भारतीय राज्यघटनेची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ठ्यं

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारताची राज्यघटना – देशाचं सुप्रीम रूल बुक. देश हाच देव असणाऱ्यांसाठी आपली राज्यघटना हाच धर्मग्रंथ आहे!

 

Constitution00-ambedkr-marathipizza
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्त्रोत

डॉ आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्या घटनेची बांधणी म्हणजे एक दीर्घ आणि किचकट प्रक्रिया होती. १९४६ पासून ह्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जगभरात मानाचं स्थान असलेल्या अश्या आपल्या राज्यघटनेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी, वैशिष्ठ्य जाणून घेऊया.


 

१. भारत स्वतंत्र होण्याआधी इंग्रजांनी भारतात राज्य करताना इथले कायदे बनवले होते – ज्यांना “Act” म्हटलं जायचं.

इंग्रजांची शेवटची Act होती – १९३५ ची Government of India Act, जी Lord Linlithgow च्या अध्यक्षतेखाली बनवली गेली होती.

 

Constitution01_Government_of_India_Act_1935_Lord_Linlithgow-marathipizza

स्त्रोत

ह्या सर्वच कायद्यांमध्ये, अर्थातच, भारतीयांवर अनेक अन्यायकारक जाचक बंधनं होती. भारतीयांना अनेक हक्क नाकारण्यात आले होते.

भारताची राज्यघटना लिहिली जाताना इंग्रजांनी केलेल्या अनेक अन्यायांचा संदर्भ घेतला गेला. त्यातून शिकून, भारतीयांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्या गेल्या.

 

२. सर्वोच्च न्यायालयाचा आधार

देशातील सर्व कायदे, सर्व नियम आपल्या घटनेत नमूद केलेल्या साच्याशी संलग्न असतात. ते तसे नसले तर त्यांची validity रहात नाही आणि सर्वोच्च न्यायालय अश्या कायदा/नियमांना रद्द करतं.

घटनेतील कलमांचा अर्थ लावण्याचा, तो अर्थ लावून सरकारने केलेल्या कायद्यांची validity तपासण्याचा आणि जर सरकारने केलेला कायदा घटना-बाह्य असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास देण्यात आला आहे.

 

३. हस्तलिखीत राज्यघटना…!!!

मूळ राज्यघटना छापील नव्हती ! ती प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) ह्यांनी स्वतःच्या हातांनी लिहिली आहे.

 

Constitution02_Raizada-marathipizza

स्त्रोत

नेहरूंनी जेव्हा त्यांना हे लिखाण करण्याची विनंती केली आणि ह्या कामाच्या मोबदल्याबद्दल विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले –

देवकृपेने माझ्याकडे सर्वकाही आहे. ह्या ऐतिहासिक कामासाठी मला काही नको. फक्त एक विनंती आहे – प्रत्येक पानावर मी माझं नाव लिहेन आणि शेवटच्या पानावर माझ्या आजोबांचंसुद्धा नाव लिहेन.

नेहरूंनी ही विनंती तत्काळ मान्य केली. ६ महिन्यांनी हे काम पूर्ण झालं.

ही हस्तलिखित घटना संसदेच्या लायब्ररीमध्ये सुरक्षित अवस्थेत ठेवण्यात आली आहे.

 

४)  आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक – नंदलाल बोस ह्यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे.

 

Constitution03_Preamble-marathipizza

स्त्रोत

प्रत्येक पानावर एक सुंदर कमान आहे आणि प्रत्येक नवीन भागाच्या सुरुवातीला नंदलालजींनी आपल्या राष्ट्रीय अनुभवावर एक सुंदर चित्र रेखाटलं आहे.

वैदिक काळातील गुरुकुल, श्रीराम-लक्ष्मण-सीता, श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, गौतमबुद्ध आणि महावीर, अशोक विक्रमादित्य तसंच अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई – अश्यांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलं आहे.

 

५) २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस – राज्यघटना तयार करायला !

Constituent Assembly ची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ ला झाली होती. त्यानंतर प्रत्येक भागावर अनेक वाद-विवाद, चर्चा घडल्या आणि जवळपास ३ वर्षानंतर – २५ नोव्हेंबर १९४९ रोजी – शेवटचा मसुदा मंजूर करण्यात आला.

६) २००० हुन अधिक सुधारणा

चर्चेदरम्यान राज्यघटनेत २००० हुन अधिक सुधारणा करण्यात आल्या.

Constitution05-marathipizza

स्त्रोत

७) ११ पानं – फक्त सह्यांसाठी !

२४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीच्या २८४ सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली. समितीमध्ये १५ स्त्रिया होत्या.

ह्या स्वाक्षरी ११ पानांवर आहेत. ज्यात, अर्थातच पंडित नेहरू आणि डॉ आंबेडकरांचीसुद्धा स्वाक्षरी आहे.

Constituent Assembly चे अध्यक्ष, फिरोज गांधी ह्यांची सही सर्वात शेवटी आहे. विशेष म्हणजे – त्यांनी देवनागरी आणि रोमन – दोन्ही लिपींमधे सही केली केली आहे.

Constitution06-marathipizza

स्त्रोत

८) जगातली सर्वात मोठी राज्यघटना

२५ भागांत विभागलेली, ४४८ आर्टिकल्स आणि १२ शेड्युल असलेली भारतीय राज्यघटना – जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे.

Constitution04

स्त्रोत

९) सतत सुधारणा होणारी राज्यघटना…!

जगभरात आपली राज्यघटना “सुधारणा होण्यास सोपी” म्हणून प्रसिद्ध आहे. अमलात आल्यापासून भारतीय राज्यघटनेत ९४ वेळा १०० हून अधिक बदल करण्यात आले आहेत.

===

आपण सर्वजण आज – स्वातंत्र्य, समता, बंधुता – हे तत्व आपल्या देशाच्या निर्मितीत मेहनत घेणाऱ्या अनेकांच्या प्रचंड मेहनतीमुळे उपभोगत आहोत.

त्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद मानायला हवेत…!

जय हिंद!

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 230 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *