' केजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का? सत्य वाचा! – InMarathi

केजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का? सत्य वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे तुम्ही तुम्हाला वाटेल ते बोलू शकता. पटेल तसा पोषाख परिधान करू शकता. पण स्वतःला आम आदमीचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पेहरावावर – त्यांच्या “चप्पल – मफलर” वर आपण अनेकदा जोक्स वाचले असतील. सोशल मीडीयावर चर्चा केली असेल.

कित्येकांनी केजरीवाल “साधेपणाचं” ढोंग रचतात असा सर्रास आरोप अनेकदा केला आहे. पण हे असे आरोप खरे आहेत का? त्यांत काही तथ्य आहे का?

 

arvind-kejriwal-marathipizza

त्यांच्या या साधेपणाची शहानिशा अमर कुमार नावाच्या व्यक्तीने Quora वर केली आहे. पण सरळ शहानिशा करण्यापूर्वी अमरकुमार यांनी ह्या आरोपांमागची खरी तक्रार काय असू शकते, ह्याचा धांडोळा घेतलाय.

ते म्हणतात, केजरीवालांच्या रहाणीमानावर आक्षेप घेणाऱ्यांचे तीन तर्क असू शकतात.

१) लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरता केजरीवाल असा पेहराव जाणीवपुर्वक करत आहेत. (म्हणजेच, हे नाटक आहे.)

२) ते कदाचित नाटक करत नसतील. पण निवडून येण्यापूर्वी त्यांचा हा पेहराव ठिक होता. एका राज्याचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी स्वतःला व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे.

३) ते सामान्य राहत असले तरी सामान्यांसाठी काही कामं करत नाहीत. आंदोलनं करत स्वतःला चर्चेत ठेवण्यात ते मशगुल असतात. म्हणूनच, स्वतःचं अपयश लपवून साधेपणाची कौतुकं व्हावीत म्हणून हा पेहराव आहे.

आता ह्या तिन्ही तर्कांवर, आक्षेपांवर केजरीवाल दोषी ठरतात का हे बघू.

१) लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरता केजरीवाल असा पेहराव जाणीवपुर्वक करत आहेत. (म्हणजेच, हे नाटक आहे.)

लोकांचं लक्षं वेधून घेण्याकरता “आत्ताच” केजरीवाल असे राहत असतील का? पण तसं दिसत नाही.

ते प्रसिद्धीत येण्यापूर्वीपासूच साधे होते हे पुढील फोटो बघून लक्षात येते.

वर्ष 2013 मध्ये – म्हणजेच चार वर्षांपूर्वी ‘आप’चा प्रचार करताना त्यांनी तीच सँडल परिधान केली होती, जी त्यांनी फ्रान्सच्या अध्यक्षांना भेटताना वापरली. तीच्यावरून बरीच टीका होत असते.

 

arvind kejriwal - InMarathi 07

 

‘आप की अदालत’ या कार्यक्रमात 2012 साली मुलाखती करता गेले असता ते पुन्हा सँडलमध्येच दिसले.

 

aap ki adalat arvind kejriwal sandals inmarathi

 

वर्षं 2011 मध्ये अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनादरम्यान ते प्रसारमाध्यमांत त्याच पेहरावात गेले होते. “इंडियन ऑफ द इयर” हा पुरस्कार मिळाला असता, तो स्वीकारण्यासाठी केजरीवाल सँडलवरच गेले होते.

 

arvind kejriwal - InMarathi 009

 

वर्ष 2013 मध्ये सीएनएन चॅनलने इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला त्यावेळीही त्यांच्या पेहरावात बदल नव्हता.

 

arvind kejriwal - InMarathi 10

 

लोकपाल बिलाच्या आंदोलनादरम्यान लोकांचे लक्ष वेधण्याकरता असं केलं असेल का? पुढचे फोटो या प्रश्नावर अधिक प्रकाश टाकतील.

