महाभारत-आख्यान !- उत्कंठावर्धक लेखमालेची प्रस्तावना

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

महाभारताची कहाणी भारतातील एका सुप्रतिष्ठित राजघराण्याची कहाणी.

गेली अडीचशे वर्षे किमान जगभरच्या प्राच्यविद्या पंडितांचे आकर्षण राहिलेली आहे. “महाभारत हा शक्यतांचा आर्णव आहे.” हे नरहर कुरुंदकरांचे उद्ध्रुत वापरण्याचा मोह कुणाला आवरणार नाही? त्यावर अनेकांनी – अनेक थोरामोठ्यांनी लिहून झालंय. मग आपण जे इथे बघणार आहोत, त्याला नेमके कसे वर्गीकरणात बसवायचे – हा एक मोठाच प्रश्न आहे. कारण महाभारत जरी मूळ जय या नावाने लिहिलेली ऐतिहासिक गाथा असली तरी, पिढ्यानुपिढ्या मौखिक आणि हस्तलिखित पद्धतीने, आज महाभारत या नावाने ग्रथित असणारी महागाथा आहे.

=====

=====


पहिली अडचण आहे महाभारताच्या काळाबद्दल.

महाभारताचा काळ जर युधिष्ठिर शक प्रमाण मानायचा, तर सुमारे साडे पाच हजार वर्षे जुना आहे. परंतु आपल्याला तो सरसकट तसा मानता येणार नाही. कारण वेद हेच भारतभूमीतले सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत, हे आपणास सिद्ध धरायचे नाहीत. तसेच वेदांना थेट उत्तरध्रुवाजवळील भूमीतही नेऊन बसवायचे नाही. आपल्याकडे सुमारे पाच हजार वर्षे जुन्या असलेल्या सिंधु संस्क्रुतीची थोडीशी माहिती आहे. जी पुरातत्त्वीय पुराव्यांनी संपन्न आहे.

map_of_vedic_india-marathipizza

महाभारत ज्या भारता विषयी बोलते तो भारत प्रामुख्याने विंध्य आणि सातपुडा या पर्वतांच्या उत्तरेकडील आहे. त्यामध्ये आजच्या महाराष्ट्रासह कुठल्याही दक्षिणी राज्याला फारसे महत्त्व नाही.

महाभारताचा काळ, आधुनिक अभ्यासकांच्या मतानुसार गौतम बुद्धांच्या आधी फार तर हजार वर्षे मागे खेचता येईल. (पण मग मुख्य दहा उपनिषदांच्या रचनेचा काळ आकुंचित करावा लागेल!) तर असे कुठलेही स्पष्ट विधान नं करता, आपण एवढेच म्हणू या की, महाभारताचा खरा काळ हा सुमारे साडेतीन ते तीन हजार वर्षे इतका जुना आहे.

महाभारता बाबत असणारी दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे – बुद्धपूर्व काळातली जवळ जवळ प्रत्येक मिथक कथा, कथावस्तू, पात्रे महाभारतात उपस्थित आहेत.

महाभारतात देव, दानव, सुर, असुर, यक्ष, गंधर्व, किन्नर, जलदेवता वगैरे मनुष्य सद्रुश परंतु मनुष्य नसणारी अनेक पात्रे आहेत. निदान आजतरी यांच्याविषयी काल्पनिक आणि ललित अंगाने मागोवा घेण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारताचा पहिला संशोधित खंड सन 1966 मध्ये प्रसिद्ध केला आणि अनेक भारतीय लेखकांच्या ललित लेखनास बहर आला. कन्नड लेखक भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी, मूळ महाभारत संहिते पासून फार दूर नं जाणारी एक सुंदर ललितक्रुती.

mahabharat-marathipizza

म्हणूनच, to conclude: लहानपणापासून आपण महाभारत विषयक भरपूर काही वाचलेले असते. महाभारताविषयी ललित अंगाने का होईना, आजच्या काळात समजून घेता येतील असे काही वास्तवाच्या जवळ जाणारे निष्कर्ष नोंदवणे आणि त्यांची मजा लुटणे एवढाच ह्या लेखमालेचा हेतू आहे.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाभारताचा काळ हा संस्कृती संक्रमणाचा काळ आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमान हजार वर्षांमधील ऐतिहासिक तत्थ्ये महाभारताच्या संहितेमध्ये खच्चून भरलेली आहेत.

त्यातही मजेची बाब म्हणजे ही सारी तत्थ्ये फक्त तीन पिढ्यांमध्ये मुख्यत्वे व्यापलेली आहेत.

भारताच्या प्राचीन इतिहासात बहुपत्नीत्व ही एक अतिशय सामान्य बाब आहे. गौरवान्वित बहुपतित्व मात्र फक्त एकट्या महाभारतात उल्लेखिलेले आहे. मुख्य म्हणजे हे बहुपतित्व संहितेनुसार दुर्बळ पक्षाने स्विकारलेले आहे. याच दुर्बळ पक्षाचा महाभारतात अंतिम विजय होतो…!

kunti-draupadi-and-5-pandava-brothers-marathipizza

स्रोत

म्हणूनच की काय, आज जरी भारतात बहुपतित्व मान्य नसले, किंबहुना असे वर्तन जरी व्यभिचार (!) समजला जात असला तरी “कुंती आणि द्रौपदी पतिव्रता नव्हत्या…” असे कुणीही हिंदू भारतीय म्हणणारही आणि मानणारही नाही. कबूल करणे तर खूप दूरची गोष्ट…!

महाभारताच्या सद्य संहितेतच इतकी छिद्रे आहेत की छिद्रान्वेषी बुद्धिला महाभारत हे नेहेमीच उत्तम खाद्य आहे.

यातील दुर्योधन भर दरबारात पांडवांना विचारतो:

आमचा बाप कुरुनरेश ध्रुतराष्ट्र आहे. कारण आमचा जन्मच या राजवाड्यात झाला. इथे उपस्थित अनेक जण याचे साक्षीदार आहेत. तुमचा बाप कोण? त्याचा पुरावा द्या आधी!

भीष्मादी वरिष्ठ कुरुजन चूपचाप बसलेले आहेत. पांडव हताश आहेत.

=====

=====

(इथे दुर्योधन स्वतः मात्र सोयिस्कर रीतीने विसरतो की, त्याचाही बाप नियोगजन्य संततीच आहे. जसा पांडवांचा बाप होता.)

तर अशी अवघड कोडी असलेल्या महाभारता विषयी, आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर समजून घेणारे, वास्तव अंगाने लिहिलेले ललित – अश्या स्वरुपाची ही लेखमाला असेल.

पहिली कहाणी असेल अर्थातच कुरुनरेश शंतनु आणि महाराणी गंगा यांची…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “महाभारत-आख्यान !- उत्कंठावर्धक लेखमालेची प्रस्तावना

  • September 21, 2017 at 1:18 am
    Permalink

    महाभारत या लेखमालेतील पुढील कहाण्या fb वर कुठे वाचायला मिळतील?
    कृपया मार्गदर्शन करावे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?