावर युद्धा  ला सुरुवात करू नये हा तणाव सगळ्यांवर असलेल्या जाणवतो.
शेवटी पृथ्वी वर येण्या मागच्या उद्देश्या च एलियन्स नि दिलेलं उत्तर हे आजवरच्या विज्ञानकथांपेक्षा समर्पक  वाटत. नवीन गोष्टी शिकताना आपली मेंदू मध्ये नयूरॉन्स ची rewiring होते तसेच नवीन भाषा शिकण्या मुळे आपल्या भाषे च्या मर्यादां वर मात करून आपण आपल्या मूळ विचार करण्या च्या पद्धतीत बदल करू शकतो, असा काहीसा संदेश पण या चित्रपटातून मिळतो.
https://youtu.be/tFMo3UJ4B4g

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?