क्रिकेटमधील ‘हे’ अतरंगी १० नियम जे तुम्हाला बिलकूल माहित नसतील!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारत म्हणजे क्रिकेटवेडा देश! असा देश जेथे प्रत्येक घरातील मुलगा वयाच्या १५ व्या वर्षीपर्यंत क्रिकेटर व्हायची स्वप्ने पाहतो. इथे लहानातल्या लहान मुलाला क्रिकेटबद्दल इत्यंभूत माहिती असते. मोठ्यांबद्दल तर विचारायलाच नको. भले करियर कोणतही असो, पण आजही भारताची मॅच चालू असताना हमखास टीव्ही समोर जाऊन बसणार आणि मॅच संपल्यावरच उठणार.

 

cricket-marathipizza
edition.cnn.com

याच डेडिकेशन मुळे त्यांना देखील क्रिकेट मधील खडानखडा माहिती असते. पण इतकं असूनही आम्ही असच म्हणून की तुम्हाला क्रिकेटबद्दल म्हणावी तेवढी माहिती नाही. रागावू नका, पण जे सत्य आहे तेच सांगितलं. काय म्हणता? असं होणं शक्य नाही. चला तर मग जाणून घेउन क्रिकेट जगतातले असे अतरंगी नियम जे तुम्ही आजवर कधीही ऐकले नसतील..!

=====

=====


 

१) टाईम आउट

 

cricket-rule-marathipizza01
sportskeeda.com

विकेट पडल्यावर जर पुढचा बॅट्समन तीन मिनिटांच्या आत आला नाही, तर विरोधी टीमच्या अपीलनुसार अम्पायर त्या बॅट्समनला आउट ठरवू शकतात.

या रुलशी निगडीत एक प्रसंग सचिन तेंडूलकरसोबत घडला होता, परंतु त्याला आउट देण्यात आले नाही, कारण कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सचिन हा १८ मिनिटांसाठी फिल्डवर नव्हता. क्रिकेट मधील आणखी एका नियमानुसार जर एखादा फिल्डर ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिल्डच्या बाहेर गेला तर जेवढ्या वेळासाठी तो फिल्डच्या बाहेर आहे तेवढ्या वेळासाठी तो बॅटिंग वा बॉलींग करू शकत नाही. ही गोष्ट सचिनच्या बरोबर लक्षात होती, परंतु इतर सहकाऱ्यांच्या लक्षात आली नाही आणि चौथ्यादिवशी सामना सुरु झाल्यावर अवघ्या १३ मिनिटांमध्ये भारताच्या २ विकेट्स गेल्या.

आदल्या दिवशी सचिन १८ मिनिटांसाठी फिल्ड बाहेर होता, त्यामुळे त्यालाअजून ५ मिनिटे फिल्ड बाहेर राहणे भाग होते. सर्वजण सचिन कधी बॅटिंगला जातो याची वाट पाहत राहिले. परंतु सचिन काही बॅटिंगला आला नाही अखेर सौरव गांगुलीच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तो त्वरेने तयार झाला आणि स्वत: बॅटिंगसाठी उतरला. साउथ आफ्रीकेचा कॅप्टन स्मिथचे येथे कौतुक करायला हवे, त्याने जर अम्पायर कडे अपील केले असते तर कदाचित सचिनच्या नंतर आलेला गांगुली टाईम आउट नियमाप्रमाणे बाद आहे असे अपील तो करू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. हा संपूर्ण प्रसंग तुम्ही या व्हीडियोमध्ये पाहू शकता.

 

 

२) लॉस्ट बॉल

 

cricket-rule-marathipizza02
zimbio.com

जर मॅच खेळताना बॉल हरवला तर फिल्डिंग करणारी टीम अम्पायर कडे लॉस्ट बॉलची आपली करू शकते. या अपील नुसार अम्पायर तो बॉल ‘डेड बॉल’ घोषित करू शकतो.

 

३) हेल्मेट कनेक्शन

 

cricket-rule-marathipizza03
en.wikipedia.org

जर कॅच पकडते वेळी बॉल फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूच्या कोणत्याही प्रोटेक्टिव वस्तूला (हेल्मेट, पॅड, एल्बो गार्ड, कॅप) स्पर्श करून गेली आणि त्या नंतर त्याने कॅच घेतली तर बॅट्समनला आउट दिले जात नाही.

 

४) अम्पायरची परवानगी न घेता बाहेर गेलात तर ५ रन्स एक्सट्रा

 

cricket-rule-marathipizza05
readtiger.com

जखमी झाल्यावर एखादा फिल्डर जर अम्पायरची परवागनी घेतल्याशिवाय फिल्डच्या बाहेर गेला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्सट्रा ५ रन्स मिळतात.

 

५) एकापेक्षा जास्त वेळ बॉल मारण्याचा प्रयत्न न करणे

 

cricket-rule-marathipizza06
telegraph.co.uk

बॉलरने टाकलेला चेंडू बॅट्समनने मुद्दामहून एकाच वेळेस दोनदा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याला आउट दिले जाते.

ही व्हिडियो पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

 

६) नो अपील-नो आउट

 

cricket-rule-marathipizza07
rebrn.com

जर फिल्डिंग करणारी टीमजोवर  LBW किंवा Catch ची अपील अम्पायर कडे करत नाही तर अम्पायर आउट असल्यावर देखील बॅट्समनला आउट देऊ शकत नाही.

 

७) स्पायडर कॅम आणि बॉल कनेक्शन

 

cricket-rule-marathipizza07
quora.com

जर बॅट्समनने मारलेला चेंडू फिल्डवर घिरट्या घालणाऱ्या स्पायडर कॅमेराला जाऊन आदळला तर तो डेड बॉल घोषित करण्यात येतो, त्यावर बॅट्समनला रन्स मिळत नाहीत, किंवा जर मैदानाला छत असेल आणि त्यावर जाऊन जरी चेंडू आदळला तर त्यावरही बॅट्समनला रन्स मिळत नाहीत तो बॉल ‘डेड बॉल’ घोषित केला जातो.

माईक हस्सी सोबत घडलेला हा प्रसंग पहा!

८) रिटायर्ड आउट

 

cricket-rule-marathipizza09
dawn.com

जर बॅट्समन अम्पायरची परवानगी घेतल्याबिगर रिटायर्ड झाला तर त्याला अम्पायर रिटायर्ड आउट घोषित करू शकतो. हा नियम जास्त करून फ्रेंडली मॅचेस मध्येच पाहायला मिळतो.

 

९) हेल्मेट मिळवून देणार रन्स

 

cricket-rule-marathipizza04
quora.com

शॉट मारल्यावर जर बॉल विकेटीकीपरने फिल्डवर ठेवलेल्या हेल्मेटला जाऊन आदळला तर बॅटिंग टीमला ५ रन्स एक्सट्रा मिळतात.

विश्वास बसत नसेल तर पाकिस्तान आणि श्रीलंका या संघादरम्यान खेळवण्यात आलेला हा प्रसंग तुम्ही पाहायलाच हवा.

 

१०) हॅंडलिंग द बॉल

 

cricket-rule-marathipizza010
stuff.co.nz

जर एखाद्या बॅट्समनने आउट होण्यापासून वाचण्यासाठी मुद्दामहून स्वत: बॉल विकेटपासून लांब केला तर हॅंडलिंग द बॉल नियमानुसार त्याला आउट घोषित केले जाते.

=====

=====

या नियमाचा स्टीव्ह वॉजला कसा फटका बसला ते पहा.

 

 

 

कळले का हे क्रिकेटमधील काही विचित्र पण आजही वापरात असणारे नियम?? अहो मग शक्य तितकं शेअर करा आणि आपल्या दोस्तांनाही सांगा की!

हे देखील वाचा: (जेव्हा क्रिकेट टीममधील सर्व ११ खेळाडूंना Man Of The Match पुरस्कार मिळाला !)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?