' इतिहास घडतोय! बीएसएफच्या महिला सैनिक पहिल्यांदाच दाखवणार मोटरसायकलच्या कसरती – InMarathi

इतिहास घडतोय! बीएसएफच्या महिला सैनिक पहिल्यांदाच दाखवणार मोटरसायकलच्या कसरती

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आजकाल स्त्रिया पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून चालत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. शिक्षणामध्ये देखील स्त्रिया पुरुषांपेक्षा वरचढ असल्याचे आपल्याला दिसून येते. देशाचे रक्षण करण्यासाठी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. पोलीस खात्यात, सैन्यात आपले एक वेगळे स्थान स्त्रियांनी बनवले आहे.

भारताच्या सीमा सुरक्षा दलामध्ये देखील स्त्रियांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

येत्या २६ जानेवारीला आपण भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आतापर्यंत तुम्ही पुरुष सैनिकांना मोठ्या जोशात आश्चर्यजनक कसरती दाखवताना पाहिले असेल, पण यावेळी तुम्हाला रायसीना हिलच्या रस्त्यांवर देशाच्या शूर स्त्री सैनिकांना चित्तथरारक कसरती करताना पाहायला मिळतील.

 

BSF Women Bikers.Inmarathi
hindustantimes.com

 

गेल्या काही दिवसांपासून रायसीना हिलच्या रस्त्यांवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF च्या शूर महिला सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडची ट्रेनिंग करत आहेत. या सर्व स्त्रिया २६ जानेवारीला तुम्हाला अशा काही कसरती दाखवतील ज्यांच्याविषयी तुम्ही विचार देखील करू शकत नाही. बीएसएफच्या महिला रायडर्स पहिल्यांदाच दिल्लीमध्ये होणाऱ्या परेडचा भाग बनणार आहेत.

रॉयल इनफिल्ड मोटार सायकलवर सराव

बीएसएफच्या या धाडसी महिला रायडर्स मोटारसायकलवर वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्टीव्हीटीज करताना पाहायला मिळतील. सध्या या सैनिक स्त्रियांची एक धाडसी तुकडी आपल्या रॉयल इनफिल्ड मोटार सायकलवर बसून वेगवेगळ्या प्रकारची अॅक्टीव्हीटीज दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याचे भव्य रूप तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिसून येईल.

 

BSF Women Bikers.Inmarathi1
hindustantimes.com

 

आतापर्यंत पुरुष दाखवत होते कसरती, आता स्त्रियांची वेळ!

दरवर्षी येथे या सरावात पुरुष सैनिक स्टंट बाईकच्या मदतीने स्टंट करत असत. पण यावेळी या धाडसी महिला रायडर्सना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. या सर्व स्त्रियांना ग्वालियरच्या बाजूला असलेल्या टेकनपूरमध्ये स्थित असलेल्या बीएसएफ कँपमध्ये ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये १०० ते ११३ किंवा त्यापेक्षा जास्त महिला रायडर्स दिसून येणार आहेत.

 

BSF Women Bikers.Inmarathi2
manoramaonline.com

 

कधीही बाईकला हात न लावलेल्या मुलीदेखील दाखवणार कसरत

टेकनपूर ट्रेनिंग कँपच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २०१६ मध्ये ज्या स्त्रियांना या ट्रेनिंग कँपसाठी निवडण्यात आले आहे.

त्यातील जवळपास ४५ महिला सैनिकांनी तर त्याआधी कधीही बाईकला हात देखील लावला नव्हता.

पण यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आणि धाडसाने यासाठी मोठी मेहनत घेतली. ह्या बाईक चालवण्याच्या आणि कसरती करण्यामध्ये या स्त्रियांना कितीतरी दुखापत देखील झाल्या. पण त्या दुखापतींना न जुमानता त्या परत मोठ्या हिंमतीने उभ्या राहिल्या.

 

BSF Women Bikers.Inmarathi3
rediff.com

 

त्यांनी जवळपास वेगेवेगळ्या २२ फोर्मेशनमध्ये निपुणता मिळवली आहे. ह्या सर्व स्त्रिया राजपथवर प्रजासत्ताक महोत्सवात पहिल्यांदाच महिला बीएसएफ सैनिकांची कसरती तुकडी म्हणून धाडसी आणि आश्चर्यकारक कसरती दाखवणार आहेत.

या दरम्यान ४५ धाडसी स्त्रिया आपल्या ३५० सीसी रॉयल इनफिल्ड बाईक्सवर आपले कौशल्य दाखवणार आहेत. मोटर सायकलवर या धाडसी महिला २२ वेगवेगळ्या कसरती करण्याचा सराव करत आहेत.

ह्या प्रजासत्ताक दिनाला काहीतरी वेगळे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आपण आवर्जून या महिला सैनिकांची कसरत पाहायला हवी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?