रेल्वे स्थानकातील बोर्डावर स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिलेली असते? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्यापैकी प्रत्येकानेच रेल्वेने अनेकदा प्रवास केलेला असेल. प्रवासात मागे पडणारी रेल्वे स्थानके पाहताना तुमचं कधी स्थानकांच्या दोन्ही टोकांना असलेल्या बोर्डाकडे लक्ष गेलं आहे का? त्या बोर्डावर तीन भाषांमध्ये रेल्वे स्थानकाचे नाव लिहिलेले असते आणि त्या स्थानकाच्या समुद्रासपाटीपासूनच्या उंचीची (Mean Sea Level, MSL) नोंद केलेली असते. जसे की समुद्रसपाटीपासून ५६० मीटर उंचीवर अशी नोंद असते.

 

board-inmarathi
quora.com

आपल्यापैकी कोणाला कधी हा प्रश्न पडला आहे का, की भारतात समुद्रसपाटीपासून किती उंचीवर एखादे रेल्वे स्थानक आहे याची माहिती का लिहिलेली असते? त्याचा अर्थ काय असतो? हे प्रवाशांच्या माहितीसाठी लिहिलेलं असतं की आणखी कोणाच्या?

सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की समुद्रसपाटीपासून एखाद्या स्थानकाची उंची (Mean Sea Level) याचा अर्थ काय ?

आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की पृथ्वी गोल आहे. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग थोडा वक्र आहे. यामुळे जगातील ठिकाणे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत मोजण्यासाठी वैज्ञानिकांना एका अशा बिंदूची आवश्यकता होती जो कायम स्थिर राहील. त्यासाठी समुद्राचा पर्याय त्यांना सर्वांत चांगला वाटला आणि MSL च्या मदतीने एखाद्या ठिकाणची उंची मोजणे सगळ्यात सोपे आहे असे वाटले.

याचं आणखी एक कारण हे की समुद्राचे पाणी एकसारखे असते. समुद्रासपाटीपासूनच्या उंचीचा (MSL) उपयोग सिव्हिल इंजीनियरिंग या शाखेत एखाद्या जागेची किंवा बिल्डिंगची उंची मोजण्यासाठी सर्वाधिक केला जातो.

 

sea-level-inmarathi
youtube.com

=====

=====


समुद्रसपाटीपासून उंची (Mean Sea Level, MSL) भारतीय रेल्वे स्थानकावरील बोर्डवर का लिहिलेली असते?

ही प्रवाशांसाठी लिहिलेली नसते तर ती माहिती रेल्वेच्या गार्ड आणि ड्रायव्हर यांच्या माहितीसाठी नमूद करण्यात आलेली असते.

उदाहरणार्थ जर ट्रेन समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंची असलेल्या ठिकाणावरून समुद्रसपाटीपासून 250 मीटर अंतर असलेल्या ठिकाणी जात आहे तर तो चालक या पन्नास मीटरच्या चढणीसाठी त्याच्या इंजिनाला किती torque ची गरज पडेल म्हणजेच इंजिनाला किती पॉवर अधिकची द्यावी लागेल याचा अंदाज सहजपणे बांधू शकतो.

त्याचप्रमाणे जर ट्रेन उतारावर असेल तर खाली येताना ड्रायव्हरला किती घर्षण असायला हवे किंवा किती वेग राखायला हवा हे ठरविण्यात या समुद्रसपाटीपासूनच्या त्या ठिकाणच्या उंचीच्या फलकाची मदत होते.

याशिवाय याच्या मदतीने ट्रेनच्या वरील विजेच्या तारांची उंची सगळीकडे समान राखणे शक्य होते जेणेकरून रेल्वे मार्गावरील विजेच्या तारांचा रेल्वेवरील तारांशी सतत संपर्क होत राहील आणि विद्युतप्रवाह चालू राहील.

तर हे आहे भारतीय रेल्वे स्थानकांमध्ये स्टेशनच्या नावाच्या बोर्डमध्ये त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासून उंची नमूद करण्याचे खरे कारण.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?