' समाजात प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धा आणि त्या मागची तुम्हाला माहित नसलेली ‘खरी’ कारणे! – InMarathi

समाजात प्रचलित असलेल्या काही अंधश्रद्धा आणि त्या मागची तुम्हाला माहित नसलेली ‘खरी’ कारणे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

घरात बऱ्याचदा आपल्याला अनेक गोष्टींवरून बोलणी खावी लागतात, हे करू नको, ते करू नको, असं करणं चुकीच, तसं केलंस तर अमुक होईल किंवा तमुक होईल. आता आपण नवीन पिढीतील माणसं, त्यामुळे या सगळ्या अंधश्रद्धा म्हणून आपण त्यांच्याकडे कानाडोळा करतो आणि वडिलधाऱ्यांच्या भाबड्या समजुतीची खिल्ली उडवतो. पण समजा आम्ही तुम्हाला म्हटलं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अडवणूक करणारे वडिलधारे चुकीचे आहेतच, पण सोबतच त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे तुम्ही देखील चुकीचे आहात तर…? आता तुम्ही म्हणाल अंधश्रद्धेचं काय स्पष्टीकरण देणार तुम्ही? तर मंडळी आम्ही या लेखात अंधश्रद्धेचं समर्थन नाही तर त्यामागे असलेली खरी कारणे तुमच्या समोर मांडत आहोत. चला तर जाणून घेऊया अश्या काही गोष्टी ज्यांना आपण अंधश्रद्धा समजतो, पण त्यामागे असलेली खरी कारणे आपल्याला माहित नाहीत.

१. दरवाज्यावर लिंबू – मिरची लटकवणे

superstitions-marathipizza01
patrika.com

अंधश्रद्धा – असे केल्याने वाईट नजर आणि वाईट गोष्टी घरापासून लांब राहतात.

खरे कारण – लिंबू – मिरचीमध्ये सायट्रिक अॅसिड असते जे किड्या-मुंग्यांना आणि किटकांना घराच्या आत येण्यापासून थांबवते.

२. मंगळवारी आणि गुरुवारी केस न धुणे

superstitions-marathipizza02
womenfashion.tips

अंधश्रद्धा – या दिवशी केस धुतल्याने अशुभ घटना घडतात.

खरे कारण – जुन्या काळामध्ये पाणी साठवले जात असे, परंतु तरीही केस धुण्यासाठी पाण्याचा खूप वापर होत असे, त्यासाठी या दोन दिवशी पाणी वाचवण्यासाठी केस धुतले जात नसतं.

३. साप मारल्यानंतर त्याचे डोके चिरडणे

superstitions-marathipizza03
3.bp.blogspot.com

अंधश्रद्धा – असे म्हटले जाते की, सापाला मारल्यानंतर त्याच्या डोळ्यात मारणाऱ्याची प्रतिमा उमटत आणि साप बदला घ्यायला परत येतो.

खरे कारण – सापाला मारल्यानंतर त्याचे विष पसरून लोकांचा जीव जाऊ शकतो, म्हणून सापाला मारल्यानंतर त्यांचे डोके चिरडून ते विष दाबले जाते.

 

४. रात्रीची नखे न कापणे

suprstitious-marathipizza94
blog.getsholidays.com

अंधश्रद्धा – असे केल्याने आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतात.

खरे कारण –  जुन्या काळात वीज नसायची म्हणून रात्रीची नखे कापली जात नसतं. त्यावेळी नखे कापण्यासाठी हत्यारांचा वापर केला जात असे. त्यामुळे अंधारामध्ये बोटे कापण्याची भीती असायची.

 

५. दही खाऊन घरातून बाहेर जाणे

suprstitious-marathipizza05
i1.wp.com

अंधश्रद्धा – दही खाऊन घरातून बाहेर जाणे शुभ असते.

खरे कारण –  दही खाल्ल्याने पोट थंड राहते, तसेच दहीमध्ये साखर टाकून खाल्ल्याने शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा टिकून राहते.

 

६. मंदिराची घंटी वाजवणे

suprstitious-marathipizza06
dailyexcelsior.com

अंधश्रद्धा – मंदिरातील घंटा वाजवल्याने देव प्रसन्न होतो.

खरे कारण –  बहुतेक मंदिरांमध्ये तांब्याची घंटा असते. तांब्यामधून निघणारा ध्वनी तुंच्या शरीरातील ७ चक्रे जागृत करतो.

७. ग्रहणाच्या वेळी बाहेर न जाणे

suprstitious-marathipizza07
astrosage.com

अंधश्रद्धा – वाईट शक्ती तुमच्यावर आपला प्रभाव पाडतात.

खरे कारण –  ग्रहणाच्यावेळी सूर्याच्या किरणांनी त्वचेचे रोग होऊ शकतात. त्याचबरोबर जर ग्रहणावेळी चष्मा वैगेरे न लावता, उघड्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिल्यास अंधत्व येऊ शकते.

 

८. जमिनीवर बसून जेवन करणे

suprstitious-marathipizza08
tripadvisor.com

अंधश्रद्धा – जमिनीवर बसून न जेवल्यास आपले पूर्वज नाराज होतात.

खरे कारण –  जमिनीवर बसून जेवण ग्रहण केल्याने, तुमची पचनक्रिया जास्त चांगल्याप्रकारे काम करते आणि जेवण आरामात पचवले जाते.

 

गर्भवती स्त्रीला बाहेर जाण्यापासून बंदी

suprstitious-marathipizza09
india.com

अंधश्रद्धा – वाईट आत्म्याचा प्रभाव आई आणि होणाऱ्या मुलावर पडू शकतो.

खरे कारण – जुन्या काळामध्ये दळणवळणाच्या साधनांची कमी होती आणि त्यामुळे गर्भवती स्त्रीला पायी चालण्यामध्ये खूप समस्या निर्माण होत असतं.

 

१०. कावळ्यांना श्राद्धाचा प्रसाद खाऊ घालणे

suprstitious-marathipizza10
ishtadevata.com

अंधश्रद्धा –  आपले पूर्वज कावळ्यांच्या रुपामध्ये येऊन श्राद्धाचा प्रसाद ग्रहण करतात.

खरे कारण – कावळे नेहमीच मानवी वस्तीच्या आसपास असतात, श्राद्धाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी त्यांना बोलवावे लागत  नाही, श्राद्धाच्या  प्रसादा जवळ कोणीही मनुष्य न दिसल्यास कावळे स्वत: येऊन तो ग्रहण करतात.

तर मंडळी अश्या अजून काही अंधश्रद्धा आणि त्या मागची खरी कारणे तुम्हाला माहित असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा! 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?