इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग १

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

======

मानवेंद्रनाथ रॉय यांचे एक वाक्य आहे.

No other civilization in the world is as ignorant to Islamic history, as the Hindus.

माझ्या मागच्या लेखावर झालेल्या चर्चेत या वाक्यातील सत्यता शतदा अधोरेखित झाली आहे.

=====

=====


(आधीचा लेख बराच ‘वादग्रस्त’ ठरला आहे. वाचला नसेल तर वाचून पहा – मुस्लिम राजकारण आणि दलितांची दिशाभूल!)

खरेतर इस्लाम बद्दलचे भारतीयांचे अज्ञान आजचे नाही. या अज्ञानाचे कारण काय? ‘सर्व धर्म समान आहेत’ हे एक वाक्य भारतीयांच्या सहिष्णुतेच्या सद्गुणविकृतीचे कारण बनून राहिले आहे. ‘सर्व धर्म समान आहेत’ असे एकदा गृहीत धरले तर इस्लामचा वेगळा अभ्यास करण्याची गरज वाटत नाही, यात नवल ते काय? सर्वधर्मसमभावाचे घाऊक तत्वज्ञान सांगणाऱ्या भारतीयांना शतकांपासून इस्लामी राक्षसाचे अत्याचार सहन करावे लागले तरी आपण त्याच विश्वमानवतावादी गोड वाटणाऱ्या संकल्पनेला चिकटून बसलो आहोत यात मात्र नवल आहे. एखाद्या विषयाचा किमान प्राथमिक अभ्यास नसेल तर त्याबद्दल मत मांडू नये हा सर्वमान्य नियम आहे. पण या नियमाला फाटा देऊन इस्लामबद्दल काडीचाही अभ्यास नसताना “इस्लाम हा मुळात मानवतावादी धर्म आहे, कुराण हा शांततेचा संदेश देणारा पवित्र ग्रंथ आहे आणि दहशतवादी आणि मूलतत्त्ववादी मुस्लिमांनी इस्लामचे आणि कुराणाचे चुकीचे आकलन केले आहे” असा चक्क निष्कर्ष काढून ‘आपण किती धर्मनिरपेक्ष वगैरे आहोत’ हे सिद्ध करण्याची चढाओढ कथित सेक्युलॅरांमध्ये लागलेली असते. पण इकडे अज्ञानातून भाईचाऱ्याचे इमले रचण्याची स्पर्धा लागलेली असते तेव्हाच तिकडे सीमेवर कुठेतरी काफरांविरुद्धच्या पवित्र जिहादला ‘अंजाम’ देऊन इस्लामचे अनुयायी कामायबीचा जष्न साजरा करीत असतात. आता “या पवित्र मार्गाला जाहीर विरोध करणाऱ्या मुस्लिमांची संख्या किती?” हा तरी प्रश्न किमान विचारात घेतला जावा तर तसेही नाही. मग अशा भाईचार्याने भारून गेलेल्या वातावरणात अभ्यास तर सोडाच, निरापेक्षतेची झापडे लावलेल्या भारतीय मनाला वास्तव दिसणेही अशक्य ठरते. या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत असते सहिष्णुतेची सद्गुणविकृती जडलेले भारतीयांचे निरागस अज्ञान. एका लेखातून हे अज्ञान दूर होणार नाही हे मान्यच! पण यातून किमान कुणीतरी अभ्यासाला सुरुवात करावी अशी अपेक्षा करणे अवाजवी नाही. त्या अनुषंगाने इस्लामची राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणाऱ्या काही घटनांचा मागोवा घेणे महत्वाचे ठरते.

इस्लाम आणि भारतीय मुस्लिम वेगवेगळे आहेत काय?

मुस्लिम मानसिकतेची जडणघडण कोणत्या पार्श्वभूमीवर झालेली असते याचा अभ्यास केला की हा सरसकटीकरणाचा प्रश्न निकालात निघतो. एखाद्या धर्मग्रंथात जर “इतर धर्माचे लोक (केवळ ते इस्लामेतर धर्माचे आहेत म्हणून) पापी आहेत आणि त्यांची हत्या करणे आवश्यक आहे” अशी शिकवण असेल, “काफ़िरच्या रक्ताचा एक थेंब हजार नामाजाचे पुण्य देतो” अशी शिकवण मदर्शांमधून सर्रासपणे मिळत असेल तर हे शिक्षण घेतलेली व्यक्ती पुढे जाऊन सहिष्णू आणि संविधनवादी होईल हे गृहीत धरणे मूर्खपणाचे आहे. भारताच्या संदर्भात विचार करूया.

