' बंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल – InMarathi

बंगळूरूच्या प्रशांतने बनवला पाण्यावर तरंगणारा मोबाईल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आज मोबाईल फोन्सची क्रेझ इतकी वाढली आहे की प्रत्येकाला लेटेस्ट फिचर असणारा असा मोबाईल हवा असतो, ज्याचे फंक्शन इतर स्मार्टफोन्स पेक्षा थोडे हटके असतील, मग तेवढंच इम्प्रेशन पण मारता येतं ना राव ! पण हे महागडे मोबाईल्स सांभाळण देखील तितकंच जिकरीच काम असतं. खासकरून पाण्यापासून, कारण मोबाईल एकदा का पाण्यात पडला की त्याची काही शाश्वती देता येत नाही. शेवटी बोलून चालून यंत्रच ते ! याच समस्येवर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी वॉटरप्रुफ मोबाईलची संकल्पना पुढे आणली. आज बाजारात अनेक वॉटरप्रुफ मोबाईल्स उपलब्ध आहेत ज्यांना पाण्यापासून कोणताही धोका नाही. याच वॉटरप्रुफ मोबाईल्स क्षेत्रात क्रांती घडवणार कार्य केलयं आपल्या भारतीय पठ्ठ्यानं ! या तरुणाने तयार केला आहे असा मोबाईल जो वॉटरप्रुफ तर आहेच पण हा मोबाईल पाण्यावर तरंगतो देखील !

prashant-raj-marathipizza01

स्रोत

बंगळूरमध्ये राहणाऱ्या प्रशांत राज या तरुणाने हा मोबाईल तयार केला आहे. त्याने हा मोबाईल बाजारात आणण्यासाठी कंपनी देखील स्थापन केली असून कंपनीचे नाव ठेवले आहे ‘Comet Core’ ! जगामध्ये अश्या प्रकारचा मोबाईल इतर कोणत्याही कंपनीने अजून बनवलेला नसून ही किमया आपल्या प्रशांतने साधून दाखवली आहे.

prashant-raj-marathipizza02

स्रोत

 

यावर प्रतिक्रिया देताना प्रशांत म्हणतो,

हा मोबाईलच्या युगातील सर्वात मोठा शोध ठरू शकतो. आजवर जेवढे शोध लागले त्यांनी मोबाईलच्या तंत्रज्ञानावर कार्य केले. मी मात्र लोकांची समस्या हेरली आणि त्यावर काम सुरु केले. तेव्हा कुठे माझ्या मेहनतीला फळ मिळालं आणि पाण्यावर तरंगणारा हा मोबाईल मी तयार केला.

या मोबाईलमध्ये इतर स्मार्टफोन्सप्रमाणे भन्नाट फीचर्स देखील आहेत. या मोबाईलचा कॅमेरा १६ मेगापिक्सल असून स्क्रीनची साईज ४.७ इंच इतकी आहे. एवढचं नाही तर 2GHz Octa-core प्रोसेसरच्या साथीला ४ जीबी रॅम सुद्धा आहे. म्हणजेच फोन हँग होण्याची चिंताच मिटली.

prashant-raj-marathipizza03

स्रोत

प्रशांतने हा मोबाईल अजूनही बाजारात आणला नाही, कारण त्याला या मोबाईलवर अजून सुधारणा करून ग्राहकांना एक बेस्ट स्मार्टफोन ऑफर करायचा आहे. तरीही जे लोक या मोबाईलच्या प्रेमात पडले आहेत ते अॅडव्हान्स बुकिंग करू शकतात. या मोबाईलची किंमत १६००० रुपये इतकी ठरवण्यात आली आहे.

 

भारतीय तरुणांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल भयंकर आकर्षण आहे, या आकर्षणाला योग्य ते खतपाणी दिलं तर यापेक्षाही भन्नाट शोध आपले भारतीय पोट्टे लावू शकतात याबद्दल शंका नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?