' सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स! – InMarathi

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

या जगात खूप कमी लोक असतात आहेत ज्यांना चॉकलेट आवडत नसेल, काही लोक तर चॉकलेट साठी दिवाने असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडत असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढच आवडत. आपण कुणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो.

म्हणूनच आज आम्ही सर्व चॉकलेट प्रेमींसाठी काही अश्या चॉकलेट्सची माहिती घेऊन आलो आहोत ज्यांना जगातील सर्वात महाग चॉकलेट म्हणून ओळखली जाते.

Frrrozen Haute Chocolate

expensive chocolates01-marathipizza

Frrrozen Haute या चॉकलेटला बनविण्याकरिता २८ दुर्लभ प्रकारच्या कोको, गोल्ड लीफ आणि La Madeleina Au Truffle वापरण्यात येतो. या चॉकलेटच्या कोपऱ्यांवर गोल्ड आणि डायमंड ब्रेसलेट लावल्या जातात. याची किंमत २५ हजार डॉलरच्या जवळपास आहे.

To’ak

expensive chocolates02-marathipizza

foxnews.com

२०१४ साली ही चॉकलेट हर्वेस्ट चॉकलेट बार सोबत मार्केटमध्ये आली होती. याच्या एका बार ची किंमत २७० डॉलर एवढी होती. याच्या तीन वर्षांनंतर यांनी French Oak Cognac Cask चॉकलेट आणली ज्याची किंमत ३६५ डॉलर ठेवण्यात आली होती.

ही कंपनी आपल्या क्वॉलिटीला घेऊन खूप सजग राहते आणि चॉकलेट बनविण्यासाठी कोको बीन्सचा वापर करतात. या चॉकलेटची टेस्ट तुम्हाला वाईनची आठवण नक्की करून देईल.

 

हे ही वाचा –

===

 

The Golden Speckled Egg

expensive chocolates03-marathipizza

homestylediary.com

या चॉकलेटच्या ११० पाउंडची किंमत १० हजार डॉलर होती. या एका चॉकलेटला बनविण्यासाठी कमीतकमी ३ दिवसांचा वेळ लागतो. ज्यामध्ये 7 फ्लेवर्स मिळविले जातात. या चॉकलेटला १२ छोटे चॉकलेट एग, २० चॉकलेट बार आणि ५ पांढऱ्या फुलांनी सजविले जाते.

DeLafée

expensive chocolates04-marathipizza

ontopof.com

स्वित्झर्लंडच्या या गोल्ड चॉकलेट बॉक्समध्ये १९१० पासून ते १९२० स्विस नॅशनल बँकेचे गोल्ड कॉईन दिले जातात. ८ चॉकलेट च्या या बॉक्समध्ये प्रत्येक चॉकलेट ही गोल्ड लीफने सजलेली असते. याच्या एका बॉक्सची किंमत ३३० डॉलर एवढी आहे.

हे ही वाचा –

===

 

Noka Chocolate

expensive chocolates05-marathipizza

flickr.com

२०११ साली या चॉकलेट ला बनविणाऱ्या अमेरिकन चॉकलेट कंपनीने भलेही आपला व्यापार बंद केला असला तरी देखील आजही याच विंटेज कलेक्शन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या कलेक्शन या कंपनीने २००६ साली लॉन्च केलं होत. त्यावेळी याची किंमत ८५४ डॉलर/पाउंड होती.

La Madeline au Truffe

expensive chocolates06-marathipizza

nogarlicnoonions.com

या एका चॉकलेटची किंमत २५० डॉलरच्या जवळपास असते. या चॉकलेटला Knipschildt द्वारे बनविले जाते. याला बनविण्यासाठी Valrhona डार्क चॉकलेट आणि Truffle ऑइलचा वापर करण्यात येतो. Truffle ऑइलला French Perigord Truffle पासून घेतलं जातं, ज्याची किंमत १ पाउंड ते १,००० डॉलर पर्यंत असते. या चॉकलेटची ऑर्डर दिल्यावर देखील ग्राहकांना याचा आस्वाद घेण्याकरिता दोन आठवडे वाट बघावी लागते.

Vosges

expensive chocolates07-marathipizza

gilt.com

या चॉकलेटला बनविण्याकरिता चॉकलेटमध्ये नारळ आणि Bacon मिळविल्या जात. या चॉकलेटच्या एका पाउंडसाठी ६९ डॉलर द्यावे लागतात.

Richart’s Intense Valentine Gourmet Chocolates

 

expensive chocolates-marathipizza

list25.com

खास करून वैलेंटाइन डे साठी या चॉकलेटला बनविण्यात आले आहे. या चॉकलेटच्या एका बॉक्समध्ये ४९ चॉकलेट्स असतात आणि यासाठी तुम्हाला ७७ डॉलर मोजावे लागतात. या फ्रेंच चॉकलेटमध्ये खूप फ्लेवर्स आपल्याला मिळतात.

Godiva

expensive chocolates09-marathipizza

mohegansun.com

चॉकलेट्सच्या दुनियेत Govida हा चॉकलेट ब्रांड खूप प्रसिद्ध आहे. हा ब्रांड प्रत्येक वर्षी आपलं नवीन महाग कलेक्शन घेऊन बाजारात उतरतं. सध्याचं त्याचं G कलेक्शन लॉन्च झाल असून यातील १५ चॉकलेट्सची किंमत १२० डॉलर एवढी होती.

Eclat Chocolate

expensive chocolates10-marathipizza

thedisneyblog.com

२०१३ साली या चॉकलेटच्या एका बारची किंमत १३ डॉलर होती, यामुळेच ही कंपनी सर्वात महाग चॉकलेटच्या लिस्टमध्ये सामील झाली. याला बनवणारे Master Chocolatier Christopher Curtin हे शेफ़ Anthony Bourdain आणि त्यांचे फ्रेंच मित्र Éric Ripert होते. या चॉकलेटचे चिप्स पॅकेट देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत १८ डॉलर/बॅग आहे.

Ganachery

expensive chocolates11-marathipizza

thedisneyblog.com

असं म्हणतात की, Ganachery ची चॉकलेट खाल्ल्या शिवाय Disney World चा प्रवास पूर्ण होत नाही. Ganachery नावाने तेथे एक
चॉकलेट स्टोर देखील आहे जिथे तुम्ही तुमच्या आवडीची चॉकलेट खाऊ शकता. इथे मिळणारी चॉकलेट ही ३ डॉलर पासून सुरु होते तर इथे तुम्हाला हजारांच्याही चॉकलेट मिळतील.

Jacques Torres

expensive chocolates12-marathipizza

thechicbrulee.com

पेस्ट्री आणि केक च्या जगात Jacques Torres हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, यांना लोक प्रेमाने ‘Mr Chocolate’ देखील म्हणतात. कारण ते लोकांसाठी एक खास प्रकारच चॉकलेट बनवतात, ज्याची किंमत जवळपास ७५ डॉलर एवढी असते.

Brownie Extraordinaire

expensive chocolates13-marathipizza

dellomano.com

वाईनच्या ग्लासमध्ये Brownie च्या रुपात असणारी ही चॉकलेट अटलांटिक सिटीच्या केवळ एका रेस्टॉरंटमध्येच मिळते. या रेस्टॉरंटला Brule या नावाने ओळखले जाते. डार्क चॉकलेट आणि Italian Hazelnuts सोबत मिळणाऱ्या या चॉकलेटला लोक Quinta do Novel Nicional या नावाने ओळखतात. याच्या एका ग्लासची किंमत १००० डॉलर पर्यंत असते.

 

Le Chocolat Box

expensive chocolates14-marathipizza

toys4vip.com

१ मिलियन डॉलर किंमत असणारी ही चॉकलेट जगातील सर्वात महाग चॉकलेट असल्याचे मानले जाते. कारण या चॉकलेटच्या बॉक्समध्ये चॉकलेटसोबतच दागिनेही दिले जातात. ज्याची किंमत चॉकलेटच्या किमतीतून वसूल करण्यात येते. पण त्यासोबतच तुम्हाला या चॉकलेटमध्ये काही असे फ्लेवर्स मिळतात ते कदाचित तुम्हाला आणखी कुठे मिळणार नाही.

Wispa Gold

expensive chocolates15-marathipizza

wowreads.com

कॅडबरी चॉकलेटने बनविण्यात येणारी Wispa Gold चॉकलेट ही तिच्या टेस्टसाठी तर फेमस आहेच त्यासोबतच त्याचं आणखी कारण आहे आणि ते म्हणजे या चॉकलेटचं रेपर. या चॉकलेटचं रेपर हे सोन्याच असत. ही चॉकलेट सोन्याच्या पॅकेटमध्ये पॅक होऊन तुमच्यापर्यंत  येते. याची किंमत १.६२८ US डॉलर पासून सुरु होते आणि ती वाढतच जाते.

तर ही होती जगातील सर्वात महाग चॉकलेट्स…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?