खान्देशच्या इतिहासातील पहिले पारंपारिक वाद्य पथक

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

बाप्पाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश्श आवाजात ‘पोरी जरा जपून दांडा धर’वर नाचणारी तरुण मंडळी बघून तुम्हालाही वाईट वाटत ना!? हे सगळं थांबायला हव असा मला वाटायचं. पूर्णपणे थांबणं जरी कठीण असलं तरी कमी मात्र नक्की होऊ शकतं! जर लोकांना आपली खरी संस्कृती काय आहे हे कृतीतून दाखवून दिलं तर??!  रवींद्र बागुल, भूपेंद्र बागुल आणि प्रमोद ढवळे यांनी धुळ्यातले नव्हे तर संपूर्ण खानदेशातले पहिलेवहिले पारंपारिक ढोल, ताशा, ध्वज पथक सुरु करून हे दाखवून दिल आहे !!!

swarmudra-marathipizza01

 

आपल्या शास्त्रांनुसार बाप्पाला ‘नाद’ भाषा कळते. वादकांनी केलेले वादन हे गणरायाला भक्तिपूर्वक केलेले आवाहनच असते, तेही त्याच्या भाषेत..असं म्हणायला काही हरकत नाही! पथक काय असतं? वादन कसं करावं? पथकातील शिस्त, संस्कार, वादनातले विविध हात आणि मुळात पथक सुरु करण्याची संकल्पना हि भूपेंद्र बागुल आणि रवींद्र बागुल या बंधूंची. तर या संकल्पनेला प्रत्यक्षात आणताना financial आणि moral support लाभला तो प्रमोद ढवळे काकांचा!!!

पुण्यात असताना ह्या बागुल बंधूंना पथक सुरु करावे असे वाटत होते. १००-१५० वादक पुण्यात तयार देखील होते. परंतु, ‘पारंपारिक वादनाची संस्कृती रुजविणे’ हा भव्य सद्हेतू ठेऊन बागुल बंधूंनी धुळ्यात पथक सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि इतिहास घडला! पथकं महाराष्ट्रात शेकडो आहेत , तर पथकाचं नाव शोधणं हे अवघडच काम होतं जरा. खूप विचारांती पथकाचं नाव ठरलं – “स्वरमुद्रा”!

swarmudra-marathipizza

सरावाची जागा शोधणं हा पुढचा task थोडा वेळ खाऊन जाईल याची पथकप्रमुखांना जाणीव होतीच. हे किचकट काम जवळजवळ महिना दीडमहिना चाललं. शेवटी नदीकाठच्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळची solid जागा मिळाली व ‘स्वरमुद्राचा’ प्रवास सुरु झाला. स्वरमुद्राला धुळ्यातल्या लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक मोठया पदांवरील व्यक्तींनी स्वतःहून वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली ही उल्लेखनीय बाब होय!

swarmudra-marathipizza04

दोन अडीच महिने सराव झाल्यानंतर पथकाला अनेक ठिकाणी वादनासाठी बोलावणं आलं. स्वरमुद्राने आपल्या वादनाने मिरवणूका अक्षरशः गाजवल्या. पथकातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच रवी “दादा” म्हणतात की,

नवजीवन पुस्तकालय येथे केलेलं गणपती आगमनाचं वादन आणि सराफ बाजार येथील मंडळासाठी केलेलं विसर्जनासाठीचं वादन हे अविस्मरणीय होतं.

सराफ बाजारात पथकाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. अबालवृद्ध, महिलांनी वादनाचा मनसोक्त आनंद घेतला. स्वरमुद्राने कधीही मानधनासाठी वादन केले नाही आणि करणार नाही. हे मी पथकातील एक सदस्य असल्याने ठामपणे सांगू शकतो. मी आणि माझ्यासारखे बरेच सदस्य पथकात मनापासून वादन करतात त्याचं हे मुख्य कारण होय!!!!

swarmudra-marathipizza03

पथकाची शिस्त, संस्कार, त्यातला मुलींचा सहभाग हे सर्व बघून पथकाला शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या श्री बालाजी रथाच्या मिरवणुकीत वादन करण्याचा “मान” मिळाला. धुळ्याच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं कि जमलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीचे लक्ष वादनाकडे जास्त आणि रथाकडे कमी होते!!! गोविंदा गोविंदाच्या गजरात ढोल, ताशाच्या नादाने जमलेले सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले.

महाराजांच्या घोषणेपासून सुरवात होऊन, शंखनाद, वादन आणि शेवटी मनापासून येणाऱ्या “गणपती बाप्पा मोरया”च्या आरोळीला ऐकणं, अनुभवणं हे अगदी trance मध्ये घेऊन जाणारं असतं! धुळ्यातल्या या पथकात मुळचे धुळ्यातलेच नाही तर बाहेरून धुळ्यात आलेले असे मुलं, मुली, प्रौढ सगळेच सदस्य आहेत.

पहिलं वर्ष सरत नाही तोवर पथकाचा विस्तार हा मोठ्या scale वर झालाय…! नवीन शाखा सुरु करण्याचाही मानस पथकप्रमुखांचा आहे.

माझ्यासारख्या अनेकांचं ढोल-ताशा-ध्वजधारी होण्याचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल रवी दादा, भूपेंद्र दादा, ढवळे काका यांचे मनापासून आभार!

swarmudra-marathipizza04

गणपती बाप्पा मोरया!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?