भारतातील शेवटचे चहाचे दुकान – ११ हजार फुट उंचावर!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

“चहाची टपरी” हे एक सार्वजनिक ठिकाण असल्यासारखं असतं. भारतीय जग टपरी-टपरीवर वसलेलं असतं. कॉलेजकुमारांपासून रिटायर्ड आजोबांपर्यंत…सर्वांसाठी गाव-शहरातील चहाच्या टपऱ्या म्हणजे भेटीगाठींचं हक्काचं ठिकाण असतं. त्यासाठीच ह्या टपऱ्या प्रसिद्ध असतात.

एक टपरी जरा वेगळ्या कारणाने भारतभर प्रसिद्ध आहे –

=====

=====


“भारतातली शेवटची टपरी” म्हणून. 😀

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात असलेले ‘माणा’ हे भारतातील शेवटचे गाव…

समुद्रसपाटीपासून ११ हजार फुट उंचावर स्थित हे गाव वर्षातील सहा महिने बर्फाने झाकलेले असते. या गावापासून अवघ्या २४ किमी अंतरावर भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आणि या शेवटच्या गावात असलेले चहाचे दुकान प्रसिध्द आहे ‘भारतातील शेवटचे चहाचे दुकान’ म्हणून… !

 

last-tea-stall-marathipizza01

स्रोत

येथे भेट द्यायला येणारे पर्यटक या दुकानात चहा प्याल्याशिवाय आणि येथे फोटो काढल्याशिवाय परत जातच नाहीत!

 

last-tea-stall-marathipizza03

स्रोत

हे चहाचे दुकान चंद्रसिंह बडवाल यांच्या मालकीचे आहे. हिंदूंचं तीर्थक्षेत्र, श्री बद्रीनाथ धामपासून ३ किमीवर हे दुकान आहे.

पूवी बद्रीनाथला जाणाऱ्या अनेकांना असलेल्या ह्या दुकानाची माहिती नसे. पण आता प्रसिद्धी मिळाल्यामुळे अनेक लोक आवर्जून दुकानला भेट देऊन जातात.

दुकानाच्या बाजूला लावलेला ‘भारत की आखिरी चाय की दुकान’ हा बोर्ड सध्या ‘सेल्फी पॉइंट’ ठरत आहे.

 

last-tea-stall-marathipizza02

स्रोत

या बोर्डवर भारतातील १० भाषांमध्ये असे लिहिले आहे की, “भारतातील शेवटच्या चहाच्या दुकानामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.”

last-tea-stall-marathipizza07

स्रोत

हे चहाचे दुकान महर्षी-व्यासांच्या लेण्यांजवळ स्थित आहे. असे म्हणतात की याच लेण्यांमध्ये महर्षी व्यासांनी गणपती कडून जगातील सर्वात महान महाकाव्य ‘महाभारत’ लिहून घेतले.

पूर्वी या दुकानावर केवळ चहाच मिळायचा, पण आता नुडल्स आणि इतर स्नॅक्स देखील मिळतात.

हे भारतातील चहाचे शेवटचे दुकान आहे याची साक्ष देणारा हा एसबीआय बँकेचा बोर्ड!! (प्रूफ हवं असणाऱ्यांसाठी खास 😉 )

last-tea-stall-marathipizza04

स्रोत

इथून अगदी जवळच आहे जगातील सर्वात उंच Motorable Road (म्हणजेच गाडी चालवण्याजोगा, सर्वात उंचावर असलेला रस्ता).

last-tea-stall-marathipizza05

स्रोत

=====

=====

भारतातून तिबेट मध्ये प्रवेश करायचा असल्यास तुम्हाला या चहाच्या दुकानाजवळूनच जावे लागते. गेल्या २५ वर्षांपासून एवढ्या उंचीवर थंडीने गारठून जाणाऱ्या प्रवाश्यांची चहाची तल्लफ हे दुकान भागवत आहे.

last-tea-stall-marathipizza06

स्रोत

तसे आता इथे अनेक चहाची दुकाने झाली आहेत, परंतु पर्यटकांच्या मनावर याच चहाच्या दुकानाने कायमचा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच हे दुकान इतके प्रसिध्द आहे.

 

last-tea-stall-marathipizza08

स्रोत

उत्तराखंड सरकारने ‘माणा’ गावाचे असलेले भौगोलिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याला ‘‘Tourism Village’ चा दर्जा दिला आहे.

 

अतुल्य भारतातील आणखी एक अतुल्य गोष्ट!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 75 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?