' कार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज! – InMarathi

कार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज!

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

कार्टून म्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण!एकदा का कार्टून बघायची सवय लागली की जन्मभर सुटत नाही असं म्हणतात! आपल्याकडे ९० किंवा त्या पूर्वीच्या दशकातील लोकांना कार्टून पहायची सवय नव्हती, त्यामुळे त्यांना हा सगळा वेळेचा अपव्यय वाटतो. पण जेव्हा रंगीत टीव्ही आहे आणी कार्टून चॅनेल सुरु झाले, त्या काळातील लोकांना कार्टून म्हणजे जीव की प्राण वाटतो. एकदम हलके फुलके, सतत हसवत ठेवणारे हे कार्टून आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनून जातात. म्हणून तर आजही कित्येक मोठी, सुज्ञान माणसं देखील कार्टून पाहतात दिसतात, मग त्याचा अर्थ असा काढायचा का? की ते लहान आहेत, बालिश आहेत वगैरे वगैरे..तर मुळीचं नाही. कारण कार्टून बघण्याचं कोणतही वय नसतं.. असो!

तर प्रत्येक कार्टून लव्हरच्या मनात कधीना कधी असा विचार येतो की या कार्टूनला आवाज कोण देत असेल? कारण खरी मजा त्या आवाजातच असते. आज आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर्स च्या मागे कोणाचा आवाज आहे ते सांगणार आहोत. चला तर मग पाहूया:

.

शिनचॅन

शिनचॅन सारख्या गोड आणि आगाऊ कॅरेक्टरचा खरा आवाज आहे आकांक्षा शर्मा’ ही तरुणी!

aaknksha-sharma-marathipizza

 

स्रोत

तिच्या आवाजाचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

 

.

डोरेमॉन

नेहमी संकटात सापडणाऱ्या नोबिताचा जवळचा मित्र म्हणजे डोरेमॉन. त्याला आवाज देते सोनल कौशल ही तरुणी!

तसेच लहानग्यांच्या मनावर भारुड करणारा छोटा भीम देखील हिच्याच आवाजातून बोलतो.

sonal-kaushal-marathipizza

स्रोत

तिच्या आवाजाचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

 

.

नोबिता

ज्याला जियान आणि सुनियो सारखे त्रास देतात त्या नोबिताच्या रडक्या कॅरेक्टरला आवाज देते सिमरन कौर!

simaran-kaur-marathipizza

स्रोत

तिच्या आवाजाचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

.

शुजुका

शुजुकाचे क्युट कॅरेक्टर बोलते पारुल भटनागर या तरुणीच्या आवाजाच्या माध्यमातून!

सोबतच शिनचॅन बहिण हिमावारी, शिनचॅनचा मित्र काझामा आणि मसावो तसेच शिनचॅनच्या शाळेतील शिक्षिका योशिनागा यांना देखील पारुल भटनागर याच आवाज देतात.

parul-bhatnagar-marathipizza

स्रोत

तिच्या आवाजाचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

.

निंजा हातोरी

हे कार्टून फारच गाजलं होतं आणी आजही त्याची प्रसिद्धी अजिबात कमी झालेली नाही. या निंजा हातोरी कॅरेक्टरला आवाज देतात आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री मेघना एरंडे!

सोबतच त्या नॉडी, शिनचॅन, डोरेमॉन आणि बॉब द बिल्डर मधील डीझी नावाच्या कॅरेक्टरला देखील आवाज देत असतात.

meghana-erande-marathipizza

स्रोत

तिच्या आवाजाचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

.

सौरव चक्रवर्ती

बॉलीवूड कलाकारांच्या आवाजाने नटलेलं हे कार्टून सध्या आघाडीवर आहे. या कार्टूनमधील जवळपास सर्वच पात्रांना सौरव चक्रवर्ती एकट्याने आवाज देतात.

Sourav-Chakraborty-marathipizza

स्रोत

त्याच्या आवाजाचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

काय मग? कशी वाटली ही आवाजांची सफर??!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?