क्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात? जाणून घ्या यामागचं कारण

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्याकडे क्रिकेटवेड्यांची काही कमी नाही. भारतात कुठेही जा तुम्हाला गल्लीबोळात, रस्त्यावर आणि शेतात सुद्धा केवळ क्रिकेट हा खेळच दिसेल. इतकं आपलं क्रिकेटबद्दलचं प्रेम. अश्या या क्रिकेटवेड्यांना क्रिकेटबद्दल अगाध ज्ञान असते बरं का! ते देखील आपल्याच क्रिकेटबद्दल नव्हे तर इतर संघांच्या क्रिकेटबद्दल सुद्धा! असो तशी ही एक चांगली गोष्ट आहे.

साहेबांचा गेम म्हणून ज्या क्रिकेटची महती होती तो क्रिकेट आता सचिनच्या देशातला अर्थात भारतातला क्रिकेट म्हणून जगभरात ओळखला जातो यापेक्षा दुसरी गौरवाची गोष्ट ती काय! तर अश्या या क्रिकेटवेड्यांना आणि क्रिकेटतज्ञांना एक प्रश्न आज विचारायचा आहे…तुम्हाला माहित आहे का हो, क्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात?

=====

=====


duck-wicket-marathipizza01
topyaps.com

नाही माहित? काय रावं तुम्ही..! चला तुमच्या या देखील प्रश्नाचं उत्तर आज मराठी पिझ्झा देईल.

क्रिकेट सामना सुरु असताना फलंदाजी करणारा खेळाडू जर शून्यावर आऊट झाला तर तो डकवर आऊट झाला असे म्हणतात. तर या शून्याला Zero नं म्हणता Duck चं म्हणण्यामागचं कारण आज जाणून घेऊया!

duck-wicket-marathipizza
theviralmedia.in

हा शब्द नेमका उत्पन्न कुठून झाला हे जाणून घेण्याआधी क्रिकेटमध्ये किती प्रकारे Duck हा शब्द वापरला जातो ते पाहूया.

 

  • जर एखादा बॅट्समन पहिल्याच बॉलवर आऊट झाला तर त्या विकेटला Golden Duck असे म्हणतात.

 

  • जर एखादा बॅट्समन दुसऱ्या बॉलवर आऊट झाला तर त्या विकेटला Silver Duck म्हणतात.

 

  • जर एखादा बॅट्समन तिसऱ्या बॉलवर आऊट झाला तर त्या विकेटला Bronze Duck म्हणतात.

 

  • आणि समजा एखादा बॅट्समन एकाही बॉलचा सामना न करता नॉन स्ट्राइकर एंड वर रन आऊट झाला किंवा बॅटिंगला आला आणि वाइड बॉल पवर स्टंप्ड आऊट झाला तर त्या विकेटला Diamond Duck म्हणतात.

 

  • आणि जर एखादा बॅट्समन मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला आऊट झाला तर त्या विकेटला Palladium Duck म्हणतात.
duck-wicket-marathipizza02
cricketdirect.co.uk

=====

=====

Duck म्हणजे काय तर बदक! हा बदक राहतो पाण्यात आणि क्रिकेट खेळतात जमिनीवर मग हा बदक क्रिकेटमध्ये आला कुठून?
या कोडयामागचं उत्तर असं आहे की, ० अर्थात Zero हे बदकाच्या अंड्याच्या आकारासारखं दिसतं. म्हणून गमंतीने Zero ला Duck म्हटले जाऊ लागले, एकप्रकारे हा शब्द शून्यावर आऊट होणाऱ्या बॅट्समनला चिडवण्यासाठी वापरला जात असे. पुढे पुढे तो मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात आला.

पूर्वी मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला एखादा बॅट्समन आऊट झाला तर त्या विकेटला Duck’s Egg Out असे म्हटले जायचे. कालांतराने तो शब्द संक्षिप्त होऊन केवळ Duck हा शब्द वापरात येऊ लागला.

hatching-ducklings-marathipizza
countrysidenetwork.com

काय कळली का या बदकामागची गंमत? अहो मग हा लेख शेअर करा आणि इतरांनाही सांगा की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?