गंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं वैज्ञानिक कारण

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गंगेच्या प्रवाहाने सगळी पापं धुवून माणुस निर्मल होतो अशी समजूत भारतात खूप आधीपासून आहे. दुःख, पीडा, पाप, रोग सगळं धुण्यासाठी लोक गंगेत स्नान करायला जातात. त्यामागे एक गोष्ट सांगितली जाते – भगीरथ राजाची.

 

भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवांनी मग प्रसन्न होऊन त्याची पर्यायाने मानवाची पापं धुण्यासाठी आकाशातून गंगेला पाचारण केलं. पण आकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या गंगेच्या प्रवाहामुळे पृथ्वी उध्वस्त होऊ शकते. हे लक्षात आल्यावर महादेव मेरू पर्वतावर उभे राहिले. त्यांनी गंगा नदीला आपल्या जटांमध्ये जागा दिली आणि तिथुन गंगा नदी पृथ्वीवर वाहू लागली. तेव्हापासून गंगा नदी मानवा चे “पाप” धुवत आहे.

 

bath

 

पण ही तर पौराणिक कथा झाली. आज ह्या कथेवर विश्वास ठेवावा काय? Well, ज्या प्रकारे वैज्ञानिक संशोधनं होताहेत, त्यानुसार गंगा इतर नद्यांपेक्षा वेगळी, श्रेष्ठ आहे – हे स्पष्ट होत आहे.

वैज्ञानिकांच्या मते, गंगेच्या पाण्यात एक अशी virus ची प्रजाती आहे ज्याने गंगेच्या पाण्याचं अत्यंत जलद गतीने निर्जंतुकीकरण होतं – जे इतर नद्यांमध्ये होताना आढळत नाही.

The Economic Times ने सदर रिसर्चवर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ह्या रिपोर्टनुसार, ज्युलियन हॉलिक ह्याने केलेल्या संशोधनानंतर तो ह्या conclusion वर आला की गंगेच्या पाण्यात एक X factor आहे. हा फॅक्टर गंगेच्या पाण्याला झटपट शुद्ध करत असतो. संशोधन करता करता त्याने बाकीच्या नद्यांचं आणि गंगेचं comparison केलं. किरणोत्सारी – हिमालयातील radioactive खडक, जंगलातील झाडे, बर्फाचं थंडगार पाणी ह्याचं एकत्रितपणे बनतं ते गंगेचं पाणी. पण मग प्रश्न असा पडतो की गंगा नदीच्या सोबत असलेल्या ब्रह्मपुत्रा नदी मध्ये हे गुणधर्म का नाहीयेत?

===
===

 

Ganges-Brahmaputra-Meghna_basins

 

Hydrology चे प्रोफेसर D S Bhargav ह्यांच्या म्हणण्यानुसार –

साधारण नदीच्या पाण्यातील oxygen, Organic waste आणि बॅक्टेरिया संपवतात ज्याने बॅक्टेरियाला वाढीसाठी जोर मिळतो. पण गंगेच्या पाण्यात असलेल्या ह्या ‘X Factor’ मुळे गंगेच्या पाण्यातील oxygen २५ पट वाढतो.

पण वाढलेला oxygen पाण्यात साठवून ठेवता येण्याच्या गंगेच्या क्षमतेमागचं कारण कुणाकडेच नाहीये.

 

ganga varanasi

 

गंगेचं हे गुपित सोडवण्यासाठी भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याकडे लक्ष दिलं आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने नुकतंच 150 कोटींचा निधी मंजूर केला आहे. ह्या निधीचा वापर भारतातल्या मोठ्या वैद्यकशास्त्रीय संस्था AIMS, IIT सुद्धा X factor बद्दल संशोधनासाठी करणार आहेत.

केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती, ज्यांच्याकडे गंगा नदीला टवटवी आणण्याचं कामसुद्धा दिलं आहे त्या सांगतात,

मे २०१७ पर्यंत आम्ही गंगा नदीच्या पाण्याचा ‘तब्येतीवर’ पडणाऱ्या प्रभावावर अभ्यासपूर्ण documentation मांडू.

देशातील नामांकित संस्थांच्या संशोधनातून बाहेर आलेल्या काही गोष्टी –

  • National Environmental Engineering Research Institute (NEERI) च्या संशोधनातून असं निष्पन्न होतं की गंगेच्या पाण्यात virus असतात जे bacteria व जंतूंना संपवतात आणि पाणी शुद्ध करतात.
  • Indian Council of Medical Research (ICMR) च्या सौम्या स्वामिनाथन सांगतात की बॅक्टेरियाला संपवणाऱ्या त्या viruses ना संशोधक bacterio-phages असं म्हणतात. ह्यांच्यामुळेच पाणी शुद्ध होत आहे.
  • AIIMS च्या डायरेक्टर MC Misra ह्यांनी सांगितलं, ज्या वेळी गंगेच्या पाण्याच्या ह्या गुणधर्माबद्दल माहिती मिळेल त्यावेळी त्याचा वापर मेडिकल क्षेत्रात होईल.

======

InMarathi चं नवं कोरं, चकचकीत मोफत अँड्रॉइड अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलंत ना?

ह्या अॅप्लिकेशनमध्ये आपले आवडते लेख शेअर करणे, “फेव्हरेट” म्हणून सेव्ह करणे, तसेच लेखांच्या नोटीफिकेशन्स मिळवणे अश्या सर्व सुविधा आहेत.

त्यामुळे चुकूनही विसरू नका!

इथे क्लिक करून हे मोफत अॅप्लिकेशन त्वरित इन्स्टॉल करा!

======

जर ह्या X factor बद्दल असलेले प्रश्न सोडवल्या गेले तर मेडिकल क्षेत्रात खूप प्रगती होईल.

ह्या प्रयत्नांना लवकर यश मिळावं आणि त्याचा लाभ सर्वांना व्हावा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?