‘सर्वच मुस्लिम तसे नसतात’ असे म्हणून ‘Good Muslims, bad Muslims’ नावाचा अतर्क्य खुळचटपणा ज्यांनी चालवला आहे त्यांच्याकडे ‘ते तसे नसतातच’ हे सिद्ध करणारी कोणती आकडेवारी आहे? जर सर्वच तसे नसतील तर हिंदुत्ववाद्यांच्या बेकायदेशीर कारवयानंतर ज्याप्रकारे हिंदूंचाच सार्वत्रिक असंतोष दिसून येतो तसा असंतोष आणि उद्रेक हिजबुल आणि मुजाहिदीन च्या दहशतवादी धोरणावर सामान्य मुस्लिम जनतेत दिसून येतो काय? जर ते गप्प राहत असतील तर त्याचा अर्थ काय घ्यावा? ते तटस्थ आहेत हा अर्थ घ्यावा की झाल्या प्रकारावर ते सोयीस्करपणे मौन आहेत असा अर्थ घ्यावा? गोरक्षकांच्या बेकायदेशीर वागण्यावर हिंदूंची बाजू मांडणारा एखादा माणूस गप्प राहिला तर त्याचा अर्थ काय घेतला जातो?

इथे प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमांच्या तटस्थतेचा नाहीच. प्रश्न आहे तो त्यांच्या उघड पाठिंब्याच्या किंवा एकतर उघड निषेधाचा. कारण नुसते गप्प राहून काहीच सिद्ध होत नसते. निषेध जेव्हा जाहीरपणे मांडला जाईल तेव्हाच वास्तवाच्या कसोटीवर ‘ते तसे नाहीत’ असे म्हणायला जागा आहे. अन्यथा मौनाचा अर्थ शब्दांपेक्षा जास्त स्पष्ट असतो एवढेच म्हणावे लागेल.

कुराणविरोधी भूमिका घेणारा मुस्लिम इस्लामला मान्य आहे काय?

 

salman khan pooja marathipizza
हे इस्लाम ला मान्य आहे का?

विषयाचे आकलन सोपे होण्यासाठी पहा –

जे लोक अश्रद्धेच्या मार्गात खूपच धावपळ करीत आहेत त्यांच्या धावपळीने तुम्ही खिन्न होऊ नका. ते अल्लाहचे काहीही वाईट करू शकत नाहीत. अल्लाहचा हेतू असा आहे की त्यांच्यासाठी मरणोत्तर जीवनात कोणताही वाटा असू नये. आणि सरतेशेवटी त्यांना कठोर शिक्षा मिळणार आहे. जे लोक श्रद्धा सोडून अंधश्रद्धेचे ग्राहक बनले आहेत, निःसंशय ते अल्लाहचे काहीच नुकसान करत नाहीत. त्यांच्याकरिता दुःखद शिक्षा तयार आहेत. त्यांना असे सैल सोडणे आश्रद्धावंतांनी आपल्या बाबतीत हितकारक समजू नये. आम्हीतर त्यांना याकरता सैल सोडत आहोत की यांनी पापांचे खूप मोठे ओझे जमा करावे. मग यांच्यासाठी भयंकर अपमानजनक शिक्षा आहेत.” (दिव्य कुराण, सुरह-अलइमरान, १७६-१७८)

शिर्क विरोधी इस्लामी परंपरा न मानणाऱ्या अर्थात तकफिर झालेल्या मुस्लिमांना काय शासन करावे याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या कित्येक गोष्टी हादिस मध्ये अगदी स्पष्टपणे आल्या आहेत. यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे ‘मुस्लिम’ असणेच रद्द होते. “शरिया कायदा आणि भारताची घटना यामध्ये द्वंद्व आले तर सर्वोच्च काय?” असा प्रश्न विचारल्यानंतर इस्लामिस्ट स्कॉलर लोक गप्प होतात यामागे हेच कारण आहे. कारण संविधान सर्वोच्च मानले तर त्यांचा स्वतःला मुस्लिम म्हणवून घेण्याचा अधिकार खुद्द धर्मानेच रद्दबातल ठरवलेला असतो. कारण इस्लामिक कायदा सोडून इतर कोणताही मानवनिर्मित कायदा पाळणे आणि मानवनिर्मित व्यवस्थेला मान्यता देणे ही इस्लामच्या नजरेतून ‘अंधश्रद्धा’ आहे. हे झाले इस्लामच्या चष्म्यातून. आता इस्लामच्या मते ही श्रद्धा असो वा अंधश्रद्धा वा आणखी काही. ती पाळली नाही तर भारतीय कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो आणि न्यायालयीन प्रक्रियेतुन त्याला शिक्षा करण्यात येते. मग भारतात जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला अथवा समुदायाला इतर धर्मीयांकडून भाईचारा अपेक्षित असेल तर त्याआधी त्याला ‘शरिया, हादिस इत्यादी धर्मग्रंथ कालबाह्य झाले आहेत आणि संविधान हाच सर्वोच्च ग्रंथ आहे’ असे म्हणून त्या अपेक्षित भाईचाऱ्यासाठी स्वतःची ‘लायकी'(च) सिद्ध करावी लागेल. यावर जर कोणी विचारत असेल की आम्ही एकाच वेळी दोन्हींचे पालन केले तर चालणार नाही का? तर या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण तुम्ही प्रार्थना कुठे करावी (भारतात राहणाऱ्या प्रत्येकाने), कोणत्या वेळी करावी, भोंगे लावावेत की नाही, किती लावावेत, लग्न कसे करावे, अपत्य किती असावेत, तलाक कसा द्यावा, मिरवणूक किती वेलची असावी, कोणत्या मार्गाने जावी, हुंडा घ्यावा की घेऊ नये…इत्यादी मानवी भौतिक जीवनाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्याकडे आहे. शरिया किंवा अन्य कोणत्याही यःकाश्चित धर्मग्रंथकडे नाही.

=====

सदर लेखावर मतभेद असतील तर आपला प्रतिवाद आमच्या फेसबुक पेजवर मेसेज करावा. अभ्यासपूर्ण आणि सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या प्रतिवादांना प्रसिद्धी नक्कीच देण्यात येईल. आमच्या फेसबुक पेजची लिंक: facebook.com/MarathiPizza

=====

भारतातील सगळे किंवा बहुसंख्य मुस्लिम लोकशाही आणि घटनेवर निष्ठा ठेवणारे आहेत काय?

आखाती देशांतून चालवल्या जाणाऱ्या ‘अल जझिरा’ या वाहिनीच्या वेबसाइटवरून दोन वर्षांपूर्वी एक सर्वे घेण्यात आला. या सर्वेमध्ये एकच प्रश्न विचारला गेला- ‘इराक आणि सीरियामध्ये आयसिसने मिळवलेल्या संघटनात्मक विजयाला तुमचा पाठिंबा आहे का?’ या सर्वेतून धक्कादायक निकाल असा समोर आला की तब्बल ८१.६ टक्के लोकांनी या प्रश्नाचे ‘हो’ असे दिले आहे. सामान्य मुस्लिम लोक स्वतःच्या धार्मिक ओळखिबद्दल किती जागरूक असतात हे दाखवून देणारा हा सर्वे आहे. अर्थात ही आपल्याला कट्टरता वाटत असली तरी त्यांच्यासाठी अशी ओळख आणि अस्मिता जपणे म्हणजे अल्लाहवरील श्रद्धा सिद्ध करणे होय. “इस्लामला आणि त्याच्या कथित विश्वविजयाला मान्यता देणारे मुस्लिम भारतात नाहीतच” हा गोड गैरसमज भारतीय राज्यांमध्ये इसिसच्या प्रचारास मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाने दूर होणे अपेक्षित होते. पण सत्य समोर असूनही ‘ते तसे नाहीतच’ असे म्हणून आपल्याला काय सिद्ध करायचे असते? भारतामधून आत्तापर्यंत अनेक युवक इसिसच्या प्रचाराने प्रभावित होऊन आखाती देशात गेले आहेत. इसिसचे आवाहन हे एखाद्या राजकीय पक्षाचे मतदान करण्याचे आवाहन नाही हे येथे गांभीर्याने लक्षात घ्यावे लागते. लोकशाही आणि इतर इस्लामबाह्य ‘जाहिल’ व्यवस्था अंगिकरलेल्या जगातील सर्व शक्तींना पूर्णपणे नष्ट करून इस्लामी राजकीय सिद्धांतावर आधारलेलं, खिलाफत चे एककलमी वर्चस्व असलेले साम्राज्य आणण्याची अवाढव्य महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या आणि वैचारिक पातळीवर अत्यंत ठाम असलेल्या एका ताकदवान संघटनेचा प्रभाव भारतीय मुस्लिम मनावर का पडतो याचा आपण कधी विचार करणार आहोत?

 

muslims praying marathipizza
indianexpress.com

खिलाफत या व्यवस्थेचे सामान्य मुस्लिम मनामधील स्थान किती अढळ आहे हे तर स्पष्ट आहेच. इसिसच्या विश्वविजयच्या या योजनेत भारताला काय महत्व आहे ते पाहा –

जगाच्या शेवटाकडे आणि काळाच्याही शेवटाकडे नेणारी अंतिम लढाई ‘खुरासान’ भागात होईल. या भागात विजय मिळवल्यानंतर इस्लामचे विजयी लष्कर निर्णायक लढाईसाठी पॅलेस्टाईन कडे रवाना होईल.

– अशा आशयाचे प्रेषितांचे एक वचन हादिस मध्ये आहे. भारत, पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांच्या सध्याच्या भूभागांचा समावेश असलेल्या एका भूप्रदेशाचे नाव ‘खुरासान’ आहे. आणि खुरासान येथे जी लढाई होणार आहे तिला ‘गज्वा-ए-हिंद’ (हिंदुस्थान विरुद्धची लढाई) असे म्हटले गेले आहे. त्यामुळे आपल्या दहशतवादी कारवायांचे कार्यक्षेत्र भारतभर पसरविण्याचे इसिसचा प्रयत्न आणि मूळ इस्लामच्या मांडणीतुन त्याला असलेले अधिष्ठान याचा वेगळा अभ्यास करावा लागतो.

भारतातील मुस्लिम नेतृत्वाची भूमिका

इस्लामची आणि त्याच्या अनुयायांची महत्वाकांक्षी ध्येयधोरणे तर आता जगासमोर पुरेशी स्पष्ट आहेत. इतिहासात जे घडत आले तेच घडवून आणण्याचा यापुढेही प्रयत्न होणार हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ‘आम्ही भारताशी आणि भारताच्या सार्वभौम अस्तित्वाशी कोणत्याही परिस्थितीत एकनिष्ठ राहू’ हे भारतीय मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संस्थांच्या तोंडून आजही सांगितले जात नाही याचा तार्किक अर्थ काय? शरियत आणि कुराणाचा कैवार घेऊन बोलणारे भारतीय मुस्लिम, तीन तलाक वरील प्रतिबंधाला होत असलेला विरोध, समान नागरी कायद्याला होत असलेला विरोध, काश्मिरी मुस्लिमांचा दहशतवाद्यांना मिळत असलेला उघड पाठिंबा यावर ‘भारतीय’ म्हणवून घेणारे सर्वसामान्य मुस्लिम मन फक्त तटस्थ राहत असेल तर अशा तटस्थतेचा काडीचाही उपयोग नाही. जोपर्यंत या मुलतत्ववादावर मुस्लिम लोकसंख्येतुन स्पष्ट विरोध होत नाही तोवर ते ‘तटस्थ आहेत’ म्हणून ते किती मानवतावादी आणि भारतनिष्ठ असे म्हणणे हे घाऊक बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

ज्या प्रांतात इस्लामची शक्ती आणि संख्याबळ कमी आहे तिथे ते शांत राहतात. संख्या वाढली की हक्क मागतात. उपद्रव सुरु करतात. आणि शेवटी त्या प्रांताची शकले करतात हे इस्लामच्या आजवरच्या इतिहासात प्रकर्षाने दिसून येते. प्रत्येक वेळी असे होण्याकरिता आणि असेच होण्याकरिता तत्कालीन राजकीय परिस्थिती कारणीभूत होती असे म्हणणे कोणत्या तर्काच्या आधारावर योग्य ठरते? तरी भारताने इस्लामसकट मुस्लिमाना स्वीकारले. एवढेच नव्हे तर बंधुत्वाची वागणूक दिली. “मुस्लिम हे भारताचे मित्र नव्हेत, त्यांचा भाईचारा बिगरमुस्लिम जनतेसाठी नाही” असे ठासून सांगणाऱ्या आंबेडकरांच्या वचनांकडे दुर्लक्ष करून भाईचारा ठेवला. याचा परिणाम काय झाला पहा – अजूनही इसिस, खिलाफत, मूलतत्त्ववाद यावर भारतीय मुस्लिम नेतृत्वाने मुस्लिम समुदायास उद्देशून त्यांची मते स्पष्ट केलेली नाहीत.

मुळात इस्लामच्या मांडणीनुसार –

जगभरातील मुस्लिमांच्या बिकट अवस्थेला स्वतः तेच जबाबदार आहेत, त्यांनी शरियातील नियमांचे वेळोवेळी उल्लंघन केले. पवित्र धर्माची अवज्ञा केली. दुसऱ्या धर्माच्या नादी लागून पथभ्रष्ट झाले. त्यामुळे विश्वाचे एकहाती नेतृत्व त्यांच्याकडून हिरावले गेले. आता ही परिस्थिती सुधारायची असेल तर त्यावर केवळ एकच उपाय. तो म्हणजे विशुद्ध इस्लामकडे वाटचाल.

आता विशुद्ध इस्लामकडे वाटचाल म्हणजे काय? म्हणजे लोकशाहीलाचअमान्य करणे, आधुनिक मूल्यांवर आधारित घटना अमान्य करणे, मानवाने निर्माण केलेली पृथ्वीतलावरील कोणतीही प्रागतिक व्यवस्था समूळ नष्ट करून इस्लाम आणि शरिया वर आधारित खिलाफत नावाच्या ‘पवित्र’ राज्याला मान्यता देणे!

इस्लामी मूलतत्त्ववाद इतका स्पष्ट आहे. त्यामुळे शतकानुशतके जोपासलेले पारंपरिक अज्ञान झुगारून देऊन घटनेच्या आणि नैतिकतेच्या कठोर कसोटीवर मूलतत्त्ववादी मुस्लिम जनतेची भाईचारा ठेवण्याची योग्यता तपासून पाहणे हाच विवेक आहे.

जो जे वांच्छिल, तो ते लाहो। प्राणिजात।

– हे अस्सल भारतीय अभिमानास्पद सहिष्णू तत्वज्ञान प्रत्येक बाबतीत प्रमाण मानले तर मूलतत्त्ववादी मुस्लिम हे सुद्धा ‘प्राणिजात’ याच संकल्पनेत येतात. त्यांना काय ‘वांच्छित’ आहे हे पुरेसे स्पष्ट आहे. त्यामुळे सहिष्णुतेचे सर्व निकष किमान आकलनापूरते बाजूला ठेवून इस्लामच्या आणि त्याच्या राजकीय इतिहासाचा व वर्तमानाचा अभ्यास करण्याची हीच योग्य वेळ आहे.

=====

=====

=====

सदर लेखावर मतभेद असतील तर आपला प्रतिवाद आमच्या फेसबुक पेजवर मेसेज करावा. अभ्यासपूर्ण आणि सभ्य शब्दात व्यक्त केलेल्या प्रतिवादांना प्रसिद्धी नक्कीच देण्यात येईल. आमच्या फेसबुक पेजची लिंक: facebook.com/MarathiPizza

=====

MarathiPizza.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. MarathiPizza.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza | Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

4 thoughts on “इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग १

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: