' ख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो? जाणून घ्या! – InMarathi

ख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो? जाणून घ्या!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नवीन वर्षा सोबतच संपूर्ण जगाला वेध लागलेय लाडक्या ख्रिसमस सणाचे ! हा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो . ख्रिश्चन धर्मियांच्या घरी तर अगदी लगबग सुरु असते. घराच्या साफसफाई पासून जी धावपळ सुरु होते ती थेट ख्रिसमस ट्री बनवल्याशिवाय संपत नाही. एकदा का ख्रिसमस ट्री सजवून तयार झाला की खऱ्या अर्थाने ख्रिसमस सणाला सुरुवात होते. बरं तुम्हाला माहीत आहे का ख्रिश्चन धर्मीय ख्रिसमस ट्री नेमका कोणत्या कारणामुळे सजवतात? त्यावर लावल्या जाणाऱ्या वस्तुंचं महत्त्व काय? नसेल माहीत तर आज या सर्व गोष्टी जाणून घ्या !christmas-tree-significance-marathipizza00

स्रोत 

घरात ख्रिसमस ट्री या आशेने सजवला जातो की जेणेकरून सँटाक्लोज खुश होईल आणि आपल्या घराला निरनिराळ्या वस्तू भेट देईल.

या ख्रिसमस ट्री ची परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानतात. १६ व्या शतकातील संत मार्टिन ल्युथर हे पहिले व्यक्ति होते ज्यांनी आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवला होता. पूर्वीच्या काळी ओक झाड ख्रिसमस ट्री म्हणून सजवायचे परंतु कालानुरूप ख्रिसमस ट्री चे स्वरूप बदलत गेले आणि आता प्लास्टिक आणि विविध स्वरुपात ख्रिसमस ट्री उपलब्ध होतो.

ख्रिसमस ट्री वर तुम्ही स्टार्स अर्थात तारे लावेलेले पाहिले असतील. ख्रिसमस ट्रीच्या सगळ्यात वर टोकाला जो स्टार लावला जातो तो बेथेलेहेमच्या त्या ताऱ्याचे प्रतीक आहे ज्याच्या सहाय्याने लोक प्रभू येशू पर्यंत पोचले होते.

christmas-tree-star-marathipizza

स्रोत 

ख्रिसमस ट्री वर एक चमकदार गोल बॉल्स देखील आढळून येते त्याला Tinsel म्हणतात. केवळ ख्रिसमसचं नाही तर प्रत्येक प्रसंगावेळी याचा सजावटीसाठी वापर केला जातो.

christmas-tree-tinsel-marathipizza

स्रोत 

ख्रिसमस ट्री वर मेंढपाळाच्या हाती असणाऱ्या काठीच्या आकाराच्या candy canes लावलेल्या आढळतात. यांवर असणारा लाल रंग प्रभू येशूच्या रक्ताचे प्रतिक आहे, तर पांढरा रंग ख्रिश्चन धर्मीयांची रक्षा करण्याची भावना दर्शवतो. मुख्य गोष्ट म्हणजे हे केवळ सजावटीसाठी ख्रिसमस ट्री वर अडकवले जात नाही, तर तुम्ही candy canes खाऊ देखील शकता, त्यांची चव अतिशय सुरेख असते.

candycanes-marathipizza

स्रोत

ख्रिसमस ट्री वर werath अर्थात डोक्यावर चढवण्याची माळा लावण्यामागे देखील एक कारण आहे. प्राचीन परंपरेनुसार ही माळा म्हणजे काटेरी मुकुटाचे प्रतीक आहे. प्रभू येशूला सुळावर चढवण्यापूर्वी त्यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट घालण्यात आला होता. त्याची आठवण म्हणून तसेच प्रभू येशुबादा बद्दलची भक्ती प्रतीत होण्यासाठी werath ख्रिसमस ट्री वर लावली जाते.

werath-marathipizza

स्रोत

ख्रिसमस ट्री कडे लक्ष जाताच Bells अर्थात प्लास्टिकची घंटा सर्वात प्रथम आपले लक्ष वेधून घेते. ही घंटा मेंढपाळाच्या त्या घंटेचे प्रतीक आहे जी वाजवून तो आपल्या मेंढ्यांना माघारी बोलवायचा. ख्रिसमस ट्री वर अनेक लहान-सहान Bells अडकवल्या जातात, सोबतच घराच्या दरवाज्यावर देखील मोठी Bell लावली जाते.

christmas-bells-marathipizza

स्रोत

आकाशातील ताऱ्यांचे प्रतीक म्हणून ख्रिसमस ट्री वर Lights लावल्या जातात. यामागे कोणतीही परंपरा नसून केवळ सजावटीच्या उद्देशाने आणि ख्रिसमस ट्री खुलून दिसावा म्हणून विविध रंगातील Lights लावल्या जातात.

christmas-tree-lights-marathipizza

स्रोत

तुम्हा सर्वाना ख्रिसमस अर्थात नाताळ सणाच्या आणि नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?