कहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एखाद्या देशाकडे स्वत:चा सुपर कम्प्यूटर असणे ही मुळातच अभिमानाची गोष्ट! तंत्रज्ञान विश्व काबीज करणाऱ्या पाश्चिमात्य जगाने जवळपास ५०-६० वर्षांपूर्वीच सुपर कम्प्यूटरचा शोध लावला होता. सुपर कम्प्यूटरचा फायदा इतका प्रचंड की जगातील सर्वच देशांना स्वत:चा सुपरकम्प्यूटर हवा होता. त्यात आपला भारत देशही मागे नव्हता हे देखील खरे!

१९८५ साली याच आशेने भारताने अमेरिकेकडे सुपर कम्प्यूटरची मागणी केली. परंतु भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वत: वैयक्तिक विनंती करून देखील अमेरिकेचे राष्ट्रपती ‘रोनाल्ड रेगेन’ यांनी भारताला सुपर कम्प्यूटर देण्यास नकार दिला. २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना हा नकार प्रगतीची कास धरणाऱ्या आपल्या देशाच्या अगदी जिव्हारी लागला. खासकरून राजीव गांधींच्या, कारण जगभरात भारताची असलेली विकसनशील देशाची प्रतिमा बदलण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले होते. परंतु तरीही १९८७ सालापर्यंत ते प्रयत्न करत राहिले आणि अमेरिका नकार देत राहिला. अमेरिकेला आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतासारख्या एका विकसनशील देशाला द्यायची इच्छा नव्हती.

param-supercomputer-marathipizza01

स्रोत

========================

InMarathi चं नवं कोरं, चकचकीत मोफत अँड्रॉइड अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलंत ना?

ह्या अॅप्लिकेशनमध्ये आपले आवडते लेख शेअर करणे, “फेव्हरेट” म्हणून सेव्ह करणे, तसेच लेखांच्या नोटीफिकेशन्स मिळवणे अश्या सर्व सुविधा आहेत.

त्यामुळे चुकूनही विसरू नका!

इथे क्लिक करून हे मोफत अॅप्लिकेशन त्वरित इन्स्टॉल करा!

========================

यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने रशियाकडून सुपर कम्प्यूटर खरेदी करण्याचा सल्ला पंतप्रधानांना दिला.

तेव्हा भारत आणि रशियामध्ये सलोख्याचे संबंध होते. बोलणी झाली अन् रशिया सुपर कम्प्यूटर द्यायला तयारही झाला पण ऐनवेळेस अमेरिकेने आपला पाय मध्ये घातला. अमेरिका रशियाला सर्वतोपरी मदत करायचा. सर्व देश रशियाच्या विरोधात असताना अमेरिका रशियाच्या बाजूने उभा राहिला होता. रशियाला उमगले की आपण सुपर कम्प्यूटर भारताला द्यावा हे अमेरिकेला मान्य नाही. त्यामुळे नाईलाजाने रशियाने हा व्यवहार रद्द केला. पुन्हा एकदा भारताचे स्वप्न भंग पावले.

याचवेळी सुप्रसिद्ध कम्प्युटर बिझनेस फर्म IBM यांना भारतात आपला व्यवसाय स्थापन करायचा होता आणि त्यांचे लक्ष्य होते सुपर कम्प्यूटर तयार करण्याचे..!

भारत सरकारला त्यांची ही कल्पना आवडली, पण IBM ही अमेरिकन कंपनी असल्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकन सरकारने त्यात हस्तक्षेप केला. यावेळीस अमेरिकेचं म्हणणं होतं की भारताला सुपरकॉम्प्यूटर विकण्याला आमचा अजूनही विरोधच आहे कारण त्यामुळे आमच्या टेक्नोलॉजीकल सिक्युरिटीला धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेचा हा दावा साफ खोटा होता कारण भारताने अगोदरच स्पष्ट केले होते की “आम्हाला केवळ हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी सुपरकॉम्प्यूटर हवा आहे त्याचा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापर केला जाणार नाही.”

सगळे प्रयत्न फसल्यानंतर राजीव गांधी पूर्णत: हताश झाले होते.

