आपण एस्कलेटरचा चुकीच्या पद्धतीने वापर करतोय; जाणून घ्या योग्य पद्धत!

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या एस्कलेटर म्हणजेच सरकते जिने सर्रास पाहायला मिळतात. पूर्वी जेव्हा एस्कलेटर भारतात दाखल झाले तेव्हा एखादी जादू बघावी तसे लोक या जिन्यांकडे पाहायचे. त्यावर पाय टाकताना गोंधळून कित्येकांचं कंबरडं मोडलं असेल याची गणतीच नाही.

पण आता आपल्याला या जिन्यांची हळूहळू सवय होऊ लागली आहे. ७-८ वर्षाचं चिमुरडं पोर अगदी सहज एस्कलेटरवर पाय टाकून युद्ध जिंकल्याचा अविर्भाव चेहऱ्यावर आणतं…!

=====

=====


 

Right-Way-To-Use-Escalators-marathipizza01

 

स्त्रोत

एस्कलेटर मनुष्य प्राण्याच्या वेगवान जीवाला अधिक वेग देण्यासाठी बनवलं गेलं, असं एस्कलेटरच्या निर्मात्यांच म्हणणं!

पण आपल्याकडे अगदी उलट घडतं. माणसं एस्कलेटरवर इतकी ढम्मपणे उभी असतात की जोवर एस्कलेटर शेवटच्या पायरीपर्यंत जात नाही तोवर त्यावरून हलत नाही.

परिणामी ज्या माणसाला घाई असते तो ताटकळत मागेच उभा राहतो. कारण एस्कलेटरवरून धावणं आपल्याकडे वर्ज्य आहे, नाही का?!

 

Right-Way-To-Use-Escalators-marathipizza02

स्त्रोत

पण समजा आम्ही तुम्हाला म्हणालो की एस्कलेटरवर कुठेही मख्खासारखं उभं रहाणं चुकीचं आहे – तर?

Right-Way-To-Use-Escalators-marathipizza03

स्त्रोत

हो हे खरं आहे.

जेव्हा एस्कलेटरची निर्मिती झाली तेव्हा त्याचा मूळ उद्देश होता, लोकांना जास्त मेहनत करायला नं लावता त्यांना एका ठिकाणाहून खाली आणणे किंवा एका ठिकाणाहून वर नेणे.

त्यामुळे एस्कलेटर वापरण्याची मूळ पद्धत अशी सांगितली होती की, “ज्या लोकांना आरामात जायचे आहे त्यांनी एस्कलेटरच्या एका बाजूला उभे रहावे. जेणेकरून ज्या माणसाला घाई आहे तो एस्कलेटरच्या दुसऱ्या बाजूकडून धावत जात लवकरात लवकर पोचू शकेल.”

 

Right-Way-To-Use-Escalators-marathipizza04

स्त्रोत

पण आपल्याकडे मात्र डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला लोक आरामात उभे असतात.

त्यांचं काही बिघडत नाही पण मागच्याला ‘मुका मार’ बसतो त्याच  काय??

 

CHENNAI, 30/06/2015: For City: Commuters at Koyambedu Metro Rail staion. Photo: B. Jothi Ramalingam

=====

=====

स्त्रोत

आता अनेक देशांत पोस्टरच्या पद्धतीने लोकांना एस्कलेटरची मूळ पद्धत सांगून योग्य रीतीने  एस्कलेटरचा वापर कण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. आपल्याकडे देखील लोकांना मूळ पद्धत सांगण्याची नितांत गरज आहे.

Right-Way-To-Use-Escalators-marathipizza05

स्त्रोत

तर मित्रांनो – पुढच्या वेळेपासून तुम्हाला घाई नसेल तर एस्कलेटर वरून चढताना वा उतरताना डाव्या बाजूला शांत उभे राहा. जेणेकरून ज्याला घाई आहे त्याचा खोळंबा होणार नाही!


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 75 posts and counting.See all posts by vishal

2 thoughts on “आपण एस्कलेटरचा चुकीच्या पद्धतीने वापर करतोय; जाणून घ्या योग्य पद्धत!

  • February 20, 2017 at 2:01 pm
    Permalink

    ह्या फिरत्या जिन्याचा वापर कसा करावा ह्या माहितीबद्दल धन्यवाद.

    Reply
  • May 20, 2017 at 10:22 pm
    Permalink

    एक हेलिकॉप्टर पण ठेवा, म्हणजे ज्याला घाई आहे तो सरकत्या जिन्याऐवजी हेलिकॉप्टर वापरेल ! ☺

    Reply

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: