पाऊस चालू झाल्यावर तुमचा ‘डिजिटल सेट टॉप बॉक्स’ अचानक बंद का पडतो? समजून घ्या..
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
पाऊस हा जरी सर्वांना आवडत असला तरी तो आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. त्यापिकीच एक समस्या म्हणजे आपल्या डीटीएचचं सिग्नल. थोडा जरी पाऊस पडला तरी आपल्या टीव्हीवर एक मेसेज येतो की,
‘खराब वातावरणामुळे आपला सेट टॉप बॉक्स सिग्नल रिसीव्ह करू शकत नाहीये.’

ही समस्या प्रत्येक पावसाळ्यात उद्भवते. पण असे का होत असेलं हा प्रश्न ह्या वेळी नक्कीच आपल्या मनात उपस्थित होत असेल. पावसाळ्यात टॉप बॉक्स सिग्नल रिसीव्ह का करू शकत नाही?
ह्याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
तुमच्या टीव्हीसेट ला जोडला गेलेला सेट टॉप बॉक्स एका एन्टीण्याद्वारे सिग्नल पकडतो. हे सिग्नल अंतराळात असलेल्या सॅटेलाइटच्या माध्यमातून येत असतात. हे सिग्नल तुमच्या सेट टॉप बॉक्स पर्यंत Ku Band फ्रिक्वेन्सी द्वारे पोहोचतात.

पावसात ह्या फ्रिक्वेन्सी जड होतात आणि त्या तुमच्या सेट टॉप बॉक्सच्या एन्टीणा पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून पावसाळ्यात थोडी आद्रता वातावरणात पसरताच हे सिग्नल फ्रिक्वेन्सी पकडू शकत नाही.

ह्याचाच परिणाम तुमच्या टीव्हीवर होतो. आणि त्याचा मेसेज तुमच्या टीव्ही स्क्रीनवर येतो.
हे केवळ तुमच्याच सोबत नाही सगळीकडे होत असतं. त्यामुळे जर तुम्ही आपल्या सर्विस प्रोव्हायडरला दोषी मानून सर्विस बदलायचाविचार करत असाल तर त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही. कारण ह्यावर कुठलाही उपाय आजवर शोधण्यात आलेला नाही.
त्यामुळे सर्विस बदलल्याने ही समस्या सुटणार नाही.
ह्यापेक्षा मोठी फ्रिक्वेन्सी म्हणजेच सी बॅण्ड सोबत देखील हीच समस्या उद्भवते.
Superhydrophobic डिश अँटिना ज्यावर पाण्याचे थेंब थांबत नाही, ह्यासाठी एक पर्याय ठरू शकतो. पण हा ह्या समस्येवरील तोडगा नाही. कारण अति पावसात हा पर्याय देखील विफल ठरतो.
त्यामुळे ह्यामुळे उगाचच आपल्या सर्विस ऑपरेटरवर चिडचिड करू नका कारण ह्यात त्यांचा काहीही दोष नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.