WWE स्टारचा गूढ मृत्यू – ज्यामुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली (भाग ३)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जिवंत असताना सुद्धा त्याने लाखो फॅन्स कमावले आणि त्याच्या मृत्यूने अख्खं प्रोरेसलिंग विश्व ढवळून निघालं. WWE आणि इतर मोठ्या प्रमोशन्सना आपल्या पोलिसीज मध्ये मोठे बदल करावे लागले. मृत्युनंतर सुमारे ७ वर्षे होऊन गेली तरी अगदी आजदेखील त्याच्या मृत्यूबद्दलच्या चर्चा, Conspiracy theories थांबलेल्या नाहीत. फॅन्स आजदेखील त्याला मिस करतात. WWE ने शक्य त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कंपनीशी संबंधित असलेले त्याचे उल्लेख, त्याचे विक्रम पुसण्याचा प्रयत्न केला असला तरी एक टेक्निकल प्रोरेसलर म्हणूनही अजूनही त्याचं स्थान फॅन्स च्या मनात अढळ आहे.

कोण होता हा ख्रिस बेनवॉ? काय केलं होतं त्याने?

=====

=====


(मागील (दुसऱ्या) भागाची लिंक: पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या WWE स्टार ची शोकांतिका-भाग २)

===

पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये बेनवॉच्या मेंदूवर बरेच आघात असल्याचं दिसून आलं. Sports Legacy Institute च्या डॉ ज्युलिअन बेल ह्यांनी केलेल्या चाचण्यांनुसार बेनवॉचा मेंदू हा अल्झायमर झालेल्या ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या मेंदूप्रमाणे वाटत होता. तज्ज्ञांच्या मते रेसलिंग करत असताना बरेचदा डोक्यावर घेतलेल्या चेयरशॉट्स मुळे हे होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

WWE ने ह्यासाठी आपली सिस्टीम काही प्रमाणात कारणीभूत असल्याचं कधीही मानलं अथवा कबूल केलं नाही. मात्र, त्यांच्या पॉलीसीजमध्ये लक्षणीय बदल घडून आला.

chris-benoit-03-marathipizzaa

Concussions ला कारणीभूत होतील असे डोक्यावर मारले जाणारे चेयरशॉट्स पूर्णपणे बंद करण्यात आले. रक्त आणि इतर हिंसा असलेली दृश्ये (निदान काही वर्षांकरता) एडीट करण्यात येऊ लागली. तसंच, WWE शोज हे TV-14 वरून TV-PG रेटिंग वर यायला लागले, म्हणजेच हिंसाचार आणि इतर भडक कंटेंट कमी होऊन लहान मुलांना जास्त सुट होईल असं कंटेंट WWE ने दाखवायला सुरवात केली. ख्रिस बेनवॉचा उल्लेख WWE ची वेबसाईट आणि इतर ठिकाणांहून शक्य तितका वगळण्यात आला. Drug Testing आणखी कडक करण्यात आलं.

chris-benoit-01-marathipizzaa

मात्र काही प्रश्न हे अनुत्तरीतच राहिले.

२५ जून,२००७ च्या मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटाने ख्रिस बेनवॉचं इंग्लीश विकीपेडिया पेज एडीट करण्यात आलं आणि त्यात पत्नी नॅन्सीच्या मृत्यूमुळे बेनवॉ शोला येऊ न शकल्याचं आणि त्याच्याजागी जॉनी नायट्रो ह्याला घेण्यात आल्याचं लिहिलं गेलं.

मात्र, पोलिसांना तीनही मृतदेह हे सुमारे साडेचौदा तासांनंतर म्हणजे दुपारी २.३० च्या सुमारास सापडले. त्यापूर्वी कुणाच्याही मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली नव्हती. मग ह्यांचे मृतदेह सापडण्यापूर्वी किंवा कुणाच्याही मृत्यूची बातमी बाहेर येण्यापूर्वी हे पेज कसं काय एडीट करण्यात आलं?

एका वेबसाईटनुसार काही तासांत पेजवर वेगवेगळे एडीट करण्यात आले. ह्यातल्या एका एडिटरचा IP address हा Stamford, Connecticut येथे लोकेट झाला आणि त्याच शहरात WWE चं हेडक्वार्टर आहे.

तसंच, ज्या रात्री त्याला पुन्हा Championship टायटल मिळणार होतं, त्याच्या काही तास आधी तो असं काही करेल असादेखील प्रश्न बऱ्याच फॅन्सकडून विचारल्या जातो.

रिपोर्ट मध्ये बेनवॉने आधी नॅन्सी आणि मग डॅनिएल चा खून करून मग आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला असला तरी वर नमूद केलेल्या ह्या सगळ्यां घटनांचा बेनवॉ परिवाराच्या खूनाशी काही संबंध असल्याचं होता का ह्याबद्दल अनेक लोकं अजूनही साशंक आहेत. कित्येक लोकांच्या मते बेनवॉ निरपराध असून कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने तिघांनाही संपवून बेनवॉच्या आत्महत्येचा देखावा तयार केला. इंटरनेट वर अजूनही या विषयावर चर्चा होतात आणि मते, मतांतरे मांडली जातात.

लवकरच ह्या प्रसंगावर Crossface ह्या नावाने एक मुव्ह येत आहे. ( हे त्याच्या सिग्नेचर सबमिशन मुव्हचं नाव होतं आणि हीच मुव्ह वापरून त्याने लहानग्या डॅनिएलचा खून केल्याचं मानलं जातं). Lifted, Punisher: War Zone फेम लेक्सी अलेक्झांडर ही मुव्ही डायरेक्ट करणार आहेत.

=====

=====

आशा आहे हयात काहीतरी नवीन बघायला मिळेल किंवा आणखी प्रकाश पडेल. एक मात्र खरं की ह्या घटनेनंतर Pro wrestling चं विश्व हे कायमसाठी बदललं.

(समाप्त)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “WWE स्टारचा गूढ मृत्यू – ज्यामुळे WWE इंडस्ट्री कायमची बदलली (भाग ३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?