' सूर्यास्ताच्या वेळी पश्चिम क्षितिजावर तांबडा-लाल रंग का पसरतो? जाणून घ्या… – InMarathi

सूर्यास्ताच्या वेळी पश्चिम क्षितिजावर तांबडा-लाल रंग का पसरतो? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला आपल्यातील प्रत्येकालाच आवडत असेल, कारण त्यावेळचे दृश काही वेगळेच असते, जे मनात एक घर करून जाते. सूर्यास्त पाहण्यासाठी आपण नेहमी काही विशेष ठिकाणी जात असतो. समुद्र किनाऱ्यावर किंवा ऊंच ठिकाणावरून हा सूर्यास्त पाहणे खूपच सुंदर आणि मजेशीर असते.

त्यामुळे आपल्याला नेहमी समुद्र किनाऱ्यावर मस्तपैकी भेळ खात सूर्यास्ताचा आनंद लुटणारे कितीतरी जोडपी पाहण्यास मिळतात, कारण सूर्यास्त होतेवेळी जे दृश्य असते ते खूपच आकर्षक आणि रोमँटिक असते. सूर्यास्त होताना सूर्याचे ते रूप आणि आकाशाचा तो रंग नेहमी डोळ्यांमध्ये साठवून ठेवावासा वाटत असतो.

 

Sunset colours.Inmarathi
static.rootsrated.com

सूर्यास्ताच्या काळामधील तो सूर्याचा रंग आणि आकाशाची रंगत काही वेगळीच असते. पण तुम्हाला हे माहित आहे का ? की सूर्यास्ताच्या वेळी अशाप्रकारचा आकाशाचा रंग का होतो. आज आपण त्याच्याबद्दलच काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
हा सूर्याचा रंग त्याच्या प्रवासाचा एक भाग आहे.

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा क्षितिजावर असतो आणि जेव्हा सूर्य हा क्षितिजावर असतो तेव्हा त्याची किरणे ही संपूर्ण दिवसापेक्षा वातावरणामध्ये ३० टक्के अधिक क्षेत्रांपर्यंत जास्त पसरतात.

ही किरणे वातावरणातील कण म्हणजेच धूळ. पाणी आणि वाफ यांच्याशी एकरूप होतात. हे जांभळ्या आणि निळसर रंगाच्या तरंगलांबी (वेव्हलेन्थ) आपल्यापासून दूर नेतात. पण यांच्यामुळे जास्त तरंगलांबी आलेल्या प्रकाशावर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि आकाश हे पिवळ्या, नारंगी आणि लाल रंगाने भरले जाते. लाल रंगामध्ये दृश्यमान (व्हिजिबल) स्पेक्ट्रममध्ये सर्वात जास्त तरंगलांबी असते, त्यामुळे सूर्य हा क्षितिजावर असताना लाल दिसतो.

 

Sunset colours.Inmarathi1
fineartamerica.com

वादळी पावसाच्या दरम्यान, हवेतील पाण्याची वाफ एखाद्या प्रिझमसारखे काम करते, ती वेगवेगळ्या तरंगलांबीद्वारे प्रकाश विभक्त करते. त्यामुळेच आपल्याला पावसामध्ये कधी – कधी इंद्रधनुष्य दिसते. हे वेगवेगळे रंग पाहण्यासाठी प्रत्येक कोन आवश्यक असतो. त्यामुळे आपण जेव्हा हलतो, त्यावेळी इंद्रधनुष्य देखील हलते.

पृथ्वी २४ तासांमध्ये आपली स्वतःची एक प्रदक्षिणा पूर्ण करते आणि हे करत असताना ती सूर्याभोवती देखील फिरत असते. सूर्य देखील दिवसभरामध्ये आपला प्रवास पूर्ण करतो. आकाशामध्ये सूर्यास्ताच्या वेळी तयार होणारे हे रंग प्रकाशाच्या मार्गावर अवलंबून असतात.

 

Sunset colours.Inmarathi2
staticflickr.com

तुम्ही या प्रकाशाला कशाप्रकारे पाहता हे तुमच्या डोळ्यांवर अवलंबून असते. तुमचे डोळे किती संवेदनशील आहेत आणि ते कशाप्रकारे काम करतात, यावर तुम्ही काय पाहता हे अवलंबून असते. जर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस असेल, तर तुम्हाला हे रंग बरोबर दिसणार नाहीत. त्यामुळे यामध्ये तुमचे डोळे एक महत्त्वाची भूमिका साकारतात.

या सर्व क्रियांमुळे आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा पूर्णपणे वेगळा दिसतो, जसा तो पूर्ण दिवसामध्ये देखील दिसत नाही. त्यावेळेचे ते सूर्याचे रूप अभूर्तपूर्व असते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?