भारतीय तिरंगा विरुद्ध अॅमेझॉन – via सुषमा स्वराज

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजजींकडे अनेकजण बघत असतात. ट्विटर चा वापर करून शेकडो भारतीयांच्या अडचणी सोडवून, ऑनलाईन विश्वातील active netizens मध्ये देखील सुषमा स्वराज लोकप्रिय आहेत. सध्या त्या चर्चेत आहेत – जागतिक ईकॉमर्स मधील महाकाय Amazon शी सुरू केलेल्या युद्धामुळे. युद्धाचं कारण आहे, भारतीय तिरंग्याचा amazon कडून झालेला अपमान.

झालं असं की amazon च्या वेबसाईटवर, भारतीय तिरंगा असलेलं पायपुसणं विक्रीस होतं.

=====

=====


Sushma-Swaraj indian flag sale marathipizza

स्रोत

एका ट्विटर युजर ने सुषमाजींना ही बातमी ट्विट द्वारे कळवली आणि त्यावर सुषमा जींनी त्वरित प्रतिसाद देत –

Amazon ने बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांच्या कुठल्याही कर्मचाऱ्यास भारतात VISA मिळणार नाही

अशी ट्विट केली.

Sushma Swaraj - Amazon Twitter marathipizza

सदर प्रकरणावर, कौस्तुभ इटकूरकर ह्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट वर चपखल भाष्य केलं आहे.

===

तिरंग्याच्या डिजाईन च्या पायपुसण्या विकणाऱ्या ऍमेझॉन ला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कानपिचक्या दिल्याची बातमी आहे. (हा तिरंगा amazon च्या कॅनडा वेबसाईटवर विक्रीस उपलब्ध होता. आता त्यांनी तो काढून घेतला आहे.) अगदीच व्हिसा वगैरे नाकारण्याची धमकी देणे आश्चर्यकारक आहे. प्रामाणिक संताप किंवा लोकप्रिय मतप्रदर्शन करणे समजण्यासारखे असले तरी एका मंत्र्याने एका कंपनीला असे धमकावणे थोडे जास्त झाले.

पण ह्यात एक दुसरा angle आहे.

Amazon ही अमेरिकन कंपनी आहे. आणि ह्या वस्तू ऍमेझॉन कॅनडा वर विक्रीस होत्या. तिकडे कलात्मक आणि सूचक पायपुसण्या वापरण्याची पद्धत आहे. लोक स्वतःच्या कुटुंबाचे आडनाव लिहिलेल्या पायपुसण्या आवर्जून वापरतात. तसेच त्यांचा झेंडा किंवा राष्ट्रीय प्रतीके असलेल्या पायपुसण्या वापरणेही गैर समजत नाहीत. एवढेच काय तर धार्मिक मजकूर किंवा चित्रे असलेल्या पायपुसण्याही आवर्जून वापरल्या जातात.

 

american flag on sale at amazon marathipizza

 

Christian doormats असे गुगल करून पाहा विश्वास नसेल तर. त्या घरात तशा थीमचे वातावरण आहे असा साधारण अर्थ त्यांना अपेक्षित असतो.

भारतात मात्र पायपुसणे ह्या वस्तूला हलके समजले जाते. आपली भाषा आणि संस्कृती ह्याच पद्धतीने तयार झाली आहे. शिवाय ‘पाय’ ह्या अवयवाचा संदर्भ आपल्याकडे अगदीच अपमानकारक किंवा कमीपणाचा असल्याने अजूनच अडचण. एकूण पायपुसण्याच्या थीमला समजून घेण्याचे वातावरण आपल्याकडे अजिबातच नाही. तिकडे 4th July थीमचे सॉक्स मिळतात. आपल्याकडे सॉक्सवर झेंडा अजिबात आवडणार नाही किंवा सहनही होणार नाही.

अशी ढीगभर उदाहरणे अगदी केक पासून अंतर्वस्त्रांपर्यंत देता येतील.

सांगायचा मुद्दा हा cultural sensibilities मधील फरकाचा आहे. अमेझॉनचा हेतू भारताच्या झेंड्याचा अवमान करण्याचा खचितच नसेल. पण त्यांना हा फरक कळायला हवा होता. ज्या देशात व्यवसाय करायचा तिथल्या स्थानिक संस्कृतीचा माफक अभ्यास असणे जागतिकीकरणात अगदीच आवश्यक झाले आहे. ह्याचे हे उदाहरण म्हणजे उत्तम नमुना आहे.

MBA च्या पोरांना ह्याची case-study शिकवली पाहिजे. शिकण्यासारखा धडा आहे.

===

=====

=====

थोडक्यात – दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

१ – Amazon ची चूक झालीच…! त्यांनी भारतीयांच्या भावनांचा विचार करायला हवाच होता.

२ – ही एक चूक होती, amazon चा हेतू भारताच्या अपमानाचा नव्हता. त्यामुळे ही गोष्ट फार टोकाला नेऊ नये!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?