वर्ष 2009 मध्ये श्रीलंकेतील एका वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्येही त्यांनी सँडल घातली होती.

 

arvind kejriwal - InMarathi 11

 

२००८ साली – तीच सॅन्डल…!

 

arvind kejriwal inmarathi sandal

 

2006 साली केजरीवाल यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला असता त्या समारंभातही ते सँडलवरच गेले होते.

 

arvind kejriwal - InMarathi 01

 

त्याही आधी – 2002 साली ते साधेच राहत होते. त्यांचा २००२ सालचा हा व्हिडीओ बघा.

 

 

थोडक्यात – केजरीवाल “नाटक” करत नाहीयेत. म्हणजेच, त्यांच्यावरचा पहिला आरोप सिद्ध होत नाही.

आता दुसरा तर्क.

२) ते कदाचित नाटक करत नसतील. पण निवडून येण्यापूर्वी त्यांचा हा पेहराव ठिक होता. एका राज्याचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी स्वतःला व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे.

पण – हा तथाकथित “दोष” फक्त केजरीवालांचा आहे का हो? असा आपला आवडणारा पेहराव कायम ठेवणारे केजरीवाल एकटेच नव्हे!

केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त आणखीही काही नेते मंडळी आहेत. जे सँडल वापरतात. आपला विशिष्ट पेहराव कायम ठेवतात.

उदाहरणारणार्थ –

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक

 

arvind kejriwal - navin patnaik- InMarathi 02

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

 

arvind kejriwal - yogi Inmarathi03

 

मनोहर पर्रिकर…

 

arvind kejriwal - InMarathi 14

 

केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांचा हा फोटो, प्रसंग आणि पेहराव पहा…!

 

arvind kejriwal - Uma Bharti- InMarathi 04 jpg

इथे, “ह्यांनी केलं मग केजरीवालांचं का चालत नाही” असा प्रतिक्रियात्मक प्रश्न नसून, अनेक नेते आपापलं राहणीमान तसंच ठेवतात – केजरीवाल फार वेगळं, अतर्क्य काही करत नाहीयेत – एवढंच नमूद करायचं आहे.

आता येऊ शेवटच्या मुद्द्यावर.

३) केजरीवाल सामान्य राहत असले तरी सामान्यांसाठी काही कामं करत नाहीत. आंदोलनं करत स्वतःला चर्चेत ठेवण्यात ते मशगुल असतात. म्हणूनच, स्वतःचं अपयश लपवून साधेपणाची कौतुकं व्हावीत म्हणून हा पेहराव आहे.

सध्याच्या सरकारमधील नेत्यांचा पेहराव आणि केजरीवाल यांच्या पेहरावात, सँडल घालण्यातील साधेपणा सारखाच असला तरी केजरीवाल यांच्या साधेपणाविषयी चर्चा करूया.

कारण ते आम आदमी म्हणजेच सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा दावा करतात.

ते नेहमी सरकार विरोधात मोर्चे आणि आंदोलनं करतात पण प्रत्यक्षात दिललीमध्ये त्यांनी सामान्य जनतेसाठी काय केले आहे?

ह्याचं मुद्देसूद उत्तर अनेकांनी वेळोवेळी दिलंय. सत्तेत आल्यावर अवघ्या दिड वर्षात केजरीवाल यांनी त्यांच्या जाहिरनाम्यातील 70 पैकी 22 कामं पूर्ण केली आहेत. सोशल मीडियावर केजरीवाल यांनी वेळोवेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी अधिकाऱ्यांवर लक्षं ठेऊन अनेक कामं मार्गी लावली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांची चर्चा होत आहेच.

म्हणजेच, तथाकथित “अपयश” लपवण्याची ही चाल नव्हे.

थोडक्यात…केजरीवालांच्या पेहरावावरून होणारे वाद केवळ आवश्यकच नव्हे तर चुकीचेही आहेत.

(मूळ इंग्रजी उत्तर आणि फोटो इथे क्लिक करून बघू शकता.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?