' विराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend! – InMarathi

विराट कोहली – आजचा Star, उद्याचा Legend!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

==

भारतीय रन मशीन सध्या मुंबई वरून दिल्लीला शिफ्ट झाली आहे असं म्हणता येईल असं वाटतंय.

राजाधीराज फलंदाज “द सचिन रमेश तेंडुलकर” हे गोलंदाज निर्दालक प्रभूती निवृत्त झाल्यावर पूढे भारतीय टीमचे कसे होईल हे प्रश्न पडत असतानाच 2008 जुलै महिन्यापासूनच एक तरतरीत रोपटं भारतीय क्रिकेट च्या फलंदाजीच्या सुपीक जमिनीत मूळ धरत होतं.

त्या रोपटयाचं नाव म्हणजे “विराट कोहली”.

virat-kohli-marathipizza

आज भारतीय टीमचा कणा बनलेल्या विराट कोहलीने स्वतःच्या दमावर स्वतःचं नाव कमावून, टीममधे आपली जागा पक्की केली आहे.

सुरवातीला कॅप्टन धोनीकडून रोहित शर्माला कोहलीपेक्षा सतत संधी मिळत जात असल्याने मनातली खदखद त्याने 2009 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक हाणल्यावर त्वेषाने ड्रेसिंग रूम कडे बॅट दाखवत दाखवली होती. तेव्हा त्याच्यातील प्रचंड ऊर्जा लोकांना प्रथमच दिसली होती.

2011 मध्ये ऑस्ट्रेलिया टूर ला शेवटच्या विकेटसोबत आपले पहिले वहिले शतक करताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या स्लेजिंगला तोडीस तोड उत्तर देत जो अविर्भाव दाखवला होता तेव्हाच कोहलीतली आक्रमकता आणि पोटेन्शियल दिसलं होत. आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा मध्ये फरक असतो. कोहली हा आक्रस्ताळ नाही – पुरेपूर आक्रमक आहे.

virat-kohli-aggression-marathipizza

आक्रमकता हाच संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग हे कोहलीचं सूत्र च नाही तर जणू त्याचं ते गुणसूत्र आहे.

2011 नंतर वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलिया टूर आटोपल्यावर विराट कोहलीची कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली.मग 2012 मध्ये आशिया कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध 180 च्या वर रन्स, ऑस्ट्रेलियात श्रीलंका विरुद्ध ना भूतो न भविष्यती असा परिक्रम केल्यावर मलिंगाला ही कोहलीचे भयप्रद स्वप्ने पडली असावी !

ऑस्ट्रेलिया जणू कोहलीची आवडती शत्रू टीम आहे. त्यांच्या विरुद्ध तो अधिक आक्रमक होऊन त्वेषाने खेळतो. आणि फक्त बॅट नेच बोलतो, असे नाही – तर तोंडानेही बोलतो, प्रत्युत्तर देतो. 😀

२०१५ च्या ऑस्ट्रेलिया टूर मध्ये धोनीने अचानक टेस्ट मधून निवृत्ती घेतल्यावर कोहलीने ज्या प्रकारे चारही टेस्टस् मध्ये आक्रमक बॅटिंग आणि कॅप्टनसी केली ती जबरदस्त होती! चारही कसोटीत त्याने चार शतकं झळकवली, सोबत मिशेल जॉन्सनला शाब्दिक आणि पुल हूकचे फटकेही हाणले…!

२०१६ च्या 20-20 वर्ल्ड कप मध्ये केलेला पराक्रम कधीही नं विसारण्यासारखा!

(कोहलीच्या ह्या यशा मागचं रहस्य जाणून घ्यायचंय? वाचा: विराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल)

एकेकाळी भारत दुसर्यांदा बॅटिंग करत लक्ष मिळवताना नेहमीच ढेपाळायचा! कोहलीच्या रूपाने एक “टार्गेट चेसिंग स्पेशालिस्ट” भारतीय संघाला मिळाला आहे.

कोहली हा “आजचा” खेळाडू आहे.

तो स्वतःला प्रेजेंटेबल ठेवतो. वेळ पडल्यास मैदानावरच वाद करतो! भावनांचं प्रदर्शन उघडपणे करतो! उघडपणे चालू मॅच मध्ये आपल्या मैत्रिणीला फ्लाइंग किस करतो!

virat-kohli-flying-kiss-marathipizza

महान सचिनचे वन डे क्रिकेटचे रन्स आणि सेंचुरिजचे सर्व रेकॉर्ड्स विराट कोहली मोडणार हे निश्चित आहेच. पण सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची चुकीच्या पद्धतीने तुलना करून सचिनपेक्षा विराट मोठा असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र दोन मिनिटे मौन! 😀

सचिन हा लिजेंड होता. आहे. राहील.

विराट हा स्टार आहे. लिजेंड होणार आहे…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhijeet Panse

Author @ MarathiPizza.com

abhijeet-panse has 4 posts and counting.See all posts by abhijeet-panse

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?