दरम्यान CSIR (Council of Scientific and Industrial Research) येथे १९८७ साली एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेमध्ये राजीव गांधी देखील उपस्थित होते. तेव्हा भारतीय शास्त्रज्ञांनी राजीव गांधींना पटवून दिले की आपण देखील स्वत:चा वेगळा सुपरकॉम्प्यूटर तयार करू शकतो. राजीव गांधींनी भारतीय शास्त्रज्ञांना सुपर कम्प्यूटर बनवण्यासाठी मान्यता दिली खरी, परंतु अजूनही राजीव गांधींच्या मनात असा अविश्वास होता की अमेरिकेसारखा सुपर कम्प्यूटर भारतीय शास्त्रज्ञ बनवू शकत नाहीत.

परवानगी मिळवल्यावर हा प्रकल्प पुणे शहरातील CDAC (Center for Development and Advanced Computing) संस्थेकडे सुपूर्त करण्यात आला. भारतासाठी सुपर कम्प्यूटर बनवण्याच्या आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पामध्ये योगदान देण्यासाठी देशभरातून विविध शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. संपूर्ण प्रकल्पासाठी भारत सरकारने ३० मिलियन डॉलर्सची तरतूद करून दिली होती. ही रक्कम जरी मोठी वाटत असली तरी सुपर कम्प्यूटर बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या दृष्टीने ही अगदीच नगण्य रक्कम होती.

…आणि अथक मेहनत घेऊन ठरवलेल्या वेळेत अखेर शास्त्रज्ञांनी प्रकल्प पूर्ण केला…! त्यांच्या हातांनी इतिहास घडवला होता…!

भारतासारख्या एका विकसनशील देशाने जगासमोर आपला पहिला वाहिला सुपर कम्प्यूटर निर्माण करून दाखवला. सर्व विकसित देशांनी ही कामगिरी पाहून तोंडात बोटे घातली. अमेरिका तर सरळ सरळ तोंडघशी पडली होती. या पहिल्यावहिल्या सुपरकॉम्प्यूटरचे नाव ठेवण्यात आले “परम 8000”

आणि या ऐतिहासिक प्रकल्पाचे नेतृत्व हाती घेतले होते डॉ. विजय भाटकर यांनी..!

param-supercomputer-marathipizza03

 स्रोत

भारत इतर देशांसमोर सुपर कम्प्यूटरसाठी भिक मागतोय या गोष्टीची डॉ. विजय भाटकर यांना प्रचंड चीड होती. त्यांचा भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी हा विचार मांडला की भारत देखील सुपर कम्प्यूटर बनवू शकतो. याच डॉ. भटकरांनी १९९८ साली ‘परम-10000’ हा भारताचा दुसरा सुपर कम्प्यूटर निर्माण करण्याचे मिशन हाती घेतले आणि ते देखील पूर्णत्वास नेऊन दाखवले.

param-supercomputer-marathipizza02

स्रोत

परम सुपर कम्प्यूटर सिरीजची काही वैशिष्ट्ये:

 • परम सिरीज ही पूर्णत: भारतीय बनावटीची आहे.
 • २००८ पर्यंत ५२ परम सुपरकॉम्प्यूटर नियुक्त केले गेले होते. ज्यापैकी ८ सुपर कम्प्यूटर रशिया, सिंगापूर, जर्मनी आणि कॅनडा या देशांमध्ये आहेत.
 • टांझानिया, अर्मेनिया, सौदी अरेबिया, घाना, म्यानमार, नेपाळ, कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम या देशांनी भारताकडून परम सुपर कम्प्यूटर खरेदी केले आहेत.
 • जगातील इतर कोणत्याही सुपर कम्प्यूटरची जेवढी स्पीड आहे अगदी तेवढीच स्पीड परम सुपर कम्प्यूटरची आहे.
 • परम निर्माण करण्याचा खर्च जगातील इतर सुपर कम्प्यूटरच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा अतिशय कमी आहे.
 • आजवर भारताने परम सिरीजमध्ये ४ प्रमुख सुपर कम्प्यूटर तयार केले आहेत. परम युवा II हा या सिरीजमधील सर्वात लेटेस्ट असेल…!

=====

=====


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 74 posts and counting.See all posts by vishal

3 thoughts on “कहाणी भारताच्या पहिल्या वहिल्या सुपर कम्प्यूटरची

 • December 23, 2016 at 11:19 am
  Permalink

  फार अभिमानास्पद … डॉ . विजय भाटकर सारखे ग्रेट सायंटिस्ट आपल्या देशात आहेत

  Reply
 • February 9, 2017 at 11:43 am
  Permalink

  फार अभिमानास्पद … laee bhari…

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?