' रंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स – InMarathi

रंग खेळा, टेन्शन फ्री : होळीला त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज होलिका दहन आणि उद्या धुलीवंदन… होळी म्हणजे पुरण पोळी, होळी म्हणजे मस्ती, होळी म्हणजे रंग, होळी म्हणजे उत्साह… पण ह्यासर्वांची मजा लुटताना आपण एका गोष्टीकडे अक्षरशः दुर्लक्ष करतो, ती म्हणजे आपली त्वचा.

ह्या होळीच्या रंगांचा आपल्या त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. कितीही हर्बल, नैसर्गिक रंग वापरले तरी कधी कधी आपण आपल्या त्वचेला त्यापासून वाचवू शकत नाही.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi
bebeautiful.in

आपण अतिउत्साहात हा होळीचा सण साजरा करतो आणि मग पुढील एक-दोन आठवडे हे केवळ होळीचा रंग काढण्यात जातात. ह्या रंगांमुळे आपली त्वचा तसेच केस खराब होतात.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi02
india.com

पण आता ह्यासाठी होळी खेळू नका असं आम्ही मुळीच नाही सांगणार. ह्या रंगाच्या परिणामापासून बचावासाठी काय करावे हे नक्की सांगू. आज आम्ही आपल्याला अश्या काही सोप्प्या टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही आपला चेहरा आणि केसांची चिंता न करता, मोकळेपणाने होळीचा आनंद घेऊ शकाल.

 

boldsky.com

 

होळी ही आपण दिवसा उन्हात खेळतो, त्यामुळे दिवसभराचे उन्ह तुमच्या त्वचेला टॅन करू शकते. ह्यापासून बचावासाठी होळी खेळायला जायच्या अर्ध्या तासाआधी आपल्या संपूर्ण शरीरावर किंवा जे भाग झाकलेले नसेल त्यावर 30 SPF सनस्क्रीन लोशन लावा आणि मगच होळी खेळायला जा… ह्यांनी तुमची त्वचा टॅन होणार नाही.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi05
hindustantimes.com

होळीत वापरण्यात येणाऱ्या रंगांनी आपली त्वचा आणि केस हे कोरडे पडतात. ह्यापासून वाचण्यासाठी आपल्या हात पायांना आणि चेहऱ्यावर मॉईस्चराइजर लावावे. तसेच केसांसाठी हेअर क्रीमचा वापर करावा. ह्याने तुमचे केस ड्राय होणार नाही. आणि तुम्ही मनसोक्तपणे होळी साजरी करू शकाल.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi04
thehauterfly.com

जर तुम्हाला हेअर क्रीमचा वापर करायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता. सोबतच होळी खेळताना केस मोकळे सोडू नका, त्याने तुमचे केस जास्त खराब होतील.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi07
gramunion.com

होळी खेळताना नेहेमी जरा सैल कपड्यांचा वापर करावा, कारण टाईट कपडे तुमच्या खेळण्यात अडथळा आणू शकतात. तर सैल कपड्यांत तुम्ही होळीची मजा पूर्णपणे घेऊ शकता.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi09
gramunion.com

होळीचा रंग डोळ्यात गेला की, डोळ्यात इन्फेक्शन होऊ शकते. त्यासाठी तुम्ही गॉगलचा वापर करू शकता. ह्यामुळे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण तर होईलच शिवाय तुम्ही स्टायलिश पण दिसाल.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi06
boldsky.com

होळी खेळून झाल्यावर रंग काढणे म्हणजे तारेवरची कसरतच. कधी कधी तर कितीतरी परयत्न करून देखील रंग निघत नाही. पण वरील ह्या टिप्स वापरून तुम्ही ह्या समस्येपासून वाचू शकता. हे सर्व केल्यावर जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा तुम्हाला शरीवरील रंग काढण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज पडणार नाही, अगदी सहजपणे रंग निघेल.

आणि जर रंग खूप पक्का बसला असेल तर त्यावर थोडी क्रीम किंवा खोबऱ्याचे तेल लावून जरा वेळ राहू द्या, मग अंघोळ करा.

ह्याव्यतिरिक्त तुम्ही बेसनचा वापर देखील करू शकता. बेसन लावल्याने देखील रंग अगदी सहजपणे निघेल.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi03
india.com

ह्या काही टिप्स वापरून तुम्ही होळीचा मनसोक्त अनाद घेऊ शकता तेही आपली त्वचा किंवा केसांच्या खराब होण्याची काळजी न करता… तर ह्या टिप्स वापर आणि सुरक्षित होळी साजरी करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?