' “मेरे पास माँ है!” – वेगळ्या शैलीने अजरामर झालेले शशी कपूर – InMarathi

“मेरे पास माँ है!” – वेगळ्या शैलीने अजरामर झालेले शशी कपूर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – राज जाधव

===

बलबीर पृथ्वीराज कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी झाला. कपूर परिवाराकडून अभिनयाचा वारसा घेऊनच जन्मलेल्या बलबीर उर्फ शशीकपूर यांना लहानपणीपासूनच चित्रपटात काम करण्याच्या संधी उपलब्ध होत गेल्या.

१९५० च्या आसपास राज कपूरच्या ‘आग’ आणि ‘आवारा’ मध्ये लहान राज कपूरच्या भूमिकेत शशी कपूर प्रथम पडद्यावर दिसले आणि त्यानंतर इतर चित्रपटातही चमकू लागले. १९६० च्या दशकात धरमपुत्र, वक्त, जब जब फुल खिले, प्यार किये जा, कन्यादान, हसीना मान जायेगी, एक श्रीमान एक श्रीमती, प्यार का मौसम असे चित्रपट देत त्यांनी स्वतःचे अस्तित्व पटवून दिले.

१९७० च्या दशकात, विशेषतः ६९ ते ७३ च्या दरम्यान जिथे हिंदी फिल्म इंडस्ट्री अल्पकाळी सुपरस्टार राजेश खन्नाला डोक्यावर घेऊन नाचण्यात दंग होती शिवाय ७३-७४ च्या आसपास एका असामान्य आणि खऱ्याखुऱ्या सुपरस्टार ‘अमिताभ बच्चन’ चा उदय झाला होता.

त्यावेळेस आणि नंतरही शशी कपूर अभिनेत्री, शर्मीली, आ गले लग जा, वेगळ्या धाटणीचा सिद्धार्थ, चोर मचाये शोर वगैरे मधून तग धरून होते. अर्थात सुपरस्टार ही पदवी त्यांच्यासाठी नव्हती, त्यांना त्याची गरजही नव्हती.

 

shashi kapoor inmarathi

 

१९७५ चा ‘दिवार’ जितका अमिताभचा होता तितकाच शशी कपूर यांचाही. अमिताभचा रोल कितीही स्टाईलबाज असला, एकाहून एक डायलॉग्स अमिताभच्या फेवरमध्ये होते तरीही ‘मेरे पास मां हैं’ हा त्यांच्या आवाजातील कल्ट डायलॉग आजही अजरामर आहे.

एका बाजूला ते अमिताभ बच्चनच्या सोबत कभी कभी, त्रिशूल, दो और दो पांच, काला पत्थर, सुहाग, शान, सिलसिला, नमकहलाल या कमर्शियल फिल्म्समध्ये तेवढ्याच ताकदीने उभे राहत असताना त्याच वेळी सत्यम शिवम सुंदरम, जुनुन, कलियुग, विजेता या वेगळ्या चित्रपटांतून अभिनयाची क्षमताही पटवून देत राहिले.

१९८० च्या दशकात शशी कपूर सहाय्यक आणि चरित्र अभिनेते म्हणून दिसू लागले. निर्देशक म्हणून ‘अजूबा’मध्ये जास्त काही चमक दाखवता आली नसली तरी त्यांनी निर्माता म्हणून उत्सव, कलयुग, विजेता, ३६ चौरंगी लेन अशी वेगळी वाटदेखील संवेदनशीलपणे जोपासली. १९८६ मध्ये आलेल्या न्यू दिल्ली टाईम्समध्ये पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडले आणि उत्कृष्ठ अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव नोंदवले.

राज कपूर शोमॅन म्हणून नक्कीच ग्रेट असतील, यात शंकाच नाही, शिवाय शम्मीची अदाच वेगळी आहे. जे त्याने केले त्यासाठी त्यांचेही कौतुकच आहे, पण जिथे अभिनयाबद्दल बोलायचं असेल तिथे या दोघांत शशी कपूर बाजी मारतात.

 

shashi kapoor inmarathi

हे ही वाचा – बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

‘भाय तुम साइन करोगे या नही’ मधली बोलण्याची विशिष्ठ लकब, युनिक डान्सिंग स्टाईल, चेहऱ्यावरील निरागस तरीही मिश्किल सुहास्य, समकालीन नायकांच्या समोर आत्मविश्वासाने उभे राहण्याची क्षमता, काळाच्या पुढे राहून समांतर चित्रपटांविषयीची जाण, निर्माता म्हणून हाताळलेले विविध विषय, पृथ्वी थिएटरसाठी केलेले योगदान, शिवाय त्याचसोबत कपूर घराण्याचे नाव पाठीशी लावूनही स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत टिकून राहिलेले, कपूर घराण्यातील दुसऱ्या फळीतील सर्वात सेन्सिबल अभिनेते, म्हणून शशी कपूर कायम स्मरणात राहतील.

शशी कपूर यांना चित्रपटातील योगदानाबद्दल २०११ मध्ये पद्मभूषण, तर २०१५ मध्ये दादासाहेब फाळके अवॉर्ड, या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले.

मागच्या वर्षी, ४ डिसेंबर २०१७, रोजी शशी कपूर यांनी चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. शशीजी आज असते, तर आज ८० वर्षांचे झाले असते. पण, ते नाहीयेत असे म्हणणेही चुकीचे ठरेल. त्यांच्या एकापेक्षा एक सरस कलाकृतींमधून ते सदैव अजरामर राहतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?