“इंटरनेट”चा मालक कोण? जाणून घ्या!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
इंटरनेट ही आजकालच्या लोकांसाठी अगदी जीवनावश्यक गोष्ट ठरत आहे. आज आपला एकही दिवस ह्या इंटरनेट शिवाय जात नाही. आणि समजा जर इंटरनेट पॅक संपला तर असं वाटत की, आपण जगात नाही तर कुठल्यातरी परग्रहावर एकटे भटकत आहोत. एवढे ह्या इंटरनेटचे महत्व आज आपल्या जीवनात आहे. आणि का असायला नको?
आपली जीवन जगण्याची पद्धती ह्या इंटरनेट मुळेच एवढी सोयीस्कर आणि सोप्पी झाली आहे. मग त्याचं श्रेय त्याला द्यायलाच हवे.

पण श्रेय द्यायचं तर द्यायचं कोणाला? म्हणजे इंटरनेटला तर देऊच पण इंटरनेट हा काही माणूस नाही ना? मग कोणीतरी असेल ना ह्या इंटरनेटचा मालक, जो त्याला आपल्यापर्यंत पोहोचवतो. ज्याला आपण इंटरनेट वापरायसाठी पैसे देतो तो नेमका कोण? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात सतत येत असणार ना?

आपण हे इंटरनेट वापरण्यासाठी एयरटेल, आइडिया, रिलायंस अश्या कंपन्यांना पैसे देतो. पण ह्या कंपन्या ज्याच्याकडून इंटरनेट विकत घेतात तो कोण? आज आम्ही आपल्या याच सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन आलो आहोत…
जर तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर कुठला व्हिडिओ बघत आहात, तर तुम्हाला दिसणारा हा व्हिडीओ हजार किलोमीटर दूर असलेल्या वेबसाईटच्या सर्व्हर वरून तुमच्या मोबाईल किंवा कॉम्पुटर स्क्रीन पर्यंत येत असतो.
या वेबसाईटच्या सर्व्हर आणि तुमच्या मोबाईल/कॉम्पुटर मध्ये जे कनेक्शन बनते, ह्याच कनेक्शनचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात.
आपण इंटरनेट करिता एअरटेल, आयडिया, जिओ अश्या राष्ट्रीय कंपन्यांना पैसे देतो. आणि ह्या कंपन्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पैसे देतात.

ह्या कंपन्या समुद्रात ऑप्टिकल फाइबर टाकून एका देशाला दुसऱ्या देशाशी कनेक्ट करतात.

पण जर तुम्ही इंटरनेटच्या मालकाला शोधत असाल, तर अशी कुठलीही ठराविक व्यक्ती नाही जी इंटरनेट ची मालक असेल.

मग जर कोणी ह्या इंटरनेटचा मालक नाही तर मग हे इंटरनेट चालतं तरी कसं?
तर इंटरनेटचा निर्माण आणि त्यासाठी होणाऱ्या सर्व रिसर्च करिता वेगवेगळ्या राष्ट्र तसेच काही खाजगी कंपन्या, इंजिनीअर्स, सिव्हील सोसायटी, तसेच इतरही काही क्षेत्रांचा समावेश असतो.
–
- या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..
- आपण इंटरनेटवर जी कामे बिनधास्तपणे करतो, वास्तवात ती ‘बेकायदेशीर’ आहेत…!
–
वेबसाईट अड्रेस म्हणजेच इंटरनेट डोमेन देणारी संस्था आईकॅन (इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइंड नेम्स अॅण्ड नंबर्स) सारख्या मुलभूत कंपन्या अमेरिकेत आहेत. ज्यामुळे इंटरनेटवर अमेरिकेचे वर्चस्व असल्याचे मानल्या जाते.

पण इंटरनेटला एकाधिकार च्या स्थितीपासून वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र अंतर्गत लोकतांत्रिक व्यवस्था अमलात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
युनायटेड नेशन्सचे अनेक सदस्य एक बहुपक्षीय व्यवस्था असायला हवी, असे मानतात. ज्यात इंटरनेटशी संबंधित सर्व पक्षांचे हित जपले जाते.

अनेक देशांना सायबर सुरक्षा आणि इंटरनेटचा दुरुपयोग होईल अशी भीती आहे. ज्यामुळे त्यांना इंटरनेटवर नियंत्रण मिळवायचे आहे.
इंटरनेटचे जाळे हे संपूर्ण जगभर पसरलेले आहे. हे इंटरनेटचे विश्व देखील विशाल, अफाट आहे. जर ह्याबद्दल पूर्णपणे जाणून घ्यायचे म्हटले तर त्यासाठी किती वेळ लागेल हे सांगताही येत नाही.
पण तरी हा लेख वाचल्यावर आपण इंटरनेट वापरायचे जे पैसे देतो ते नेमके कोणाला जातात ह्याची माहिती आपल्याला नक्कीच मिळाली असेल…
–
- भारतातील इंटरनेटचा स्पीड शेजारील देशांपेक्षाही कमी का आहे? समजून घ्या..
- ही आहेत भारतातली सर्वात जलद इंटरनेट असलेली शहरे : तुमचे शहर कितव्या स्थानावर? जाणून घ्या…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved