' ह्या CBI ऑफिसरमुळे IRCTC वेबसाइटची तात्काळ तिकीट बुकिंग संथगतीने व्हायची – InMarathi

ह्या CBI ऑफिसरमुळे IRCTC वेबसाइटची तात्काळ तिकीट बुकिंग संथगतीने व्हायची

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कुठेही जायचे असल्यास आजही रेल्वे हा उत्तम पर्याय मानला जातो. कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या इच्छुक ठिकाणी पोहचू शकता. पण या रेल्वेचे तिकीट मिळवणे, हीदेखील तेवढीच डोकेदुखी असते.

तिकीट कन्फर्म न झाल्याने आणि तिकीट आरक्षण होत नसल्याने कितीतरी वेळा प्रवाश्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

तुम्ही कधी आयआरसीटीसी तात्काळ कोट्यामध्ये तिकीट आरक्षण करण्याचा प्रयत्न केला असलात, तर बहुतेकदा तुम्ही यात यशस्वी होत नाही आणि तुम्हाला तिकीट मिळत नाही.

पण तुम्हाला हे माहित आहे का ? असे का होत असे ? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल..

 

railway engine featured inmarathi

 

रेल्वेमध्ये तत्काळ तिकीट मिळण्यामध्ये होणाऱ्या गैरसोयीमागे एक मोठा घोटाळा असल्याचे आता उघड झाले आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने तात्काळ तिकिटांची एकत्र बुकिंग केल्यामुळे तिकीट संपत असत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सॉफ्टवेअरला देखील सीबीआयच्याच असिस्टंट प्रोग्रामर अजय गर्ग याने बनवले होते. सीबीआयने आपल्या या प्रोग्रामरला अटक केली आहे.

सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अजय गर्गने बनवलेल्या या सॉफ्टवेअरला बुकिंग एजंटपर्यंत पोहोचवण्याचे काम जौनपूरचा राहणारा अनिल कुमार गुप्ता नावाचा एक माणूस करत असे.

या एजंटना अजय गर्गविषयी कोणत्याही प्रकारची माहिती नसायची. एकदा सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर बुकिंग एजंट एकत्रितपणे शेकडो तात्काळ तिकिटं बुक करू शकत होता आणि यासाठी तो सामान्य माणसांकडून अधिक रक्कम वसूल करत असे.

तात्काळ तिकीटांमधून होणाऱ्या अतिरिक्त कमाईचा एक भाग अनिल कुमार गुप्ता याच्याकडे जात असे, जो त्यानंतर अजय गर्गला त्याचा हिस्सा पोहचवत असे.

 

Tatkal tickets scam.Inmarathi1

 

या हायटेक घोटाळ्यामध्ये सॉफ्टवेअरच्या मार्फतच अजय गर्ग हा प्रत्येक तिकीटाची माहिती ठेवत असे आणि त्या हिशोबानेच आपले कमिशन घेत असे.

सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अजय गर्ग हा आपला यातील हिस्सा देखील हायटेक पद्धतीनेच घेत असे.

अनिल कुमार गुप्ता याच्याकडून अजय गर्ग हा बिटकॉईनमध्ये आपला हिस्सा घेत असे. एवढेच नाही तर अनिल कुमार गुप्ता जेव्हा दिल्लीला येत असे, तेव्हा तो सरळ कॅशमध्ये अजय गर्गला त्याचा हिस्सा देत असे.

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यूपीएससीच्या मार्फत सीबीआयमध्ये येण्याच्या अगोदर अजय गर्ग आयआरसीटीसीमध्ये प्रोग्रामर होता.

आयआरसीटीसीमध्ये २००७ पासून २०११ च्या दरम्यान नोकरी करतेवेळी त्याने या आयआरसीटीसीच्या वेबसाईटमधील दोषांना ओळखले आणि नवीन सॉफ्टवेअर बनवून त्यातून कमाई करण्याचा कट रचला.

 

railway-ticket-queue-inmarathi

 

एफआयआर नोंद करण्यासोबतच सीबीआयने अजय गर्ग आणि अनिल कुमार यांना अटक केली आहे. अजय गर्गला साकेतच्या विशेष न्यायालयामध्ये सीबीआयच्या रीमांडवर पाठवण्यात आले. जिथे त्याची योग्य ती चौकशी करण्यात आली.

तिथेच जौनपूरमध्ये अटक करण्यात आलेल्या कुमार गुप्ता याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात आले.

अटकेबरोबरच सीबीआयने पुरावे जमा करण्यासाठी दिल्ली, मुंबई आणि जौनपूरमध्ये १४ ठिकाणांवर छापा मारले.

या छाप्यांमध्ये रोख ८९.४२ लाख रुपये, ६१.२९ लाख रुपयांची सोन्याची ज्वेलरी, १५ हार्डडिस्क, ५२ मोबाईल फोन्स, २४ सीम कार्ड्स, १५ लॅपटॉप्स, सहा रावटर्स, चार डाँगल, १९ पेन ड्राईव्ह आणि इतर काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.

 

Tatkal tickets scam.Inmarathi3

 

सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी या अटकेच्या प्रकरणाबद्दल सांगितले आहे की,

“ हे प्रकरण सीबीआयच्या धोरणानुसार हाताळण्यात येईल. तसेच, यांनी केलेले हे काम सहिष्णुता शून्य आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.”

या सर्व प्रकरणामुळे तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की, या सर्व घोटाळ्यामुळेच तुमचे रेल्वेचे तिकीट आयआरसीटीसी संकेतस्थळावरून योग्यप्रकारे बुक होत नव्हते आणि एजंटद्वारे तुमची फसवणूक होत असे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?