' स्त्रियांसाठी रस्त्यावरची ‘गुलाबी’ लोकशाही: स्त्रिया चालवणार गुलाबी रिक्षा – InMarathi

स्त्रियांसाठी रस्त्यावरची ‘गुलाबी’ लोकशाही: स्त्रिया चालवणार गुलाबी रिक्षा

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

एक-दोन नाही – ५४८ स्त्रियांना रिक्षा चालवण्याचे परवाने मिळाले आहेत. पैकी ४६५ मुंबईतील आहेत.

गुडगाव, इंदौर आणि रांची नंतर आता मुंबई/महाराष्ट्रातसुद्धा स्त्रिया रिक्षा चालवणार आहेत.

त्यामुळे आता स्त्रियांना सार्जनिक वाहतुकीत एक सुरक्षित आणि विश्वासू पर्याय तर निर्माण होत आहेच, शिवाय अनेक स्त्रियांना रोजगाराचा एक नवा मार्ग उपलब्ध होतोय.

 

Pink-Auto-marathipizza

 

सध्या ३५६२८ रिक्षा परवाने मुंबईसाठी आणि ६०००, मुंबईसोडून इतर भागांत देणं सुरु आहे.

ह्यापैकी ५% परवाने स्त्रियांसाठी राखीव आहेत.

त्यामुळे एकूण १७८१ परवाने मुंबईतील स्त्रियांना दिले जाणार आहेत.

अंधेरी RTO तर्फे मुंबईतील ४६५ महिलांना लॉटरी पद्धतीने परवाने देण्यात आले आहेत.

महाराष्टातील एकूण ५४८ स्त्रियांना आत्तापर्यंत परवाने दिले गेले आहेत आणि उर्वरित १३१६ परवाने फक्त स्त्रियांनाच दिले जाणार आहेत – त्यामुळे इच्छुक महिलांनी परवान्यांसाठी अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

वाहतूक मंत्री दिवाकर रावते ह्यांनी Times Of India ला दिलेल्या माहिती नुसार :

ऑनलाईन अर्ज मराठीतच होते, ही आनंदाची बाब आहे. एखादा चालक मराठी बोलण्यास असमर्थ असल्याचं जर आमच्या निदर्शनास आलं तर ज्या अधिकाऱ्याने त्या चालकाचा अर्ज मंजूर केलाय, त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही केली जाईल.

ते पुढे हे सुद्धा म्हणाले की ह्यावेळी शिक्षणाची अट देखील शिथील करण्यात आली होती, ज्यामुळे अनेक अशिक्षित व्यक्तींनी देखील अर्ज भरले होते.

रिक्षांना गुलाबी रंग देण्यामागचा तर्क समजून सांगतांना दिवाकर रावते म्हणाले :

रंगामुळे प्रवाश्यांना हे चटकन लक्षात येईल की ही रिक्षा एक स्त्री चालवणार आहे, आणि एखाद्या स्त्री प्रवाश्यास अश्या रिक्षाला प्राधान्य देणं सोपं जाईल.

Pink-Auto02-marathipizza

Images source: jharkhandstatenews

ह्या उपक्रमामुळे स्त्री सुरक्षा practically प्राधान्यावर येणार आहे, एवढं नक्की.

स्त्री शक्तीचा विजय असो ! 🙂

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?