' मृत सैनिकांच्या टाळूवर लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार कधीपर्यंत चालणार? – InMarathi

मृत सैनिकांच्या टाळूवर लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार कधीपर्यंत चालणार?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

काल ८५ वा भारतीय वायुसेना दिवस होता. सुरक्षेच्या विवीध कर्तव्यांत गुंतलेल्या यंत्रणांचा अभिमान बहुतेक व्यक्तींना असतो. त्यामुळे सैन्याच्या, जवानांच्या क्षतिने लोकमानस हळवं होतं.

६ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास अरुणाचल प्रदेशातील तवांग जवळ असलेल्या खिरमू AIR BASE येथुन रशियन बनावटीच्या Mi-17 श्रेणीतील V5 प्रकारातल्या एका हेलीकॉप्टरने चीनच्या सीमेलगत असलेल्या यांगस्ते नावाच्या भारतीय सैन्य तळावर केरोसीनचे डब्बे पोहोचवायला उड्डाण केलं.

सकाळच्या अंदाजे ०६ वाजता, त्या हेलीकॉप्टरला अपघात झाला. आणि आत कार्यरत असलेल्या पाच भारतीय वायूसैन्याच्या अधिकाऱ्यांसह २ जवानांचा असा एकुण सात जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

शोध मोहीमेअंती सातही कलेवरं वैद्यकीय चाचणी आणी पुढील औपचारीकतांसाठी खिरमु बेस वर पाठवली गेली. आणी तिथुन पुढे तेजपुर एअर बेसवर नेण्यात आली. त्यानंतर या बॉडीज त्यांच्या-त्यांच्या राज्यांत पाठवल्या गेल्या. लष्करी इतमामांत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.

====================

सदर दुर्घटने नंतर लष्कराच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी (अनेकवचनी नाही) जवानांचे कागदी पुठ्ठयांत/प्लास्टीकच्या कापडात गुंडाळलेले फोटो “मातृभूमी-भारताच्या सेवेसाठी बाहेर पडलेले जवान, असे परतले” अशा वाक्यांच ट्विट केलं. हे ट्विट कित्येक लोकांनी जसचं-तसं रि-ट्विट केलं.

कित्येक वृत्तपत्रं, वाहीन्या, पत्रकार, संपादक, माध्यमकर्मी, ऑनलाईन पोर्टल्स यांनी या ट्विटचा आधार घेत बदनामीकरणाची राळ उडवली, लांच्छनास्पद कृत्य वगैरे ठरवत बातम्या प्रसारीत झाल्या.

लेफ्टनंट जनरल H. S. Panag यांच ट्विट :

 

 

Seven young men stepped out into the sunshine yesterday, to serve their motherland. India. This is how they came home.

निधी राझदान यांच री-ट्विट, सोबत “ही कसली राष्ट्रभक्ती” असा टोमणा.

 

nidhi raazdan marathipizza

 

 

Shameful. This is how we treat the bodies of our soldiers. What kind of nationalists are we?

बरखाजी दत्त, यांनी “हृदय द्रावक, कर्कश्य टेलीव्हीजन आणी ह्यॅशटॅगची राष्ट्रीयता” अशी टिपण्णी केली.

 

barkha dutt tweet marathipizza

 

No. If so, this is heart breaking. Ironic too in an age of shrill hashtag TV Nationalism.

दैनिक महाराष्ट्र टाईम्सची बातमी –

धक्कादायक… जवानांचे मृतदेह पुठ्ठ्यात कोंबले!

I am a Troll पुस्तकाच्या लेखीका स्वातीजी चतुर्वेदी यांच रि-ट्वीट

“तुम्हांला भारतीय म्हणून लाजवणारी घटना. सर्वस्व अर्पण केल्यानंतर, त्यांचा वाट्याला हे यावं ? आणी हे RW ( राईट विंगवाले ) खोट्या राष्ट्रीयतेवाले ट्रोल्स !”

 

swati chaturvedi tweet marathipizza

 

Makes you ashamed as an Indian. Do they deserve this after supreme sacrifice. While, RW trolls fake “nationalism”!

====================

भारतीय सैन्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून केलेले ट्विट्स हे असे :

“HAA दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्यांची पार्थीव शरीरं तात्कालीक उपलब्ध साधनांच्या सहाय्याने पाठवली गेली”

“धारातीर्थी पडलेल्या जवानांना यथोचीत लष्करी सन्मान दिला गेला. पार्थीवं नेण्यासाठी बॉडी बॅग्स, शवपेट्यांची उप्लब्धता सुनिश्चित केली जाईल.”

 

 

1 : Mortal remains of heptr accident in HAA on 6 Oct 17 recovered, sent wrapped in local resources is an aberration.

2 : Fallen soldiers always given full military honour. Carriage of mortal remains in body bags, wooden boxes, coffins will be ensured.

====================

नक्की काय झालं ?

हॅलीकॉप्टर क्षतिग्रस्त होऊन पडलं तो भाग HAA म्हणजे हाय अल्टीट्यूड एरिया…म्हणजेच समुद्र सपाटी पासून उंचावर असलेला भुभाग. समुद्र सपाटी पासून जवळपास १७००० फुट उंचावर ही दुर्घटना घडली.

एवढ्या उंचीवरील प्रतीकूल परिस्थीतीत बॉडी बॅग्स नसल्याने साहजिकच प्रेत बेस कँप पर्यंत नेण्यासाठी उपलब्ध साधनांचा वापर केला गेला. बेस कँप मधील वैद्यकीय चाचणी आणि इतर औपचारीक प्रक्रीये नंतर शवपेट्यांत, राष्ट्रध्वज लपेटून यथोचीत सैनीकी सन्मानाने हुतात्म्यांच्या कलेवरांची त्यांच्या-त्यांच्या घरी रवानगी केली गेली. यात मृत सैनीकांच्या प्रेतांचा अपमान वगैरे गोष्टच नव्हती.

====================

राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी लोक हा हल्ली काहींच्या चेष्टेचा विषय झाला आहे. तर काहींच्या रोजनीशीचा.

स्वातीजी चतुर्वेदींसारख्या कित्येकांना ही संधी समजावी यात नवल निश्चित नाही.

पण या घटनेचा आपापल्या द्वेषाचा कंड शमवण्यासाठी असा केलेला वापर ठिक होता काय?

आपले राजकीय स्कोअर सेटल करण्यासाठी कोणत्या पातळीवर उतरणार?

टीप :

काही लोकांच्या मुद्दयांच्या अशा घृणीत राजकीयकरणला प्रसीद्धी का द्यावी असा विचार डोक्यात आला होता…पण हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोच असलेल्या व्यक्तींकडून जेव्हा अशा गोष्टी पोहोचतात, तेव्हा दुसरी बाजू न-मांडल्याने यांचा प्रचार खरा आहे, अशी समजुत होते कित्येकांची.

ज्यांनी या प्रकरणात टिका केल्यात, त्यांनी “बॉडी बॅग्सची अनुपलब्धता का?” हा प्रश्न विचारलेला नाही. स्कोअर सेटल करणे – एवढाच हेतू दिसला. आणि त्याचंच दुःख झालं. म्हणूनच हा लेखन प्रपंच.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?