' मोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य? – InMarathi

मोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पंतप्रधान मोदी आणि हिटलरमध्ये समानता दाखविणारा हा फोटो तुम्ही देखील सोशल मिडीयावर बघितला असेल. ह्या फोटोमध्ये जर्मनीचा तानाशाह हिटलर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

ह्या फोटोमध्ये हिटलर एका लाहान मुलीचे कान ओढताना दिसत आहे. तर पंतप्रधान मोदी देखील एका लहान मुलाचे कान ओढताना दिसून येत आहेत.

हा फोटो गुजरातच्या माजी पोलीस अधिकारी संजीव भट्ट ह्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले होते आणि त्यासोबत लिहिले होते की, ‘फरक ओळखा’.

Spot the difference. pic.twitter.com/yI1fyIOdos

— Sanjiv Bhatt (IPS) (@sanjivbhatt) July 25, 2018

ह्यामागे त्यांचा अर्थ कदाचित हा होता की, मोदी हे देखील हिटलर सारखे आहेत. संजीव भट्ट ह्यांच्या ह्या ट्विट वर आतापर्यंत ६५० हून जास्त लोकांनी रीट्विट केलं आहे.

तसेच हा फोटो Unofficial: Priyanka Gandhi च्या पेजवरून देखील पोस्ट करण्यात आला. हा फोटो आतापर्यंत ४१०० वेळा शेअर करण्यात आला आहे.

Dr.Manmohan Singh – Fan Club च्या पेजवर देखील हा फोटो पोस्ट करण्यात आला. तसेच इतर अनेक अकाऊंट वरून देखील हा फोटो शेअर होताना दिसून आला.

ह्यावरून कदाचित काही लोकांना हे दर्शवायचे होते की मोदी हे हिटलर सारखे आहेत.

 

hitler-inmarathi05
thesun.com

पण हिटलरचा हा फोटो पूर्णपणे खोटा आहे. म्हणजेच हा एक फेक फोटो आहे.

खऱ्या फोटोमध्ये हिटलरचे हात या मुलीच्या कानावर नाही तर तिच्या खांद्यावर आहेत. आणि हा सर्वा खेळ फोटोशॉपचा आहे. फोटोशॉपच्या सहाय्याने मोदींच्या डाव्या हाताला मोठ्या कौशल्याने हिटलरच्या हातावर चिकटवले गेले आहेत.

आणि ह्यावरून हिटलर आणि मोदी ह्यांच्यात समानता दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

hitler-inmarathi06
thelallantop.com

हिटलरचा तो लहान मुलीच्या खांद्यावर हात असलेला फोटो हा नाजी प्रोपेगेंडाचा आहे.

जेव्हा हिटलरविरोधात आवाज उठविल्या जात होता, तेव्हा हिटलरने लहान मुलांसोबत फोटो काढत हे दर्शविण्याचा प्रयत्न केला होता की, हिटलर जर्मनीच्या मुलांचे तसेच तरुणांचे भविष्य सुरक्षित करू शकतात.

 

It was also great meeting your daughter, whom you had woken up early that day. Best wishes. 🙂 @JustinTrudeau pic.twitter.com/nXZeu0BfUc

— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2015

तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना देखील नेहमी लहान मुलांसोबत फोटो काढताना बघितले गेले आहे.

जेव्हा कॅनडाचे राष्ट्रपती जस्टिन ट्रुडो भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा मोदींनी त्यांच्या मुलीचे देखील असेच कान ओढले होते, ज्यामुळे ट्रुडो ह्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य बघायला मिळाले.

त्यानंतर मोदींनी स्वतः हा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला होता.

 

modi-InMarathi03
deccanchronicle.com

मोदींचा हा फोटो २ सप्टेंबर २०१४ चा आहे, जेव्हा ते जपान येथे गेले होते. तेव्हा मोदी टोकियो येथील ताइमी एलिमेंट्रीमध्ये लहान मुलांसोबत बोलले होते.

ह्यावेळी त्यांनी मुलांना बासरी वाजवून ऐकविली होती, तसेच कृष्णाची कहाणी देखील सांगितली होती. ह्यानंतर मोदींनी त्या मुलांसोबत फोटो काढले होते, हा फोटो देखील त्यापैकीच एक आहे.

म्हणजेच सोशल मिडीयावर मोदी आणि हिटलरचा जो फोटो फिरतोय तो फेक आहे. त्यामुळे सोशल मिडीयावरील अश्या कुठल्याही पोस्टवर आपलं मत बनविण्याआधी ती पोस्ट किती खरी आहे याची पडताळणी नक्की करून घ्यावी, जी संजीव भट्ट करायचे विसरले.

कारण अश्या फेक पोस्ट आणि फोटोंमुळे समाजात अनेक चुकीचे गैरसमज पसरू शकतात, ज्याचे विपरीत पडसाद कदाचित आपल्यालाच भोगावे लागू शकतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?