अंबानीच घर, सोन्याचा यॉट; ह्या आहेत जगातील ७ सर्वात महाग गोष्टी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सामान्य माणूस हा त्याला जेवढे झेपत आहे, तेवढ्याच पैशाच्या वस्तू खरेदी करतो. उगचाच वायफळ खर्च करणे त्याला आवडत नाही आणि ते बरोबर देखील आहे, कारण त्याला माहित आहे की, जास्त किंमतीच्या वस्तू खरेदी करणे त्याच्या खिशाला परवडण्यासारख्या नाही. त्यामुळे तो त्याचा विचार सोडून देतो.

पण श्रीमंत लोकांचे तसे नसते, त्यांच्यामध्ये महागड्या वस्तू खरेदी करण्याची जणू स्पर्धाचं सुरू असते. आपल्या ओळखीच्या माणसाने एखादी महागडी वस्तू घेतली की, ते त्याच्याहून महागडी वस्तू घेण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वस्तू श्रीमंत माणसाला देखील परवडेल असे नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्या एखाद्या श्रीमंत माणसाला खरेदी करताना देखील विचार करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया, या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कितीला विकल्या गेल्या…

१. Huia पक्षाचे पंख

 

liketodiscover.com
liketodiscover.com

एखाद्या पक्ष्याचा पंख तुम्ही जास्तीत जास्त कितीला खरेदी कराल ? कुणी वेडा असेल, तर यासाठी १००० रुपये देखील देईल. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, Huia नावाचा या पक्षाचा पंख १०००० डॉलर्सना म्हणजेच जवळपास ६,५१,६४४ रुपयांना विकला गेला. हा एक विलुप्त झालेल्या पक्षाचा पंख आहे.


२. Rhein II (फोटो)

 

Most expensive things.Inmarathi1
wikimedia.org

हा सामान्य दिसणारा फोटो, काही सामान्य नाही आहे. Rhein II नावाच्या या फोटोला जर्मन व्हिज्युअल आर्टिस्ट Andreas Gursky याने टिपले होते. २०११ मध्ये या फोटोचा लिलाव झाला, तेव्हा या फोटोची किंमत ४.३ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २८,०१,४९,७३० लावण्यात आली होती.

३. डेड शार्क

 

Most expensive things.Inmarathi2
wp.com

डेड शार्क हा एक प्रकारचा आर्टपीस आहे, ज्याला १९९१ मध्ये इंग्लिश आर्टिस्ट डॅमियन हर्स्टने बनवले होते. या आर्टला एका श्रीमंत माणसाद्वारे १२ मिलियन डॉलर्सना म्हणजेच जवळपास ७८,२०,४३,६०० रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते.

४. १९६३ ची फेरारी GTO

 

Most expensive things.Inmarathi3
dkn.tv

ज्या वस्तूंकडे सामान्य लोक जुन्या म्हणून दुर्लक्ष करतात. त्याच वस्तूंना श्रीमंत लोक व्हिंटेज म्हणून आपल्याकडे संग्रहित करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक १९६३ ची व्हिंटेज कार फेरारी GTO ला ५२ मिलियन डॉलर्सना म्हणजेच जवळपास ३,३८,८८,५५,६०० रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते.

५. द कार्ड प्लेयर्स (छायाचित्र)

 

Most expensive things.Inmarathi4
roodnoot.nl

हे छायाचित्र खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का ? की हे छायाचित्र तब्बल २७५ मिलियन डॉलर्सना म्हणजेच जवळपास १७,९१,९३,५७,५०० रुपयांना खरेदी करण्यात आली होती. आता हे छायाचित्र खरचं एवढ्या मोठ्या किंमतीला विकले गेले पाहिजे होते का ? हे तुम्हीच ठरवा.

६. अँटिलिया (मुकेश अंबानीचे घर)

 

Most expensive things.Inmarathi5
businessinsider.com


मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानीच्या या घराची किंमत १ बिलियन म्हणजेच जवळपास ६५,१५,५५,००,००० रुपये एवढी आहे. या घराची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या घरात ६०० फुल टाईम स्टाफ मेम्बर्स काम करतात.

७. द हिस्ट्री सुप्रीम यॉट (शिप)

 

Most expensive things.Inmarathi6
alux.com

मुकेश अंबानीच्या घरापेक्षा देखील महाग ही शिप एका मलेशियन व्यावसायिकाची आहे. सोने आणि प्लॅटिनमने बनलेल्या या शिपची किंमत ४.५ बिलियन म्हणजेच जवळपास २,९३,१६,९६,००,००० एवढी गडगंज आहे.

अशा या वस्तू खूपच महागड्या आहेत आणि एखाद्या माणसाला खरेदी करताना विचार करायला लावणाऱ्या आहेत, तरीही त्या एवढ्या किंमतीला विकल्या गेल्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *