' कॉफी घेतल्यावर आपली झोप गायब होण्यामागे “ही” कारणं आहेत – InMarathi

कॉफी घेतल्यावर आपली झोप गायब होण्यामागे “ही” कारणं आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

दिवसाची सुरुवात, वाजणारा अलार्म, बाहेर पसरलेला गारवा आणि मऊ दुलईत गुरफटून घेवून सकाळ झाल्याचं सत्य नाकारणारा शरीरभर पसरलेला आळस. आपण अनिच्छेने कसेबसे डोळ्यावर आलेली झोप उडवण्याचा प्रयत्न करत उठून बसतो. जरी गुंगी येत असेल तरीही बिछान्यातून उठण्याचा प्रयत्न करतो.

दिवसभराची कामे डोक्यात हळूहळू आकार घेवू लागलेली असतात. त्त्यामुळे झोपेतून उठल्यावर परत झोपेच्या आहारी जाण्याचा मूर्खपणा आपल्याला परवडणारा नसतो.

तनावर आणि मनावर दाटून आलेल्या आळसाचे काय करायचे याचा रामबाण उपाय आपल्याकडे असतो. गॅस वर उकळण्यासाठी ठेवून दिलेले दुध, कपात दोन चमचे मोजून घातलेली साखर आणि किचनच्या शेल्फवर खुणावणारा नेसकॅफेचा डबा. त्यातली १ चमचाभर भरून कॉफी कपात टाकून आणि थोडस थेंब दोन थेंब पाणी घेवून त्याला चांगल फेटून वरून ओतलेल्या दुधाने बनलेलं खमंग वाफाळत कॉफी नावाचं मिश्रण आळस घालवण्याचा आणि दिवसाची सुरुवात ताजीतवानी करण्याचा हर एक दिवसाचा नामी उपाय असतो.

 

coffee uses-marathipizza
independent.co.uk

कधी विचार केलाय का, एक कप कॉफी पिल्यानंतर आपल्या अंगातील आळस का दूर होतो? मनाला ताजेतवानेपणा का येतो, कितीही झोप डोळ्यावर दाटून आली असेल तरी कॉफी पिल्यानंतर ती झोप उडून का जाते?

याच उत्तर हे आहे की कॉफी पिल्यानंतर आपल्या मेंदूच्या पेशींमधून डोपामाईन नावाचं नैसर्गिक उत्तेजक स्त्रवलं जातं. हे डोपामाईन नावाचं नैसर्गिक द्रव्य मानवी शरीरामध्ये जात्याचं उपलब्ध असते मात्र बाहेरून काही विशिष्ट पदार्थ हे द्रव्य शरीरात तयार होण्यासाठी उत्तेजकाचे काम करतात.

उदा. कोकेन किंवा गांजा पिल्यानंतर देखील मेंदूच्या पेशी मोठ्या प्रमाणावर डोपामाईन उत्सर्जित करतात त्यामुळे माणसाला अत्यानंद किंवा परमानंदाची अवस्था प्राप्त होते.

अर्थात बाहेरून दिसताना तर ती नशाच दिसते परंतु ही अशी नशा असते जिची चटक माणसाला लागू शकते. कॉफी पिल्यानंतर ही काही अशाच प्रकारचे बदल घडतात. अगदी गांजा किंवा कोकेन इतके नाही तरीही त्यापेक्षा कमी प्रमाणात डोपामाईन मेंदूच्या पेशींमधून बाहेर सोडले जाते आणि परिणामी आपल्याला आपले मन उत्साही ताजेतवाने वाटू लागते, शरीरात उत्साह दाटून येतो, आळस झटकला जातो.

यावरून लक्षात येवू शकेल माणसाना कॉफी पिण्याचे व्यसन देखील का लागलेले असते?

 

Drinking-Coffee-inmarathi
healthyliving.natureloc.com

जगभरात कॉफी पिण्याच्या मागे वेडे असलेल्या लोकांचे अनेक किस्से मशहूर आहेत. अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने आपल्या झोपाळूपणावर नामी उपाय म्हणून कॉफी चे सतत सेवन करावयाचे ठरवले. तीन दिवस सतत इंस्टंट कॉफी चे जवळजवळ ३२ पॅकेट संपवल्यानंतर त्याने शेवटी हार मानली.

त्याच्या पदरात फळ काय पडले तर तीन दिवस सलग झोप न लागता जागे राहण्याचा विक्रम, तीन दिवसानंतर प्रचंड प्रमाणात सुरु झालेला अतिसार आणि शेवटी दवाखान्यात अॅडमिट झाल्यानंतर थकून लागलेली झोप!

दुसरा एक विद्यार्थी सकाळी क्लास ला येण्यापूर्वी झोप येवू नये म्हणून जवळजवळ दोन भांडे कॉफी पिवून क्लास ला येत असल्याची मौजेची गोष्ट त्याच्या प्राध्यापकाने नोंदवून ठेवली होती. त्या विद्यार्थ्याला हा प्रकार बंद करावा लागला कारण अति कॉफी पाना मुळे त्याच्या हाताची थरथर नियंत्रणा पलीकडे वाढली.

मुद्दा हा आहे की कॉफीचे कितीही तोटे असले तरी लोक कॉफी आवडीने पितात. कारण कॉफी स्वत: नशा आणत नही मात्र मेंदूमधील उत्साह, आनंद, ताजेतवानेपणा वाढवणाऱ्या पेशींना ती उत्तेजित करते परिणामी मेंदूतून मानवी शरीराला आणि मनाला आनंद देणाऱ्या डोपामाईन सारख्या द्राव्याची निर्मिती होते आणि माणसाचा आळस थकवा दूर होवून त्याल काम करण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह मिळतो.

 

best-coffee-india-inmarathi
tatacliq.com

नुकत्याच रोम शहरातील शास्त्रज्ञानी केलेल्या संशोधनामध्ये मारिजुआना या मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर जी प्रतिक्रिया मेंदूत होते तशीच प्रतिक्रिया कॉफीपान केल्याने देखील होते अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.

सुरुवातीला जेव्हा आपण कॉफी प्यायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला हवा असलेला उत्साह एका कपाने देखील भेटतो. नंतर दिवसाचे १५- १६ तास जेव्हा आपल्याला काम करत राहावं लागतं तेव्हा एका कपाची गरज वेळोवेळी वाढत जाते याचं कारण असं आपलं यकृत आपण पिलेल कॅफिन पचवण्यात हळूहळू कुशल बनत जातं.

जास्तीच कॅफिन जसजस येत जाईल तश्या तश्या स्वरूपाच्या काही रासायनिक तडजोडी मेंदूमध्ये ही व्हायला सुरुवात होते. परिणामी तुमची कॉफीची तल्लफ वाढत जाते.

अगदी तशीच तल्लफ जी मारिजुआना सारख्या अमली पदार्थाचे सेवन करताना येते. हा लेख तुमच्या ऑफिस मध्ये अथवा घरी बसून तुम्ही वाचत असाल आणि नुकताच तुमच्या हातात तुम्ही दिवसातला ३ रा ४था किंवा ५ वा कॉफीचा कप धरला असेल तर समजून घ्यायला हरकत नाही मारिजुआना किंवा कोकेन सारखाच अंमल तुमच्यावर तुमच्या हातातली कॉफी सुद्धा गाजवत आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?