' दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..! – InMarathi

दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

दिवाळी हा सण हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात, आपलं घर सजवतात. त्यासोबतच या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर फटाके देखील फोडले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा मुद्दा वादग्रस्त झाला आहे. दिवाळीच्या दिवशी फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

fire-crackers-marathipizza
thelogicalindian.com

उच्च न्यायालयाने देखील या दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. ज्यामुळे  राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण आम्ही दिवाळीत फटाके फोडावेत किंवा नाही यावर चर्चा करणार नाही , कारण तो एक वेगळा विषय आहे… पण जर सद्य परिस्थितीचा विचार केला तर आज जगात प्रदूषणाचे प्रमाण फार वाढले आहे आणि त्यामुळेच आपल्यावर  ग्लोबल वार्मिंगचे संकट आले आहे. या परिस्थितीला जबाबदार देखील आपणच आहोत. या प्रदुषणाचा फार वाईट परिणाम आपल्यावर होतो आहे. त्यासोबतच आपल्याअविभावती असणाऱ्या पशु-पक्षांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

diwali-pollution-marathipizza
news18.com

जर रिपोर्ट्सचा विचार केला तर आपल्या देशात संपूर्ण वर्षभरात जेवढ प्रदूषण होते त्याहून अधिक या एका दिवाळीच्या रात्री होते. वायू प्रदुषणा सोबतच ध्वनी प्रदूषण देखील तेवढ्याच प्रमाणत पसरते. हे सर्व आपण बघतो, याचा परिणामही आपल्याला माहितीये. पण ते म्हणतात ना ‘ कळतं पण वळत नाही’…

असो.. तर आज आम्ही तुम्हाला एका अश्या गावांबद्दल सांगणार आहोत ज्या गावांत मागील १४ वर्षांपासून दिवाळीत एकही फटाका फोडला गेलेला नाही. आता ही इथली परंपराच बनली आहे आणि यामागील कारण म्हणजे या परिसरातील ‘वेलोड पक्षी विहार’. तामिळनाडू राज्यातील इरोड जिल्ह्यात असलेले हे ‘वेलोड पक्षी विहार’, ज्याच्या जवळपास ८ गावं वसतात. ही आठही गावं मागील १४ वर्षांपासून फटाके न फोडण्याची परंपरा निरंतर पाळत आहेत. २०० एकर परिसरात पसरलेल्या या वाईल्ड लाईफ सॅंक्चुरी मध्ये दरवर्षी सप्टेंबर ते जानेवारी महिन्यांत हजारोंच्या संख्येत प्रवासी पक्षी येत असतात. यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही ओस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथून येणाऱ्या पक्ष्यांची असते. हे पक्षी येथे आपली अंडी देण्याकरिता येतात. ते इथे घरटं बनवून अंडी देतात त्यानंतर दोन-तीन महिने ते तिथेच थांबतात, नंतर आपल्या पिलांना घेऊन परत जातात.

vellode-bird-sanctuary-marathipizza
deccanchronicle.com

त्यामुळे येथील गावकरी या गोष्टीची काळजी घेतात की त्यांच्या फटाके उडवल्याने हे पक्षी घाबरू नये. जर हे पक्षी घाबरले तर ते येथे परत येणार नाहीत. म्हणून या गावांत दिवाळीत फटाके फोडले जात नाहीत. पक्षांव्यतिरिक्त गावातील कुत्रे मांजरी यांना देखील या फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो.

Vellode-Birds-Sanctuary01-marathipizza
thehindu.com

या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाक्याचा झालेला धूर लहान मुले तसेच वृद्धांसाठी देखील हानिकारक ठरतो. यासर्वांचा विचार करून या गावकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. स्वतःच्या वर उठून आपल्या निसर्गाचा, आसपासच्या परिसराचा, पशु-पक्षींचा विचार करत त्यांनी मागील १४ वर्षांपासून ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

Vellode-Birds-Sanctuary-marathipizza
veethi.com

या गावाला असे करण्यास कुणीही सांगितले नव्हते किंवा मोठ मोठी पर्यावरणीय व्याख्याने देऊन कुणी या गावांना असे करण्यासाठी परावृत्त नव्हते केले. तर त्यांच्यातील माणुसकीच्या भावनेने त्यांनी असं करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही परंपरा आपल्यासारख्या त्या प्रत्येकासाठी माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे, जे न्यायालयाच्या आदेशाचा केवळ आपल्या व्ययक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी विरोध करत आहेत…

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?