' अध्यात्म आणि विज्ञान यांची अनोखी सांगड घालणारं विवेकानंद आणि टेस्ला कनेक्शन! – InMarathi

अध्यात्म आणि विज्ञान यांची अनोखी सांगड घालणारं विवेकानंद आणि टेस्ला कनेक्शन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१२ जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. अर्थात १९८४ पासून जरी या दिवसाला राष्ट्रीय युवा दिन म्हणून संबोधलं जात असलं, तरीही अनेकांना याची फारशी कल्पना आजही नाही.

विवेकानंदांचं अध्यात्मिक ज्ञान काही अंशी सामान्यांना परिचित असलं तरी इतर क्षेत्रातील त्यांचं ज्ञान लोकांना फार माहित नसतं. विज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रातील दोन दिग्गज प्रसिध्द संशोधक टेस्ला आणि स्वामीजी यांच्या भेटीचा हा किस्सा-

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही गोष्ट आहे, १८९६ सालातली. त्याकाळात अमेरिकेत एक नाटक प्रचंड गाजत होतं. या नाटकाचं नाव, इजियल. या नाटकात सॅरा बर्नहर्ट ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारत होती. गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारीत असं हे नाटक फ़्रेन्च भाषेत सादर केलं जायचं.

या नाटकात असं दाखवलं होतं, की ध्यानमग्न बुध्दांना इजियल नावाची तरूणी रिझवण्याचा प्रयत्न करते. स्वामीजींच्या कानावर या नाटकाची चर्चा आली आणि ते नाटक बघायला गेले.

धर्म संसदेतील आपल्या भाषणानं ते एव्हाना लोकप्रिय झाले होते. सॅरानं प्रेक्षागृहात स्वामीजींना बसलेलं पाहिलं आणि नाटक संपताच त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं.

 

swami vivekanand inmarathi

 

योगायोगाची गोष्ट अशी, की याचवेळेस सुप्रसिध्द संशोधक आणि वैज्ञानिक निकोला टेस्ला देखील नाटक पहायला आले होते. याच ठिकाणी ग्रीनरूममधे पहिल्यांदा टेस्ला आणि स्वामिजी यांची भेट झाली. यावेळेपोवेतो ३९ वर्षीय टेस्ला यांनी वातानुकूलीत गाडीचा शोध लावला होता आणि निकोला टेस्ला या कंपनीचा प्रारंभही झाला होता.

अजून एक योगायोग म्हणजे या भेटीआधी काही काळच स्वाजीजींनी एक पत्र लिहिलं होतं ( विवेकानंद रचनावली खंड-पाच मधे या पत्राचा उल्लेख आढळतो) ज्यात टेस्ला यांचा उल्लेख होता.

यात स्वामीजींनी लिहिलं होतं, की मिस्टर टेस्ला यांच्यामते ते गणितीय समिकरणाच्या आधारे शक्ती आणि पदार्थाचे ऊर्जेत रुपांतर सिध्द करू शकतात. पुढच्या आठवड्यात मी टेस्ला यांची भेट घेऊन त्यांचा हा नविन गणिती प्रयोग पहाण्यास उत्सुक आहे.

याच पत्रात त्यांनी पुढे म्हणलं आहे, की टेस्लांचा हा प्रयोग वेदांताची वैज्ञानिक मुळं सिध्द करेल. यामुळे हे सिध्द होईल, की हे संपूर्ण जग अनंत ऊर्जेचं परिवर्तन आहे.

त्यानंतर या दोघांची जी भेट झाली त्यात काय चर्चा झाली याचं सविस्तर वर्णन दुर्दैवानं उपलब्ध्द नाही. मात्र या भेटीनंतर टेस्लांच्या लेखन आणि संशोधनावर या बैठकीतील विचारांचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो.

 

tesla im

 

याचा पुरावा म्हणजे १९०७ साली टेस्लांनी मनुष्याचं सर्वात मोठं यश या शीर्षकांतर्गत एक दीर्घ लेख लिहिला ज्यात ‘आकाश’ आणि ‘प्राण’ असे संस्कृत शब्द वापरले आहेत.

या लेखात टेस्ला यांनी लिहिलं आहे, सर्व पदार्थ मूलत: एकाच मूलद्रव्यापासून उत्पन्न झालेले आहेत आणि या घटकाला प्रारंभ नाही. हा घटक जीवन देणारा, प्राण देणारा किंवा सर्जनशील उर्जेचा प्रभाव असणारा आहे.

१८९७ साली भारतात परतल्यानंरच्या एका व्याख्यानातही स्वामीजींनी टेस्लाचा उल्लेख केला आहे. त्या व्याख्यानात त्यांनी म्हणलं आहे, की सध्याच्या काही अत्यंत बुध्दीमान शास्त्रज्ञांनी वेदांताला वैज्ञानिक मानलं आहे.  या शास्त्रज्ञांपैकी एकाला मी वैयक्तिकरित्या ओळखतो. ही व्यक्ती रात्रंदिवस तिच्या प्रयोगशाळेत काम व्यग्र असते, अगदी जेवणा- खाण्यालाही वेळ मिळत नाही. इतकी ही व्यग्र व्यक्ती मी दिलेलं वेदांताचं व्याख्यान मात्र तासन तास उभी राहून ऐकू शकते.

स्वामीजींच्या विविध संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांशी होणार्‍या चर्चा आणि स्वामीजींच्या विचारांनी प्रभावीत झालेले संशोधक, त्यांच्या कार्यावर स्वामीजींच्या विचारांचा झालेला परिणाम हा तसा फारसा अभ्यासला न गेलेला विषय आहे. त्यांच्या अशा गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?