जेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार

डॉक्टर्स जर रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यायला लागले तर विकसित देशांमध्ये आरोग्य खर्च  ७०%  ने आणि विकसनशील देशांमध्ये त्याहूनही कमी होऊ शकतो.

जेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या तुलनेत १० ते १२ टक्केच विकली जातात. जेनेरिक औषधांमुळे मिळणारा कमी नफा आणि कमिशन यांमुळे औषध कंपन्या, मेडिकल स्टोर आणि डॉक्टर यांपैकी कोणालाच जेनेरिक औषधांची मागणी वाढावी असे वाटत नाही. आज बाजारात जवळपास सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी असून गरीब माणूस देखील सहज ही औषधे विकत घेऊ शकतो.

=====

=====


Generic-Medicine-marathipizza01
tradeindia.com

 

जेनेरिक औषधे कशाला म्हणतात?

जेनेरिक औषधांना ‘इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन’ देखील म्हटले जाते, ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधां सारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘एसेंशियल ड्रग’लिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात. ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे  जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.

एखाद्या आजाराच्या उपचारासाठी रिसर्च आणि स्टडी केल्यानंतर एक रसायन (साल्ट) बनवले जाते, जे सहजरीत्या उपलब्ध करण्यासाठी त्यांना औषधांचे रूप दिले जाते. ह्या औषधांना प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या नावाने विकते. काही कंपन्या महाग किंमतीत विकतात तर काही कंपन्या स्वस्त दरात विकतात.

 

जेनेरिक औषधे स्वस्त का असतात?

ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात, पण या कंपन्या जेनेरिक औषधांची किंमत कशीही ठरवू शकत नाही. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते. तुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्याच साल्ट मधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात. महाग औषधे आणि त्याच स्लाट मधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी पाच ते दहा पट अंतर असते. काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये ९०% फरक असतो.

Generic-Medicine-marathipizza02
clinicalresearchsociety.org

जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते. हे देखील कारण आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा होते त्या कारणाने सुद्धा किंमत कमी होते आणि सर्वात मोठे कारण हे आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या या औषधांची जाहिरात करत नाहीत, त्यामुळे ह्या औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात.

 

या आजारांची जेनेरिक औषधे स्वस्त असतात-

काहीवेळा डॉक्टर फक्त साल्टचे नाव लिहून देतात, तर कधी कधी फक्त ब्रँडेड औषधांचे नाव लिहून देतात. काही खास आजार आहेत ज्यांची जेनेरिक औषधे उपलब्ध असतात परंतु त्याच साल्टची ब्रँडेड औषधे महाग असतात. जसे – न्युरोलोजी, युरीन, हार्ट डिजीस, किडनी, डायबिटीज, बर्न प्रोब्लेम, या आजारांच्या जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमध्ये खूप जास्त अंतर दिसून येते. एकाच स्लाटच्या दोन औषधांच्या किंमतीमधील मोठा फरकच जेनेरिक औषधांचा पुरावा आहे.

 

जेनेरिक औषधे कशी प्राप्त करू शकता?

जेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोर्स वर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा. तसेच ही औषधे Healthkart Plus आणि Pharma Jan Samadhan यांसारख्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही सहज स्वस्तात मिळवू शकता.

Generic-Medicine-marathipizza03
in.reuters.com

 

=====

=====

जेनेरिक औषधे न मिळण्यामागची मुख्य समस्या

डॉक्टर्सने जेनेरिक औषधे लिहून दिली असतील तरी सुद्धा मेडिकल स्टोर्स रुग्णाला दुसऱ्या महागड्या कंपनीची औषधे देतात. ही चलाखी करताना ते रुग्णाला हे कारण सांगतात की त्यांच्याकडे लिहून दिलेली औषधे नाही आहेत. हे सर्व करून त्यांना केवळ फायदा मिळवायचा असतो. कित्येकवेळा डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतात आणि ती मेडिकल स्टोर्स मध्ये मिळतात सुद्धा, परंतु त्या औषधांमध्ये कंपोजिशन आणि साल्ट त्या प्रमाणात नसते ज्या प्रमाणात ते असायला पाहिजे, त्यामुळे रुग्णाला त्या औषधांचा पूर्णपणे लाभ मिळत नाही.

यासाठी सरकारने कायदा करून त्याचा सक्तीने पालन करण्यास डॉक्टरांना सांगितले पाहिजे म्हणजे डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतील आणि मेडिकल स्टोर्सवाले काही कारण न सांगता ती औषधे लोकांना सहज उपलब्ध करून देतील.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?